Meaning of Ganpati Aarti in Marathi – गणपती आरती, शब्दश: अर्थ व निरुपण

गणपती आरती, शब्दश: अर्थ व निरुपण

सुखकर्ता दु:खहर्ता = सुख देणारा दुःख हरण करणारा

वार्ता = बातमी. अजूबाजूकडून सतत बातम्या येत असतात. त्या सुखाच्या व दुःखाच्या पण असतात. त्यातील विघ्नाच्या, दुःखाच्या राहू देऊ नको,

नुरवी = न उरवी, फक्त प्रेम पुरव, दुःखाचा समुळ नाश करतो.

पुरवी प्रेम कृपा जयाची = त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो.

सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची = गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे.

कंठी झळके माळ मुक्ताफळांची = त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे
————————-
जय देव जय देव जय मंगलमूर्ति | दर्शनमात्रे मन कामना पुरती ||धृ||

म्हणजे = हे देवा, तुझा जयजयकार असो. तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस. तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
———————————
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा = हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे. रत्नखचित फरा म्हणजे रत्नांचा तुरा. जसा मोराला, कोंबड्याला तुरा असतो तसा. तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असे कृष्णलिला वर्णन आहे.

चंदनाची उटी कुंकुमकेशरा = कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे.

हिरेजडित मुकुट शोभतो बरा = हिऱ्यानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया = तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.
————————————
लंबोदर पीतांबर फणिवर बंधना = मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना = सरळ सोंड व वाकडे तोंड असणाऱ्या,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्याना सरळ मार्गावर आणणाऱ्या, त्रिनयना (३ नेत्र असणाऱ्या).

दास रामाचा वाट पाहे सदना = हे गणपते, मी रामाचा दास (समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना = हे सुरवरवंदना = सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.

निर्वाणी = अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना.

आता थोडे निरुपणत्मक:

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |

या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.

नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ||

म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ता फळाची ||

त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन कामना पुरती || १ ||

त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’ च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’ च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रू पक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार?

पण इथे मला थोडा वेगळा अर्थ लावावासा वाटतो. मनोकामना, या शब्दाचे विघटन करावे वाटते. मन पूर्ण करतो (म्हणजे या देहीचे त्या देही घातले, किंवा माझे मन तुझे झाले, एकरूपता, किंवा ध्यानात गण-ईश, असा अर्थ लावूयात) नि कामना ही. इथे तो ईश आहे, गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे, म्हणून विघटनात्मक, विनाशात्मक, कामना तो कसा पूर्ण करणार. विद्या-अधिपती म्हणतो, मग तो फक्त सकारत्मक वृत्तीचे जोपासन करेन, सत्याची बाजू घेईन, मित्र-शत्रू हे शब्द आपल्यासाठी, तो तर फक्त भक्तालाच जाणतो.

या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्र-संगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पितृदेव भगवान शंकर अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.

रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा | चंदनाची उटी कुंकुम केशरा ||
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ||

पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

शेंदुरावरून आठवले, हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं. एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”

सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदूराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावर शेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंगबली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात.

पूजनाच्या सोपस्काराचा शास्त्रार्थ तर आहेच पण वैज्ञानिक करणे देखील आहेत, शिवाय संत वचन, भक्तांची श्रद्धा, मूर्तीला स्पर्श करतानाची भावना, त्याला बाळ समजून किंवा सर्वाधीश समजून, समजून उमजून केलेली पूजा याची मजा काही औरच, ती फक्त अनुभवायची असते, शब्दामध्ये उतरवणे कठीण असते. आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात. याचे अनुभव देखील आपल्या सर्वांना आहेतच.

भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात:

सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं, लम्बोदरं सुन्दरं
प्रस्यन्दन्मद्गन्ध लुब्धमधुपब्यालोल गण्डस्थलम् |
दन्ताघात विदारितारिरुधिरैःसिन्दूरशोभाकरं
वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम् || (गणेशध्यानम्)

नामदेवांनी पण गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. ते म्हणतात,

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड | करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती | भक्ताला रक्षिती निरंतर ||

तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला दिसत नाही. त्रिनयना हे सूक्ष्मातले ध्यान आहे. तिसरे नेत्र हे दिव्य अशा ज्ञानचक्षूचे द्योतक आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातल्या मूर्तीला मध्यभागी तिसरा डोळा दाखवला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर वंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे सुरवर वंदना ||

अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुष्टी त्याला जोडून केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे.

तीनशे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात,

गणराया लौकरी येई | भेटी सकलांसी देई ||
अंगी सिंदूराची उटी | केशर-कस्तुरी लल्लाटी ||
पायी घागऱ्या वाजती | नाचत आला गणपती ||
तुका म्हणे पाही | विठ्ठल गणपती दुजा नाही ||

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो:

“तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे |
कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ||
गोर मेरु जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग |
तेण आधारे अग्नेय सुखावले ||”

 

श्रीगुरुचरणरजानंदसेवक
श्रीकृष्ण पुराणिक
(१६ नोव्हेंबर २०१५)

meaning of ganpati aarti in marathi
ganpati aarti marathi lyrics

ganpati aarti lyrics in marathi pdf

ganpati aarti marathi lyrics in english

sukhkarta dukhharta full aarti pdf

sukhkarta dukhharta lyrics

ganesh aarti lyrics in english pdf

sukhkarta dukhharta lyrics in hindi pdf

ganpati aarti pdf

Maza Avadta Lekhak Pu La Deshpande

 

 

maza avadta lekhak sane guruji

maza avadta lekhak rabindranath tagore in marathi

maza avadta kavi marathi nibandh

maza avadta sahityik marathi nibandh

marathi lekhak ani kavi information

pu la deshpande kavita

pu la deshpande quotes

pu la deshpande dialogues

Water Is Life Essay In Marathi Language

पाणी – मानवी शरीराचा एक आवश्यक भाग :-
संशोधन असे दर्शविते की मानवी शरीर 60% पाण्याने बनलेले आहे. आमच्या फुफ्फुसांमध्ये अंदाजे 83% पाणी, स्नायू आणि मूत्रपिंडांमध्ये पाणी, मेंदू आणि हृदयात 73%, आपल्या त्वचेत 64% आणि हाडांमध्ये 31% पाणी असते. रक्ताभिसरण, पचन, शरीराचे तापमान नियमित करणे, ऊती आणि सांध्याचे संरक्षण करणे, घाम येणे, मलविसर्जन आणि लघवीद्वारे कचरा काढणे यासह पाण्यामुळे शरीराच्या बर्‍याच कार्यात मदत होते.

ही कार्ये करण्यासाठी आपले शरीर सतत पाण्याचा वापर करते. म्हणून, आपल्या शरीरास योग्यप्रकारे कार्य करण्यासाठी सतत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. शरीरात कमी झालेले पाणी वेळेवर पुन्हा भरणे महत्वाचे आहे.

पाणी – वनस्पतींच्या विकासासाठी महत्वाचे :-
प्रकाशसंश्लेषणाद्वारे वनस्पती त्यांचे जेवण तयार करतात. पाणी या प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे. आम्ही झाडांना पाणी देताच ते त्यांच्या मुळात शिरते आणि त्यांच्या पानांवर जाते. हे मातीमधून पोषकद्रव्ये काढते आणि त्यांना पानांकडे घेऊन जाते. पानांमध्ये प्रकाश संश्लेषण होते. पानांमधील पाणी बाष्पीभवन होऊन कार्बन डाय ऑक्साईडची देवाणघेवाण करते.

पाण्याचा योग्य पुरवठा केल्याशिवाय झाडांना पुरेसे पोषक आहार मिळत नाहीत आणि प्रकाशसंश्लेषण करता येत नाही. परिणामी, झाडे सुकणे आणि पडणे सुरू होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. काही झाडांना आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते, तर काहींना थंड आणि दमट हवामानात थंड पाण्याशिवाय जगणे कठीण होते.

पाणी – सागरी जीवांसाठी निवास :-
समुद्रातील पाणी समुद्रातील प्राण्यांसाठी एक प्रकारे घराचे काम करते. मासे, कासव, बेडूक, खेकडे आणि इतर सागरी प्राणी विविध प्रकारचे महासागर, समुद्र आणि नद्यांमध्ये राहतात. ही जल संस्था त्यांचे निवासस्थान आहे. बहुतेक समुद्री प्राणी पाण्यात पूर्णपणे राहतात आणि जमिनीवर जगू शकत नाहीत. ते जैवविविधता वाढवतात आणि इको सिस्टमचा एक आवश्यक भाग आहेत.

जल प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ ही या सुंदर आणि निष्पाप प्राण्यांना धोका दर्शवित आहे. सुंदर समुद्री प्राण्यांच्या बर्‍याच प्रजाती एकतर लुप्त किंवा धोकादायक आहेत. विविध मानवी कार्यांमुळे, पाण्याचे प्रदूषण होते. समुद्री जीवांसाठी एक सुरक्षित आणि निरोगी निवासस्थान प्रदान करण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

निष्कर्ष :-
सजीव प्राणी आणि वनस्पतींना जिवंत राहण्यासाठी पाणी महत्वाचे आहे. पाण्याचे नैसर्गिकरित्या पुनर्चक्रण केले जाते तरीही पृथ्वीवरील ताज्या पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मनुष्याच्या दुर्लक्षामुळे हे सर्व घडले आहे. आम्ही दिवसभर पाणी अनेक कामांसाठी वापरतो. परंतु आम्ही त्याचा कार्यक्षमतेने वापर करीत नाही. आम्ही जे वापरतो त्यापेक्षा आपण जास्त वाया घालवितो. म्हणूनच जलसाठा वेगाने कमी होत आहे. हा उच्च काळ आहे जेव्हा आपण पाण्याचा विवेकबुद्धीने वापर केला पाहिजे आणि त्यास प्रदूषित करणार्‍या क्रियाकलापांवर मर्यादा घालायला पाहिजे.

 

=============

 

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

असे वाचवा पाणी

आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण पाणी पितो. सर्वसाधारणपणे पिण्यासाठी पेलाभर पाणी घेतो. मात्र, खूपदा एखाद दुसरा घोट पाणी पिऊन उरलेले पाणी आपण फेकून देतो. हे दृश्य घरी, समारंभात बऱ्याचदा पाहायला मिळते. हे फेकून दिलेले पाणी आपण मोजले, तर आपण पाण्याचा किती मोठ्या प्रमाणात अपव्यय करतो हे कळेल. असा प्रयोग आपण आपल्या घरीही सहज करू शकता. दिवसभरात किती पाणी वाया जाते ते बघा.
बऱ्याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ऐका. कुठे पाणी वाहते आहे याचा शोध घेऊन नळ बंद करा.

विनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल, तर त्याला समज द्या. जनजागृती करा.

कुंडीमध्ये पाण्याचा ओलावा ठेवू शकता आणि सेंद्रीय कोरड्या तणाचा वापर करा. हे तण ओले करून त्याचे आच्छादन दिल्याने कुंडीतील झाडास पाणी कमी लागते. हे तण ओलावा धरून ठेवते.

घरातील फिशटँक वारंवार धुऊ नका. तो पूर्ण भरत असाल, तर निम्म्याने धुवा. आठवड्यातून काही ठराविक दिवस तो स्वच्छत करण्याचे बंधन पाळा. फिशटँकमधील पाणी कुंड्यांना घाला.

=================

Maza Avadta Mahina Shravan Marathi Nibandh

 

 

maza avadta mahina shravan marathi nibandh

ala ala shravan essay in marathi

shravan mahina

shravan aala paus marathi nibandh

shravan somvar information in marathi

shravanatil san

shravan month in marathi

shravan mahinyatil san

Veej Nastee Tar Nibandh in Marathi Language

 

वीज गायब झाली तर निबंध
लाईट नसती तर
विजेची बचत काळाची गरज निबंध
मराठी निबंध पुस्तक 12वी PDF
मराठी युवकभारती इयत्ता बारावी PDF 2020
वेगवशता meaning in Marathi
मराठी युवकभारती इयत्ता अकरावी नवनीत pdf
वेगवशता कृती
वर्णनात्मक निबंध मराठी विषय

गीता में छिपा है जीवन जीने का सार

गीता में छिपा है जीवन जीने का सार, जानिए उसके कुछ अंश

श्रीमद्भागवत गीता में भगवान कृष्ण के द्वारा रण भूमि में अर्जुन को उपदेश दिए गए हैं। गीता की बातें मनुष्य को सही तरह से जीवन जीने का रास्ता दिखाती हैं। गीता के उपदेश हमें धर्म के मार्ग पर चलते हुए अच्छे कर्म करने की शिक्षा देते हैं। महाभारत में युद्ध भूमि में खड़े अर्जुन और कृष्ण के बीच के संवाद से हर मनुष्य को प्रेरणा लेनी चाहिए। चलिए जानते हैं…

जब अर्जुन युद्ध भूमि में जाते हैं तो अपने सामने पितामह और सगे संबंधियों को देखकर विचलित हो जाते हैं। तब भगवान श्री कृष्ण उन्हें सही ज्ञान देते हैं। श्री कृष्ण अर्जुन को उपदेश देते हुए कहते हैं कि हे पार्थ ये युद्ध धर्म और अधर्म के मध्य है । इसलिए अपने शस्त्र उठाओ और धर्म की स्थापना करो। भगवान श्री कृष्ण धर्म के मार्ग पर चलने की शिक्षा देते हैं। मनुष्य को भी धर्म का पालन करना चाहिए।

गीता में कहा गया है कि क्रोध से भ्रम उत्पन्न होता है जिससे बुद्धि व्यग्र हो जाती है। भ्रमित मनुष्य अपने मार्ग से भटक जाता है। तब सारे तर्कों का नाश हो जाता है, जिसके कारण मनुष्य का पतन हो जाता है। इसलिए हमें अपने क्रोध पर नियंत्रण रखना चाहिए।

गीता में भगवान श्री कृष्ण ने कहा है कि मनुष्य को उसके द्वारा किए गए कर्मों के अनुसार ही फल प्राप्त होता है। इसलिए मनुष्य को सदैव सत्कर्म करने चाहिए। गीता में कही गई इन बातों को प्रत्येक व्यक्ति को अपने जीवन में मानना चाहिए।

भगवान श्री कृष्ण कहते हैं कि आत्म मंथन करके स्वयं को पहचानो क्योंकि जब स्वयं को पहचानोगे तभी क्षमता का आंकलन कर पाओगे। ज्ञान रूपी तलवार से अज्ञान को काट कर अलग कर देना चाहिए। जब व्यक्ति अपनी क्षमता का आंकलन कर लेता है तभी उसका उद्धार हो पाता है।

भगवान श्री कृष्ण कहते हैं कि मृत्यु एक अटल सत्य है, किंतु केवल यह शरीर नश्वर है। आत्मा अजर अमर है, आत्मा को कोई काट नहीं सकता अग्नि जला नहीं सकती और पानी गीला नहीं कर सकता। जिस प्रकार से एक वस्त्र बदलकर दूसरे वस्त्र धारण किए जाते हैं उसी प्रकार आत्मा एक शरीर का त्याग करके दूसरे जीव में प्रवेश करती है।

करवा चौथ के बाद आ रहा है संतान की दीर्घायु के लिए व्रत

 

Ahoi Ashtami 2020: करवा चौथ के बाद आ रहा है संतान की दीर्घायु के लिए व्रत

Ahoi Ashtami 2020: करवा चौथ व्रत के बाद अब संतान की दीर्घायु के लिए रखा जाने वाला व्रत अहोई अष्टमी आ रहा है। यह व्रत 8 नवंबर को रखा जाएगा। हर साल कार्तिक मास कृष्ण पक्ष की अष्टमी तिथि के दिन अहोई अष्टमी व्रत रखा जाता है। महिलाएं इस दिन अपने संतान की दीर्घायु और सुखी जीवन के लिए उपवास करती हैं। साथ ही अहोई देवी की पूजा करती है। आइए जानते हैं अहोई अष्टमी व्रत का शुभ मुहूर्त और व्रत कथा।

अहोई अष्टमी मुहूर्त
अष्टमी तिथि आरंभ- सुबह 7 बजकर 28 मिनट से (8 नवंबर)
अष्टमी तिथि समाप्त- सुबह 6 बजकर 50 मिनट तक (9 नवंबर)
पूजा का समय- शाम 5 बजकर 26 मिनट से शाम 6 बजकर 46 मिनट तक (8 नवंबर)

अहोई अष्टमी व्रत विधि

  • माताएं सूर्योदय से पूर्व स्नान करके व्रत रखने का संकल्प लें।
  • अहोई माता की पूजा के लिए दीवार पर गेरू से अहोई माता का चित्र बनाएं।
  • साथ ही सेह और उसके सात पुत्रों का चित्र बनाएं।
  • सायंकाल के समय पूजन के लिए अहोई माता के चित्र के सामने एक चौकी रखें।
  • उस पर जल से भरा कलश रखें।
  • रोली-चावल से माता की पूजा करें।
  • मीठे पुए या आटे के हलवे का भोग लगाएं।
  • कलश पर स्वास्तिक बना लें और हाथ में गेंहू के सात दाने लेकर अहोई माता की कथा सुनें।
  • इसके उपरान्त तारों को अर्घ्य देकर अपने से बड़ों के चरण स्पर्श कर आशीर्वाद लें।

अहोई अष्टमी व्रत का महत्व
अहोई अष्टमी के दिन व्रत रखने से संतान के कष्टों का निवारण होता है एवं उनके जीवन में सुख-समृद्धि व तरक्की आती है। ऐसा माना जाता है कि जिन माताओं की संतान को शारीरिक कष्ट हो, स्वास्थ्य ठीक न रहता हो या बार-बार बीमार पड़ते हों अथवा किसी भी कारण से माता-पिता को अपनी संतान की ओर से चिंता बनी रहती हो तो माता द्वारा विधि-विधान से अहोई माता की पूजा-अर्चना व व्रत करने से संतान को विशेष लाभ होता है।

कौन हैं मां अहोई
अहोई, अनहोनी शब्द का अपभ्रंश है। अनहोनी को टालने वाली माता देवी पार्वती हैं। इसलिए इस दिन मां पार्वती की पूजा-अर्चना का भी विधान है। अपनी संतानों की दीर्घायु और अनहोनी से रक्षा के लिए महिलाएं ये व्रत रखकर साही माता एवं भगवती पार्वती से आशीष मांगती हैं।

धनतेरस के दिन जरूर खरीदें पांच चीजें

 

इस वर्ष धनतेरस 13 नवंबर को है। दिवाली के एक दिन पहले धनतेरस का त्योहार मनाया जाता है। पांच दिनों तक चलने वाले दिवाली महापर्व में धनतेरस सबसे पहले मनाया जाता है। हिंदू पौराणिक मान्यता के अनुसार धनतेरस की तिथि पर भगवान धन्वंतरि का जन्म हुआ था। भगवान धन्वंतरि को आयुर्वेद और अच्छी सेहत के देवता के रूप में पूजा जाता है। दिवाली पर धनतेरस के दिन भगवान धन्वंतरि की पूजा उपासना करने से जीवन में सुख-समृद्धि, ऐश्वर्य और अच्छी सेहत की प्राप्ति होती है।

धनतेरस पर खरीदारी करना बहुत ही शुभ माना जाता है। धनतेरस पर सभी तरह के शुभ कार्य किए जा सकते हैं। इसदिन विशेष रूप से सोने और चांदी के आभूषण की खरीदारी की जाती है। मान्यता है कि धनतेरस के दिन जिस भी शुभ चीज की खरीदारी करने से उसमें तेरह गुने की वृद्धि होती है। धनतेरस पर विशेष चीजें खरीदने पर देवी लक्ष्मी का आशीर्वाद मिलता है और घर में धन की किसी भी तरह की कोई कमी नहीं होती है। धनतेरस पर कुछ चीजों की खरीदारी करने पर  विशेष फल की प्राप्ति होती है।आइए जानते हैं धनतेरस पर क्या-क्या खरीदना शुभ होता है।

पारद श्रीयंत्र सहित श्री धन वर्षा यंत्र, कुबेर यंत्र और महालक्ष्मी यंत्र
अपने ऊपर और परिवार के सभी सदस्यों पर धनवर्षा की कृपा पाने के लिए धनतेरस पर पारद श्री यंत्र जरूर खरीदें। इस यंत्र से जीवन में धन,वैभव और सुख-समृद्धि की कभी कमी नहीं रहती। इस पारद श्रीयंत्र को किसी योग्य पंडित से घर, कार्यालय  और तिजोरी में स्थापित करें। इसके अलावा धनतेरस पर श्री धन वर्षा यंत्र, कुबेर यंत्र और महालक्ष्मी यंत्र खरीदें।

लक्ष्मी-गणेश जी की मूर्ति 
धनतेरस पर लक्ष्मी-गणेश जी की मूर्ति जरूर खरीदें। दिवाली के एक दिन पहले धनतेरस पर लक्ष्मी-गणेश की मूर्ति घर पर लाने की परंपरा है। फिर दिवाली के दिन इनकी विधिवत पूजा की जाती है।

सोने-चाँदी के सिक्के खरीदना न भूलें
धनतेरस पर सोने चांदी के सिक्के और अभूषण जरूर खरीदना चाहिए। इसके अलावा चांदी के बर्तन भी खरीदा जाता है। धनतेरस के दिन खरीदे जाने वाले इन सोने-चांदी के सिक्कों, बर्तनों और आभूषणों को दिवाली के दिन लक्ष्मी गणेश पूजन के समय जरूर पूजें। मान्यता है इससे धन की देवी मां लक्ष्मी प्रसन्न होती हैं और धन और शुभता का आशीर्वाद देती हैं।

धनिए के बीज
धनतेरस पर धनिए के बीज खरीदकर दिवाली पर लक्ष्मी पूजन में प्रयोग करना बहुत ही शुभ माना गया है। धनिए के बीज को लक्ष्मी-गणेश पूजा में जरूर चढ़ाएं। धनिया का बीज को तिजोरी में जरूर रखें।

दिवाली के दिन जरूर करें ये उपाय

कार्तिक माह में दिवाली से पहले धनतेरस का त्योहार आता है। यह त्योहार हर साल कार्तिक दिवाली के दिन जरूर करें ये उपाय, साल भर धन की नहीं होगी कमी

  • दीपावली के दिन उत्तर दिशा में नीले और पीले बल्व लगाने से घर में लक्ष्मी का आगमन होता है। दीयों का भी विशेष महत्व है। दीये की संख्या का ध्यान देना बहुत जरूरी है।
  • 11, 21, 51 यह शुभ संख्या मानी जाती है। इस संख्या में दिये जलायें और लक्ष्मी माँ का पूजन करते समय 11 घी के दीये अवश्य जलाने चाहिये। इससे घर हमेशा धन धान्य से भरपूर रहता है।
  • उत्तर दिशा कुबेर दिशा मानी जाती है। इस दिशा को साफ सुथरा कर यहां पानी से भरा कटोरा या फव्वारा आदि रखें। इससे घर में कभी भी धन की कमी नहीं होगी।
  • मां लक्ष्मी को आमंत्रित करने के लिये घर के द्वार को तोरण से सजायें। आम के पत्तों या अशोक के पत्तों से बनी तोरण शुभ मानी जाती है।
  • मुख्य द्वार पर चावल और सिंदूर के मिश्रण से तैयार किये माँ लक्ष्मी के पैरों के चिन्ह जरूर अंकित करें। इनकी दिशा घर के अन्दर की तरफ होनी चाहिये।
  • दरवाजे पर हल्दी से ॐ या स्वास्तिक का चिन्ह जरूर बनाएं।
  • धन के प्रवाह को तेज करने के लिये और सुख, समृद्धि को बढ़ाने वाली वस्तुऐं जैसे तिजोरी, सेफ आदि को उत्तर दिशा में रखना चाहिये। दरवाजों में तेल डालें ताकि वह आवाज न करें।
  • नकारात्मक ऊर्जा को हटाने के लिये ईशान कोण में चाँदी के या स्टील के कटोरे में पानी या पीले फूल डाल कर रखें।
  • कुछ चीजें घर में रखने से माँ लक्ष्मी की असीम कृपा मिलती है। पूजा में इस्तेमाल किये गये सिक्कों को लाल कपड़े में सुनहरे धागे के साथ तिजोरी या अलमारी में रखना चाहिये।
  • सेंधा नमक को पानी में मिला कर छिड़काव करने से घर की नकारत्मक ऊर्जा खत्म होती है।
  • दीपावली में लक्ष्मी पूजन का विधान है। आपके घर में सम्पत्ति धन हमेशा बना रहे इसलिये लक्ष्मी गणेश के पूजन में कौड़ियां अवश्य रखनी चाहिए।
  • दीपावली के दिन नई झाड़ू से घर की सफाई करने से बरकत बनी रहती है।

धनतेरस में जरूर करें ये 5 काम, धन-धान्य के भरेंगे भंडार

माह में कृष्ण पक्ष की त्रयोदशी तिथि के दिन मनाया जाता है। इस साल यह पर्व 13 नवंबर को मनाया जाएगा। इस दिन खरीदारी करने का महत्व होता है। मान्यता है कि इस दिन खरीदी गई चीजों में कई गुना वृद्धि हो जाती है। शास्त्रों में बताया गया है कि इस दिन कुछ उपाय करने से घर में धन-धान्य के भंडार भर जाते हैं और मां लक्ष्मी की कृपा सदैव बनी रहती है। इस धनतेरस आप ये पांच उपाय जरूर करें।

धनतेरस की शाम जलाएं दीया
धनतेरस की शाम को एक दीया जलाएं और उसके पास में एक कौड़ी को रख दें इसके बाद कौड़ी को अपने पैसे रखने वाली जगह पर लाल कपड़े में लपेटकर रख दें। इस उपाय से घर पर पैसों की कभी कमी नहीं रहेगी।

कुबेर देवता के इस मंत्र का करें जप
108 बार “ॐ यक्षाय कुबेराय वैश्रववाय, धन-धान्यधिपतये धन-धान्य समृद्धि मम देहि दापय स्वाहा” कुबेर मंत्र का जाप करें।

चांदी के सिक्के और हल्दी की गांठ की करें पूजा
धनतेरस पर चांदी के सिक्के और हल्दी की गांठ की पूजा करने से जीवन में तरक्की मिलती है। इस उपाय को करने से राह में आ रहीं आर्थिक बाधाएं भी दूर हो जाती हैं।

किन्नरों का लें आशीर्वाद
धनतेरस के दिन किसी किन्नर के हाथों से पैसे लेकर अपने पर्स में रख लें। इससे आपको जिंदगी में बहुत सफलता मिलेगी। कहा जाता है कि इस दिन यह उपाय करने से आपके पास धन की कभी नहीं होगी।

श्रीयंत्र की पूजा करना न भूलें
धनतेरस और दिवाली पर श्रीयंत्र की पूजा करने से जीवन में कभी भी पैसों की तंगी नहीं रहती है। श्रीयंत्र की पूजा करने से घर में सुख-समृद्धि और वैभव का आगमन होता है और मां लक्ष्मी की कृपा बनी रहती है।

Dear Visitor,

We appreciate your support for our website. To continue providing you with free content, we rely on advertising revenue. However, it seems that you have an ad blocker enabled.

Please consider disabling your ad blocker for our site. Your support through ads helps us keep our content accessible to everyone. If you have any concerns about the ads you see, please let us know, and we’ll do our best to ensure a positive browsing experience.

Thank you for understanding and supporting our site.

Please disable your adblocker or whitelist this site!