सप्तशती गुरुचरित्र

सप्तशती गुरुचरित्र हा मराठी ग्रंथ गंगातीरीं ब्रह्मावर्त येथे शके १८२६ (इ. स. १९०४) मध्यें झाला. मूळ श्रीगुरुचरित्राच्या सारभूत या ग्रंथाचे अध्याय ५१च आहेत व त्यांत ७०० श्लोक आहे. प्रत्येक श्लोकाचे तिसरे अक्षर क्रमाने वाचले असता श्रीमद्भगवद्गीतेचा १५वा अध्याय होतो. म्हणजेच हा ग्रंथ मंत्रगर्भ आहे. श्रीगुरुचरित्राच्या वाचनाचा अधिकार सर्वांना नसल्याने स्त्रीशूद्रादिकांना थोडक्यांत श्रीगुरुचरित्राची ओळख, उजळणी व…