मराठीत दत्तबावनी

मराठीत दत्तबावनी

जय योगीश्वर दत्त दयाळ II तूच एक जगती प्रतिपाळ II
अत्रनुसये करूनि निमित्त II प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥
ब्रम्हाSच्युत शंकर अवतार ॥ शरणांगतासि तू आधार ॥
अंतर्यामी ब्रम्ह स्वरूप ॥ बाह्य गुरू नररूप सुरूप ॥
काखिं अन्नपूर्णा झोळी ।। शांति कमंडलु करकमळी ॥
कुठे षड्भुजा कोठें चार ॥ अनंत बाहू तू निर्धार ॥
आलो चरणी बाळ अजाण ॥ दिगंबरा ,उठ जाई प्राण ॥
ऐकुनि अर्जुन- भक्ती- साद ॥ प्रसन्न झाला तू साक्षात ॥
दिधली ऋद्धि सिद्धी अपार ॥ अंती मोक्ष महापद सार ॥
केला का तू आज विलंब ॥ तुजविण मजला ना आलंब ॥
विष्णुशर्म द्विज तारूनिया ॥ श्राद्धिं जेविला प्रेममया ॥
जंभे देवा त्रासविले ॥ कृपामृते त्वा हांसविले ॥
पसरी माया दितिसुत मूर्त ॥ इंद्रा करवी वधिला तूर्त ॥
ऐसी लीला जी जी शर्व ॥ केली ,वर्णील कैसी सर्व ॥
घेई आयु सुतार्थी नाम ॥ केला त्याते तू निष्काम ॥
बोधियले यदु परशुराम ॥ साध्य देव प्रल्हाद अकाम ॥
ऐसी ही तव कृपा अगाध ॥ कां न ऐकशी माझी साद ? ॥
धांव अनंता पाही न अंत ॥ न करी मध्येच शिशुचा अंत ॥
पाहुनि द्विज पत्नीकृत स्नेह ॥ झाला सुत तू नि:संदेह ॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ॥ जडमुढ रजका तारी दयाळ ॥
पोटशुळी द्विज तारियला ॥ ब्राम्हण श्रेष्ठी उद्धरिला ॥
सहाय का ना दे अजरा ? ॥ प्रसन्न नयने देख जरा ॥
वृक्ष शुष्क तू पल्लविला ॥ उदास मजविषयी झाला ॥
वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने ॥ फळली झाली गृहरत्ने ॥
निरसुनी विप्रतनूचे कोड ॥ पुरवी त्याच्या मनिंचे कोड ॥
दोहविली वंध्या महिषी ॥ ब्राम्हण दारिद्र्या हरिसी ॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न क्षेम ॥ दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥
ब्राम्हण स्त्रीचा मृत भ्रतार ॥ केला सजीव , तू आधार ॥
पिशाच्च पिडा केली दूर ॥ विप्रपुत्र उठविला शूर ॥
अंत्यज हस्ते विप्रमदास ॥ हरूनी रक्षिले त्रिविक्रमास ॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ॥ दर्शन दिधले शैली नेक ॥
एकच वेळी अष्टस्वरूप ॥ झाला अससी , पुन्हा अरूप ॥
तोषविले निज भक्त सुजात ॥ दाखवुनि प्रचिती साक्षात ॥
हरला यवन नृपाचा कोड ॥ समता ममता तुजला गोड ॥
राम-कन्हैया रूपधरा ॥ केल्या लीला दिगंबरा ॥
शिला तारिल्या , गणिका , व्याध ॥ पशुपक्षी तुज देती साद ॥
अधमा तारक तव शुभ नाम ॥ गाता किती न होती काम ॥
आधि -व्याधि -उपाधि -गर्व ॥ टळती भावे भजता सर्व ॥
मूठ मंत्र नच लागे जाण ॥ पावे नर स्मरणे निर्वाण ॥
डाकिण ,शाकिण , महिषासूर ॥ भूतें ,पिशाच्चे ,झिंद असूर ॥
पळती मुष्टी आवळुनी ॥ धून -प्रार्थना -परिसोनी ॥
करूनि धूप गाइल नेमे ॥ दत्तबावनी जो प्रेमे ॥
साधे त्याला इह परलोक ॥ मनी तयाच्या उरे न शोक ॥
राहिल सिद्धी दासीपरी ॥ दैन्य आपदा पळत दुरी ॥
नेमे बावन गुरूवारी ॥ प्रेंमे बावन पाठ करी ॥
यथावकाशे स्मरी सुधी ॥ यम न दंडे त्यास कधी ॥
अनेक रूपी हाच अभंग ॥ भजता नडे न मायारंग ॥
सहस्र नामे वेष अनेक ॥ दत्त दिगंबर अंती एक ॥
वंदन तुजला वारंवार ॥ वेद श्वास हें तव निर्धार ॥
थकला वर्णन करतां शेष ॥ कोण रंक मी बहुकृत वेष ॥
अनुभवतृप्तीचे उद्गार ॥ ऐकुनी हंसता खाइल मार ॥
तपसि तत्वमसी हा देव ॥ बोला जयजय श्री गुरूदेव ॥

।। श्री गुरूदेव दत्त ॥

Leave a Comment

Dear Visitor,

We appreciate your support for our website. To continue providing you with free content, we rely on advertising revenue. However, it seems that you have an ad blocker enabled.

Please consider disabling your ad blocker for our site. Your support through ads helps us keep our content accessible to everyone. If you have any concerns about the ads you see, please let us know, and we’ll do our best to ensure a positive browsing experience.

Thank you for understanding and supporting our site.

Please disable your adblocker or whitelist this site!