bhondla songs lyrics
bhondla songs in marathi
bhondla songs mp3
bhondla songs in marathi lyrics
bhondla songs free download
bhondla songs for Navaratri
bhondla songs in marathi free download
bhondala
भोंडल्याची काही गाणी येथे नमूद करते आहे
ऐलोमा पैलोमा गणेश देवा :
कोथिंबिरी बाई गं, आता कधी येशील गं
माझ्या सुंदरीचं लगीन आई म्हणे मी आई
करीन मांडवात घाई
माझ्या सुंदरीचं लगीन भाऊ म्हणे मी भाऊ
आणीन नवरा पाहून
माझ्या सुंदरीचं लगीन बहिण म्हणे मी बहिण
जाईन पाठ राखीण
माझ्या सुंदरीचं लगीन मामा म्हणे मी मामा
येईन कामा धामा
माझ्या सुंदरीचं लगीन मामी म्हणे मी मानी
करीन चहापाणी
माझ्या सुंदरीचं लगीन आजा म्हणे मी आजा
खाईन तूप सांजा
माझ्या सुंदरीचं लगीन आजी म्हणे मी आजी
खाईन तूप सोजी
माझ्या सुंदरीचं लगीन काकू म्हणे मी काकू
देईन हळदी कुंकू
माझ्या सुंदरीचं लगीन भट म्हणे मी भट
धरीन अंतरपाठ
माझ्या सुंदरीचं लगीन भटीण म्हणे मी भटीण
सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंदरीचं लगीन
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाच लिंबांचा पानोळा, माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी झोळी, येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लागली राणी, अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी आहे यमुना जमुना, यमुना जामुनेची बारीक वाळू
तेथे खेळे चील्लार बाळ, चील्लार बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपल्याने दुध पाजले, निजरे निजरे चील्लार बाळा
मी तर जातो सोनार दादा, गौरीचे मोती झाले की नाही
गौरीचे मोती उद्या सकाळी पान सुपारी उद्या दुपारी
–शिवाजी आमुचा राजा
शिवाजी आमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला
किल्ल्यामध्ये सात विहिरी, विहिरीमध्ये एक कमळ,
एक कमळ तोडले, भवानी मातेला अर्पण केले,
तलवार घेउनी आला, हिंदूंचा राजा तो झाला
हिंदूंनी त्याचे स्मरण करावे, हत्त्यापुढे गाणे गावे
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला साप दे आणून त्याची दोरी दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं
–
नणंद भावजया दोघी जणीखेळत होत्या छप्पा पाणी
खेळता खेळता झगडा झाला, भावजयी वारी डाव आला
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
सासूबाई गेल्या समजवायला, चला चला सुनबाई आपल्या घराला, अर्धा संसार देते तुम्हाला,
अर्धा संसार नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
सासरे गेले समजवायला, सोन्याचा हार देतो तुम्हाला
सोन्याचा हार नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
नणंद आली समजवायला, माझी खेळणी देते तुम्हाला,
तुमची खेळणी नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
भावोजी आले समजवायला, जत्रेला घेवून जातो तुम्हाला,
जत्रेला नाही जायचे मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
पतीदेव आले समजवायला, उठा उठा राणी चला घराला
लाल चाबूक देतो तुम्हाला …………………
उठल्या राणी गडबडून, पदर घेतला आवरून
ओचा घेतला सावरून, हसत हसत आली घरासी
यादव राया राणी घरात आली ऐसी, सासुरवाशीण घरासी आली ऐसी……….
–
अरडी गं परडी, परडी एवढे काय गं
परडी एवढा फुल गं दारी आलं कोण गं बाई
आज आला सासरा गं बाई, सासऱ्याने काय आणलं गं बाई
सासऱ्याने आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा गं बाई, झिपरं कुत्रं सोडा ग बाई
आज कोण आलं गं बाई
आज आली सासू गं बाई, सासूने काय आणले गं बाई
सासूने आणली नथ गं बाई, नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा गं बाई, झिपरं कुत्रं सोडा गं बाई
आज कोण आलं गं बाई
आज आली नणंद गं बाई, नणंदेने काय आणलं गं बाई
नणंदेने आणले डूल गं बाई, डूल मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा ग बाई झिपरं कुत्रं सोडा ग बाई
आज कोण आलं गं बाई
आज आला दीर गं बाई, दिराने काय आणले गं बाई
दिराने आणले पैंजण गं बाई, पैंजण मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा गं बाई झिपरं कुत्रं सोडा गं बाई
आज कोण आलं गं बाई
आज आला नवरा गं बाई, नवऱ्याने काय आणले गं बाई
नवऱ्याने आणले मंगळसूत्र गं बाई
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारही दरवाजे उघडा गं बाई, झिपरं कुत्रं बांधा गं बाई
bhondla songs lyricsbhondla songs in marathi
bhondla songs mp3
bhondla songs in marathi lyrics
bhondla songs free download
bhondla songs pdf
bhondla songs in marathi free download
bhondala
Very Good Collection of songs. Very Useful. Thanks for the efforts taken to Upload.