आरत्या शुद्ध म्हटल्या पाहिजेत

‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची’ याचा अर्थ अगदी सोपा आहे. सुख देणारा व दु:ख हरण करणारा असा हा गणपती विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवीत नाही व ज्याची कृपा प्रेमाचा पुरवठा करते, पण ही आरती म्हणताना पुष्कळ जण नुरवी (ऊरू देत नाही) या शब्दाएवेजी नुर्वी हा अर्थहीन शब्द वापरतात. गणपतीचं आगमन व्हायची वेळ…