Posts Tagged ‘मराठी श्लोक’

गणपती बाप्पांच्या आरतीनंतर after Ganpati aarti

आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक

सदा सर्वदा योग तुझा घडावा । (Sada Sarvada Yog tuza ghadava)
तुझे कारणी देह माझा पडावा । (Tujhe karani deh majha padava)
उपेक्षु नको गुणवंता अनंता । (Upekshu nako gunavanta ananta)
रघुनायका मागणॆ हेचि आता ॥ (Raghunayaka magane hechi aata)

कैलासराणा शिव चंद्रामौळी ।(Kailasrana shiv chandramauli)
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी । (Phanindra matha mukuti jhalali)
कारुण्यसिंधु भवदु:खहारी । (Karunyasindhu bhavdukh hari)
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ (Tujvin shambho maj kon tari)

उडाला उडाला कपि तो उडाला(udala udala kapi to udala)
समुद्र उलटोनी लंकेशी गेला (samudra ulatoni Lankeshi gela)
लंकेशी जाऊनी चमत्कार केला (lankeshi jauni vichar kela)
नमस्कार माझा त्या मारूतीला (Namaskar maza tya Marutila)

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे।(jya jya thikani man jay maze)
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे॥ (tya tya thikani nijarup tuze)
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी। (mee thevito mastak jya thikani)
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥ (tethe tuze satguru pay donhi)

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।(Morya Morya Mee Bal Tahne)
तुझीच सेवा करु काय जाणे ॥(Tujheech seva karu kay jane)
अपराध माझे कोट्यानु कोटी ।(Aparadh majhe kotyanu koti)
मोरेश्र्वरा बा तू घाल पोटी ॥ (Moreshwara ba tu ghal poti)

अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र, (Alankapuri punyabhumi pavitra)
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, (Tithe nandato dnyanraja supatra)
जया आठविता घडे पुन्यराशी, (Jaya Aathavito ghade punyarashi)
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. (Namaskar majha dnyaneshwarasi)

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे,(Shukasarikhe purn vairagya jyache)
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. (Vasisthapari dnyan yogeshwarache)
कवि वाल्मिकीसारिखा थोर ऐसा, (Kavi valmikisarikha thor aisa)
नमस्कार माझा तया रामदासा. (Namskar majha taya Ramdasa)

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।
निर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

संकटनाशन महागणपति स्तोत्रम (मराठी)

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तीने स्मरतां नित्य आयुः कामार्थ साधती ॥१॥
प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत तेँ |
तिसरे कृष्णापिगांक्ष, चवथे गजवक्र तेँ ॥२॥
पांचवे श्रीलंबोदर, सहावे विकट नांव तेँ |
सातव विघ्नराजेन्द्र, आठवे धुम्रवर्ण तेँ ॥३॥
नववें श्री भालचंद्र, दहावें श्रीविनायक|
अकरावे गणपती, बारावें श्रीगजानन ॥४॥
देवनावें अशी बारा तीन संध्या म्हणे नर|
विघ्नभीती नसे त्याला, प्रभो! तू सर्वसिध्दि दे ॥५॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गति ॥६॥
जपता गणपतीस्तोत्र, सहा मासांत हे फळ |
एक वर्ष पूर्ण होता, मिळे सिध्दि न संशय ॥७॥
नारदांनी रचिलेले, झाले संपुर्ण स्तोत्र हें |
श्रीधराने मराठीत, पठण्या अनवादिलें ॥८॥

गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।।

यानंतर आरती पात्र सगळ्यांकडे घेऊन जावे, आणि हाताने आरती घेण्यास सांगावे. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटावा.

3 comments - What do you think?  Posted by admin - September 5, 2016 at 12:50 pm

Categories: Aarati   Tags: ,

© 2010 Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection