नर्मदाष्टक Narmada Ashtak

श्री श्री नर्मदाष्टक
श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक

सबिन्दुसिन्धुसुस्खलत तरड्ग भड्गरन्जितं
द्विषत्सुपापजातक अरिवारि संयुतम |
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||१||

त्वदम्बुलीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकं
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकम|
सुम्त्स्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||२||

महागभीर नीरपूर पापधूत भूतलं
ध्वनत्समस्त पातकारि दारितापदाचलम |
जगल्लये महाभय मृकण्डुसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||३||

गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा
मृकण्डुसूनुशौनका सुरारिसेविसर्वदा |
पुनर्भवाब्धि जन्मसम्भवाब्धि दःखवर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||४||

अलक्षलक्ष किन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीर तीरधीअ पक्षिलकूजितम |
वसिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||५||

सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रिषटपदै: |
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषटपदै: |
रवीन्दुरन्तिदेवदेव राजकर्मशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||६||

अलक्ष-लक्ष-लक्षपाप-लक्षसार-सायुंधं
ततस्तु जीवजन्तुतन्तु भुक्तिमुक्तिदायकम |
विरन्चीविष्णुशंकर स्वकीय धामवर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||७||

अहोSमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे |
दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||८||

इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा |
सुलभ्य देहदुर्लभं महेशधाम गौरवम
पुरर्भवा न वै नरा विलोकयन्ति रौरवम ||९||

इति श्रीमत आद्यशंकराचार्यविरचितं नर्मदाष्टकं सम्पूर्णम |
नर्मदे हर | नर्मदे हर | नर्मदे हर ||

१) बिंदूपासून सिंधूपर्यंत अखंड तरंगाकार प्रवाहाने नटलेल्या आणि दुष्ट पापप्रवृत्तीमुळे प्राप्त होणा-या जन्मपरंपरेचा नाह करणा-या जलाने युक्त अशा तुझ्या चरणकमलांना, कालस्वरुप यमदूतांची भीती हरण करुन रक्षण करणा-या देवी नर्मदे, मी नमन करतो.
२) तुझ्या जलामध्ये विहरणा-या दीनदुबळ्या मत्स्यांना दिव्यता प्रदान करणा-या, कलियुगातील महादोषांचा परिहार करण्या-या सकलतीर्थांमध्ये वरिष्ठ अशा तुझ्या पादपद्मांना, प्रचंड मासे, कासवे आणि मगरींच्या समुदायांचे, तसेच चक्रवाक पक्ष्यांचे कल्याण करणा-या देवी नर्मदे, मी वंदन करतो.
३) महाप्रचंड पुराने भूतलावरील सारी पापे धुऊन काढणा-या आणि घनगंभीर नादाने पातकांच्या राशी आणि पर्वतप्राय संकटे यांचा चक्काचूर करणा-या तुझ्या चरणांबुजांना, प्रलयकालीन महाभयाच्या वेळी मार्कण्डेय ऋषींना आपल्या ठायी आश्रय देणा-या देवी नर्मदे, मी नमस्कार करतो.
४) मार्कण्डेय, शौनक, देवेंद्र ज्यांचे सदैव सेवन करतात, त्या तुझ्या जलाचे नुसते दर्शन होताच माझे भय कुठल्या कुठे पळून गेले. पुनर्जन्म तसेच संसारसागरातील दु:खांपासून कवचाप्रमाणे रक्षण करणा-या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी वंदन करतो.
५) अगणित किन्नर, देव आणि असुर ज्यांची पूजा करतात आणि ज्यांच्या तीरावरील लक्षावधी पक्षिगण जलाशय निरखीत धीटपणे अखंड कूजन करीत असतात, त्या तुझ्या चरणकमलांना, मुनिश्रेष्ठ वसिष्ठ , पिप्पलाद, कर्दमप्रभृतीचे कल्याण करणा-या देवी नर्मदे, मी नमन करतो.
६) सनत्कुमार, नचिकेत, कश्यप, अत्रि, नारदादी भृंगांनी ज्यांना आपल्या अंतःकरणात साठविले आहे, त्या तुझ्या पादपद्यांना, सूर्य, चंद्र, अन्तिदेव, देवराग इंद्र यांच्या सत्कर्मांना विश्वात प्रतिष्ठित करणा-या देवी नर्मदे, मी वंदन करतो.
७) दृष्टादृष्ट लक्षावधी पातकांच्या राशींचा भेद करणा-या, तसेच जीवजंतूंना भोग आणी मोक्ष प्रदान करणा-या तुझ्या चरणांबुजांना, ब्रम्हाविष्णुमहेशांना आपापल्या ठायी सुप्रतिष्ठित करणा-या देवी नर्मदे, मी नमस्कार करतो.
८) भगवान शंकरांच्या जटेतून निघालेल्या नर्मदेच्या तटावरील किरात, सूत, वाडव, पंडित, शठ, नट अशा समस्त जनांच्या मुखी अमृतोपम संजीवक असे नर्मदेचे गुणगानच ऐकू येते. दुस्तर पापतापांचा संहार करुन सकल जीवांचे कल्याण करणा-या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी नमन करतो.
९) हे नर्मदाष्टक नेहमी त्रिकाळी जे निरंतर पठण करतात ते कधीही दुर्गतीला जात नाहीत. एवढेच काय, मानवदेहातील अतिदुर्लभ आणि गौरवास्पद असे शिवपद अनायासे प्राप्त झाल्याने ते जन्मबंधनातून मुक्त होतात व रौरवादी नरकांचे त्यांना दर्शनही घडत नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *