Sri Radha Krut Ganesh Stotra – Mangalik Kundali Remedy

आपल्या जन्मपत्रिकेतील मंगळग्रहाच्या बलाबलावर आपणास अभेद्य समजल्या जाणा-या समस्यांवर अंकुश ठेवण्याची मनःशक्ती प्राप्त होत असते. लहानसहान समस्यांचे वादळही आपल्या अस्तित्त्वाचे समूळ उच्चाटन करेल अशी अनामिक भीती मनात पोसणारे अनेक जण आपणास समाजात वावरताना दिसतात, अशा वेळी गणरायाची उपासना अत्यंत लाभप्रद ठरते. ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून मंगळाच्या कृपाप्रसादासाठी गणरायाची उपासना हितवर्धक ठरते. गणरायाचे राधाकृत स्तोत्र प्रातःकाळी नित्य पठणात असल्यास आपल्या प्रगतीच्या रथास सप्ताश्व जोडण्याचे सौभाग्य लाभले असे निःसंशयपणे वाटते. स्तोत्र पुढील प्रमाणे…
श्रीराधाकृतं गणेश स्तोत्रम् Shree Radhakrut Shree Ganesh Stotram

श्रीगणेशाय नमः।
परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरम् ।
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकम्॥१॥
सुरासुरेन्द्रैः सिद्धेद्रैः स्तुतं स्तौमि परात्परम्।
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम्॥२॥
इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम्।
यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते॥३॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्त पुराणे श्रीराधाकृतं गणेश स्तोत्रं संपूर्णम्॥

मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साधनसामुग्री, उत्तम प्रोत्साहन, कौटुंबिक सहकार्य यापेक्षाही असाधारण मानसिक बळ नितांत गरजेचे आहे. हे स्तोत्र केवळ विघ्ननिवारक आहे असा समज करून घेणे योग्य नाही, आपण स्वतः मनात रुजवलेली व कालपरत्वे फोफावलेली निराशा मनास निर्बल करत असते. या स्तोत्रपठणाने मनात स्वाभाविकपणे उत्साहाचे तरंग निर्माण होतात. समस्यांचा विळखा भेदण्याचे मनोधैर्य निर्माण होणे हाच खरा सुमुहूर्त म्हणावा अशी प्रयत्नवादी भूमिका तयार होते. प्रगतीचा अरुंद होणारा मार्ग महामार्गात रुपांतरित करण्याची महत्त्वाकांक्षा वाढीस लागते असा आपणास अनुभव येईल याची खात्री वाटते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *