श्री क्षेत्र नारेश्वर, गुजराथ येथील प.पू. श्री रंगावधुत स्वामींची ही श्री रंग बावनी

|| श्री रंग बावनी ||

ब्रम्हानंदि निमग्न शांत भगवन ज्ञानेश योगीश्वर |
रेवातीरि निवासी संत हृदय श्रीदत्त सिद्धेश्वर ||
भावातीत भवाब्धितारक गुरु श्रीरंग स्वामी प्रभू |
वासूदेव पदी सदा नत असे श्रीरंग भावे नमू ||
||अवधूत चिंतन श्री | गुरुदेव दत्त ||
|| सदा शुद्धचित्ती स्मरु रंग दत्त ||
||ओम श्रीरंग प्रसन्नो अस्तु||

जय सद्गुरु रंगावधुता | नित्य निरामय श्रीदत्ता |
मम माता तु बंधु पिता | सखा सोयारा हितकर्ता ||१||

सदैव वाहसि मम चिंता | तू माझा पालन कर्ता |
अवखळ जरि भाविक परि | श्रद्धेने भजतात हरि ||२||

त्यांच्या कल्याणासाठी | संत महंताचे पोटी |
निर्गुण होते साकार | परब्रम्ह घे अवतार ||३||

विठ्ठल बाबा तपोनिधान | रुक्मांबा सात्विक महान |
केवळ त्यांना करुनि निमित्त | अवतरले प्रभू श्रीगुरुदत्त ||४||

शुद्धपक्ष कार्तिकांत | नवमि प्रदोष काळांत |
प्रगटे गोध्रा गावांत | भाविक गुर्जर प्रांतात ||५||

पांडुरंग नामे नटला | नारेश्वराचा नाथ भला |
ब्रम्हा शिव विष्णू अवतार | भक्तांना करण्या भवपार ||६||

शांत दांत योगी श्रेष्ठ | ब्रम्हनिष्ठ अन तपनिष्ठ |
निबिडारण्यी वास करी | नारेश्वरी रेवा तिरी ||७||

स्वर्ग लोक पृथ्वी वरती | प्रांतोप्रांती ही ख्याती |
सद्भक्तांना ये प्रचिती | नित्य दर्शनासी येती ||८||

भाविक श्रद्धेने करती | अनुष्ठान स्थानावरती |
त्वरित तयांना फलप्राप्ती | आणि मिळते चिरशांती ||९||

चिन्मय मंगल नाम तुझे | दत्त दिगंबर दयानिधे |
अपराधी मी पतित जरि | सेवक आश्रित तुझा परि ||१०||

अज्ञानी मी मूढ जरी | भक्त तुझा रे खरा परी |
पूजातंत्रि अजाण जरे | भावे पूजा करी परी ||११||

श्रद्धेने भजतो नित्य | तव पदी स्थिर ठेउनी चित्त |
लीले पूजा करिती |त्यांना होते तव प्राप्ती ||१२||

सकल मनेप्सित मिळताती | अंती मिळते मोक्षगती |
श्रेष्ठी ऐसें वदताती | कोडे मज मी मंदमती ||१३||

फेडी माझी ही भ्रांती | तोवरी नसूदे विश्रांती |
अगाध लिला तू करिशी | कुंठित मति वर्णायासी ||१४||

भवानी शंकर शास्त्रींना | पिंडित दर्शन दिलेस ना |
कागद दिधले काकांना | यवन वेष तू धरुनी ना ||१५||

मग आत तू गप्प कसा | असशील येई त्वरे तसा |
डायाभाईंचा विस्फोटक | जयाबेनचा आजार अंतक ||१६||

बाबुभाईंचा ताप भयंकर | घालविले तुज स्मरता सर्वर |
मंगललालाकडे किती | जेउन उरले अन्न अती || १७||

ऐशा लिला नित्य किती | केल्या त्यांना नाही मिती |
जे तुज श्रद्धेने भजती | त्यांना काय कमी जगती ||१८||

जीवन रंगी रंगविले | ज्यांनी त्यांना तू दिधले |
सुख धन आणि जे भोग्य | यश किर्ती आयुरारोग्य ||१९||

मनकवडा म्हणतात तुला | जाणून दे मम मजसी मला |
विनम्र लिंबाचे झाड | तुझ्या कृपे पाने गोड ||२०||

वृक्षलताही उद्धरती | म्हणूनी मजला नाही क्षिती |
गाता तव मंगल कीर्ति | होईल आणि इच्छा पूर्ति ||२१||

सिद्धी सा-या होतील दास | करतील पायी नित्य निवास |
पापे त्वरीत जळतील | वांछित प्राप्तही होईल ||२२||

विश्वासा या ठेवोनी | विनम्र भावे तव चरणी |
आलो लोळत पतित जरी | शरणांगत मी मज तारी ||२३||

आता पाहू नको अंत | तारी मारी नसे खंत |
मारशील तर कृपानिधी | होईल ऐसे तरि कधी ||२४||

विलंब आता कां करसी | कृपा करी झणि मजवरती |
अवधूता रे अवधूता | नाही कशाची मज चिंता ||२५||

तव चरणी लोळण घेई | प्रसादकण तरि मज देई |
योगी तारक पतितांचा | बोला जय रंग अवधूता ||२६||

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *