Suvichar

🌸 ह्रदयस्पर्शी सुविचार 🌸
(@@@)

💯१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका…!!!💯

💯२) मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो…!!!💯

💯३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका…!!!💯

💯४) “मदत” एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात…!!!💯

💯५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते…!!!💯

💯६) पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते…!!!💯

💯७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात…!!!💯

💯८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही…!!!💯

💯९) लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…!!!💯

💯१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात 🏠 किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे…!!!💯

💯११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो…!!!💯

💯१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा…!!!💯

💯१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली…!!!💯

💯१४) स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, “स्त्रियांना येथे प्रवेश नाही”. कमाल आहे माणसा तुझी…!!!💯

💯जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत…💯

💯”एक” आपण जन्मभर ज्या “मी” बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही…!!!💯

💯”दोन” जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही…!!!💯

💯”तीन” क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय!..!!!💯  

💯मला कोणाची गरज नाही हा “अहंकार” आणि सर्वांना माझी गरज आहे हा “भ्रम” या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही…!!!💯

💯आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!💯

*💯 स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या…!!!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *