वार्षिक अंकभविष्य २०२१ : अंकांची जादू पाहा, येणारे नवीन वर्ष २०२१ कसे असेल ते जाणून घ्या

इतरांसाठी हा आठवडा कसा असेल, येत्या नवीन वर्षात कोणता मुलांक असलेले लोक आनंदाने प्रवेश करतील? सरत्या वर्षाचा शेवटचा आठवडा कसा असेल जाणून घेऊया अंक भविष्यानुसार…

 
numerology
मुलांकावरून आपल्या जीवनात येणाऱ्या बदलांबाबत खूप काही जाणून घेऊ शकतो. येणारे २०२१ साल कोणत्या मुलांकाच्या जीवनात चढ-उतार घेऊन येईल तसेच कोणाच्या जीवनात आनंद देणारे असेल जाणून घेऊ. अंकशास्त्रात याबाबत सविस्तर सांगितले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या जन्मतारखेवरून कसे असेल नवीन वर्ष…

अंक १ : आनंदाची बरसात असेल
१, १० आणि २८ तारखेला जन्म झालेल्यांचा मुलांक १ आहे. अंक १ हा ज्योतिषशास्त्रात सूर्याचे प्रतिनिधित्व करतो आणि नववर्षाच्या २०२१ अंकांची बेरीज म्हणजेच योग हा ५ आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य आणि बुध यांच्यात मित्रत्वाचे नाते असल्याकारणाने मुलांक १ असलेल्या लोकांचा ताळमेळ हा वार्षिक अंक ५ पेक्षा चांगला आहे.सूर्य हा आत्म्याचा आणि बुध हा बुद्धीचा ग्रह मनाला जातो त्यानुसार येणारे वर्ष हे तुमची बौद्धिक व मानसिक शक्तीच्या विकासाचे वर्ष असेल असे मानले जाऊ शकते. आत्मशक्ती व बुद्धीच्या जोरावर तुम्ही या वर्षात मोठ्या कामांना पूर्ण करण्यास सक्षम असाल. पण लक्षात ठेवा कि आत्मविश्वासाची जागा अतिआत्मविश्वासाने घेतली जाऊ नये नाहीतर वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या रागाचे कारण बनू शकता.
करीयरच्या दृष्टीकोनातून हे वर्ष खूप चांगले आहे असे म्हणू शकतो. एकीकडे जिथे नोकरदार वर्गाची पदोन्नती होईल तर दुसरीकडे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या नफ्यात वाढ होईल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जे विद्यार्थी मेहनत घेत आहे त्यांना या वर्षाच्या मध्यापासून चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनाचा विचार करता हे वर्ष सामान्य असेल.परंतु आपापसातील तक्ररांनी अहंकारामुळे वर्षाचे शेवटचे ४ महिने वैवाहिक जीवनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. प्रेमात बुडालेल्या प्रेमी जोडपे ज्यांना लग्न करायची इच्छा आहे ते या वर्षात विवाह बंधनात बांधले जाऊ शकतील. मुलांच्या लग्नाच्या काळजीत असलेल्या आई-वडिलांसाठी हे वर्ष सर्वोत्तम आहे कारण वर्षाच्या शेवटी ते आपल्या कर्तव्यातून व जबाबदारीतून मुक्त होतील.
आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले अनुकूल मानले जाऊ शकते. ज्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हाडाची समस्या आहे त्यांना वर्षाच्या सुरुवातीला या समस्येपासून आराम मिळण्याचे संकेत आहेत.एप्रिल, जुलै, ऑगस्ट आणि नोव्हेंबर या महिन्यात तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
उपाय : सूर्योदयाच्या आधी उठा. सूर्याला पाणी द्या आणि सूर्य मंत्राचा जप करा.
नशिबाची साथ – ६५%
शुभ दिवस : रविवार, मंगळवार, बुधवार

शुभ रंग : लाल
शुभ दिशा : पूर्व

अंक २ : चंद्र आणि बुध यांच्या समन्वयाने भरलेले वर्ष
जर तुमचा जन्म २, ११, २० आणि २९ या दिवशी झाला असेल तर तुमचा मुलांक २ मानला जातो. अंक ज्योतिष नुसार २ हा अंक चंद्राचे प्रतिनिधित्व करतो म्हणून तुम्ही चंद्राचा प्रभाव असलेली व्यक्ती आहात. वर्ष २०२१ चा वार्षिक अंक ५ आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधत्व करतो. यानुसार हे वर्ष चंद्र व सूर्याच्या संयोगाने भरलेले वर्ष मानले जाते. एकीकडे जिथे चंद्र तुमच्यात कल्पनाशक्ती व संवेदनशीलतेत भर घालेल तर दुसरीकडे बुध ग्रहामुळे तुमची बुद्धी व बुद्धीमत्ता याच वर्षात अधिक विकसित होईल.करियरचा विचार करता हे वर्ष आयटी, केमिकल आणि क्रिएटिव्ह कामांशी निगडीत लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहे. पण लक्षात ठेवा जास्त विचार करण्याची क्षमता असल्याने त्याचा तुमच्या वर्तमानातील कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवढे जमेल तेवढे काल्पनिक विचार सोडून वर्तमानातील कामांवर लक्ष केंद्रित करा.विद्यार्थ्यांना या वर्षी स्वःताला मानसिक नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे नाहीतर प्रभावी कल्पनाशक्ती असल्याने त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
प्रेमात बुडालेले प्रेमी जोडपे या वर्षी सुद्धा प्रेमातच असतील. परंतु वर्ष्याच्या मध्यावर विनाकारण घेतलेल्या संशयामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे सावधान राहा. वैवाहिक जीवनात सुद्धा सहजता टिकून असेल. तथापि जास्त अपेक्षांपासून नवरा-बायको दोघांनी लांब राहण्याची गरज आहे कौटुंबिक वातावरणावर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कफाशी संबंधित लोकांनी पूर्ण वर्ष काळजी घेणे आवश्यक आहे.खासकरून जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात विशेष काळजी घ्यावी.
उपाय : प्रत्येक सोमवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण स्वामींचे पठण करा.

नशिबाची साथ : ५५%
शुभ दिवस : सोमवार, गुरुवार
शुभ रंग : पांढरा, क्रीम
शुभ दिशा : उत्तर-पश्चिम

अंक ३ : यश प्राप्त करण्याची शक्यता जास्त आहे
तुमचा जन्म ३, १२, २१, ३० या दिवशी झाला असेल तर तुमचा मुलांक ३ मनाला जातो. हा मुलांक गुरु ग्रहाने प्रभावित आहे. कारण वार्षिक अंक २०२१ चा ५ आहे जो बुध आग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुमच्यावर गुरु आणि बुध यांच्या संयोगाने फलप्राप्ती होऊ शकते. एकीकडे गुरु ग्रह ज्ञानाचा व बुध हा बुद्धीचा ग्रह मानला जातो. यानुसार ज्ञान आणि बुद्धीचा समन्वय या वर्षी तुमच्यात दिसून येईल. एकीकडे जगामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा भरपूर वापर कराल तिथे दुसरीकडे तुमच्यात अध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची सजग वृत्ती बलशाली असेल. करीयरच्या दृष्टीने हे वर्ष शिक्षक, पत्रकार व वकील व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी आरामदायी वर्ष असेल. कॉमर्सचे विद्यार्थी किंवा न्याय क्षेत्रात काम करत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित स्वरूपात यश प्राप्त होईल. सरकारी नोकरी करणारे लोक या वर्षाच्या शेवटी शेवटी बदली तसेच पदोन्नतीसाठी पात्र असतील. वैवाहिक जीवनातील समजूतदार आणि ताळमेळ साधल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहिल.प्रेम करत असलेले जोडपे वर्षाच्या शेवटी घरच्यांच्या संमतीने विवाह बंधनात अडकताना दिसतील.आई-वडील जे मुलीच्या लग्नाच्या काळजीत आहेत त्यांना वर्षाच्या मध्यातच मे पासून जुलै पर्यंत चांगले परिणाम दिसून येतील. गुरु जो किडनी चा ग्रह मनाला जातो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने बुध आणि गुरूचा संयोग किडनीला अंशतः प्रभावित करू शकतो.संपूर्ण वर्षभर तुम्हाला पोट तसेच किडनीशी संबंधित समस्यांपासून सावधान राहण्याचे खूप गरज आहे.

उपाय : प्रत्येक गुरुवारी विष्णूसहस्रानामाचा पाठ करा.
नशिबाची साथ : ७५%
शुभ दिवस : गुरुवार, शनिवार
शुभ रंग : पिवळा, निळा
शुभ दिशा : उत्तर-पूर्व

अंक ४ : जवळच्या व्यक्तींबरोबर मतभेद होऊ शकतात
तुमचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ या तारखांना झाला असेल तर तुमचा मुलांक ४ मनाला जातो. हा अंक राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. वर्ष २०२१ चा वार्षिक अंक ५ आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. यानुसार तुमच्यावर या वर्षी राहू व बुध ग्रहाच्या संयोगाने फलप्राप्ती होणार आहे. बुध व राहू चा हा योग ४ अंक असलेल्यांसाठी हे वर्ष रहस्यमय असण्याची शक्यता आहे. एकीकडे जिथे अशक्य वाटणारी कामे विनासायास पूर्ण होत जातील तर दुसरीकडे सोपे वाटणारे कामे कठीण दिसू लागतील. ज्यांच्याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून संबंध चांगले नाही अशी माणसे तुमच्या समोर मित्रत्वाचा हात पुढे करतील आणि जे लोक तुमच्या खूप जवळ आहेत ते काहीसे लांब जातील. करीयरच्या दृष्टीने हळू हळू का होईना पण संधी प्राप्त होतील. विद्यार्थी या वर्षी थोडे गोंधळलेले असतील. त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. मनाला भटकू देऊ नका आणि वर्तमानातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे चांगले. संगणक व सॉफ्टवेअर संबंधित व्यवसायासाठी हे वर्ष अपेक्षेनुरूप असणार आहे. केमिकल व्यावसायिक सुद्धा नफ्यात असतील.
घरी मंगलमय कामासंबंधी शुभ सूचना मिळू शकते. त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्नाचा विचार करणाऱ्या आई-वडिलांना शांती मिळेल. प्रेम जीवनात निश्चिंतता असेल आणि एकमेकांप्रती समर्पणाचा भाव असेल.वैवाहिक जीवनात कुटुंबातील कोणा एकामार्फत कटुता निर्माण होऊ शकते.त्यामुळे कुटुंबातील तर्क-वितर्कांपासून स्वत:हाला जमेल तेवढे दूर ठेवा. रक्तदाब तसेच मधुमेह निगडीत समस्या वर्षाच्या शेवटच्या २ महिन्यात त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे तब्येतीबाबत निष्काळजीपणा करू नका. युरीक अॅसिड वर सुद्धा विशेष लक्ष द्या.

उपाय : प्रत्येक शनिवारी तंत्रोक्त देवी सुक्तम चा पाठ करा.
नशिबाची साथ : ७०%
शुभ दिन : शनिवार
शुभ रंग : डेनिम निळा, करडा (ग्रे)
शुभ दिशा : दक्षिण

अंक ५ : कार्यक्षेत्रात मनाजोगते यश मिळण्याचा योग
तुमचा जन्म ५, १४ व २३ ला झाला असेल तर त्याचा मुलांक ५ मनाला जातो. हा अंक बुध ग्रहाचे ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. या वर्षाचा अंक ५ आहे आणि ज्योतिषात ५ हा अंक बुध ग्रहाचा मनाला जातो. या वर्षात तुमच्या अंकाचा ताळमेळ हा अतिशय प्रभावी आहे कारण तुमचा मुलांक ५ आणि वार्षिक अंक सुद्धा ५ आहे. ज्या वर्षाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ते वर्ष हेच आहे २०२१. सर्वार्थाने प्रगती होईल आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. तसेच तुमची लोकप्रियता वाढेल. लोकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळेल तसेच तुमच्या वाईट कळत ज्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडाला होता अशांचा विश्वास संपादित करू शकाल. कोणत्याही कामाला नवीन पद्धतीने करण्याची तुमची सवय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. या वर्ष हार्ड वर्क ऐवजी स्मार्ट वर्क कारण्यावर भर असेल. काम करण्याच्या शैलीत बदल केल्याने मनाजोगते यश प्राप्त होईल.नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळेल.
प्रेम संबंधात प्रगल्भता येईल. जे प्रेमी लग्न करण्याच्या विचारात असतील त्यांच्यासाठी विवाह बंधनात अडकण्याचा हा योग्य काळ आहे. व्यस्त कामकाजामुळे वैवाहिक जीवनात पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. तरीसुद्धा जोडीदाराच्या समजूतदारपणामुळे व सहकार्याने पूर्ण वर्ष आनंदी असेल.
जुलै, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात आरोग्याच्या तक्रारी संभवतात. खासकरून साथीचे रोग किंवा पोटाशी संबंधित समस्येपासून सावधान राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पासून लांब राहण्यासाठी तंत्रोक्त देवीसुक्ताचे दररोज पठण करा.

उपाय : प्रत्येक बुधवारी कन्या पूजन करून हिरव्या वस्तूचे दान करा.
नशिबाची साथ :८०%
शुभ दिन : बुधवार
शुभ रंग : फिकट हिरवा
शुभ दिशा : उत्तर

अंक ६ :
तुमचा जन्म ६, १५ किंवा २५ तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक ६ मनाला जातो. हा अंक शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. वर्ष २०२१ चा वार्षिक अंक ५ आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या वर्षी तुम्हाला शुक्र आणि बुध ग्रहांच्या संयोगाने फलप्राप्ती होणार आहे. बुध आणि शुक्रमधील हा ताळमेळ चांगला मनाला जातो. शुक्र आणि बुध ग्रहाचा हा मुलांक ६ च्या लोकांसाठी या वर्षी अनेक शुभ वार्ता देणारा असेल. लॉकडाऊन मुळे गेल्या वर्षी जी कामे झाली नाहीत, खराब झाली ती कामे या वर्षी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण शुक्र ग्रह हा भोगाचा आहे आणि शुक्र व बुध ग्रहांच्या संयोगाने या वर्षी तुम्ही बौद्धिक क्षमतेचा वापर करून जीवनात भोगाची साधने प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल.विद्यार्थी अभ्यास कमी आणि मजा जास्त करतील परंतु वर्षाच्या शेवटच्या ४ महिन्यांमध्ये ते त्यांच्या करिअरप्रती गंभीर होतील.नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून सन्मान प्राप्त होईल.आणि व्यापार करणाऱ्यांना नफा मिळेल. चित्रपट क्षेत्राशी निगडीत लोक या वर्षी सुटकेचा निश्वास टाकतील. चिकित्सा सेवेशी संबंधित लोकांसाठी सुद्धा हे वर्ष फायद्याचे असेल. सोबत या वर्षी काही विशिष्ट मोक्याच्या क्षणी सन्मानित होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी मार्च ते ऑक्टोबर हा काळ नफा मिळवून देणारा असेल. स्त्रियांसाठी हे वर्ष भाग्यशाली असेल. मनाजोगता नवरामुलगा मिळेल आणि ज्या स्त्रिया अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधत होत्या त्यांना त्यांच्या इच्छेनुरूप नोकरी मिळेल. प्रेम जीवन हे तक्रार आणि लहान-सहान गोष्टींनी भरलेले असेल. जे लोक विवाह बंधनात बांधले गेले आहेत त्त्यांच्यासाठी या वर्षात आपापसात सामंजस्याने वागण्याची गरज आहे.जे आई-वडील आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ शोधत असतील त्यांचा शोध सुद्धा सुरवातीच्या समस्यांनंतर पूर्ण होईल. आरोग्याच्या दृष्टीने ज्यांना रक्तदाब आणि कफाचा त्रास आहे त्यांच्यासाठी त्रास देणारे असू शकते. वर्षभर काळजी घ्या.

उपाय : प्रत्येक रविवारी श्री सूक्ताचे पठण करा.
नशिबाची साथ : ८०%
शुभ दिवस : शुक्रवार, शनिवार
शुभ रंग : पांढरा, निळा
शुभ दिशा : दक्षिण – पूर्व

अंक ७ : मानसिक चढ-उतारांनी युक्त असेल.
तुमचा जन्म ७, १६, २५ या दिवशी झाला असेल तर तुमचा मुलांक ७ मनाला जातो. जो केतूचे प्रतिनिधित्व करतो. वर्ष २०२१ चा वार्षिक अंक ५ आहे तो बुध ग्रहाचे प्र्रातीनिधीत्व करतो. त्यानुसार तुम्हाला या वर्षी केतू आणि बुध ग्रहाच्या संयोगाने फलप्राप्ती होईल.
केतू हा मानसिक संतापाचा ग्रह आहे म्हणूनच ७ मुलांक असलेल्या लोकांसाठी हे वर्ष मानसिक दृष्ट्या अडचणींचे असेल. तथापि आपल्या कामात समर्पित असाल. परंतु वरिष्ठांकडून सहकार्य न मिळण्याने मन अशांत असेल.
साहित्य-संगीत आणि पोलिस सेवेशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष अतिशय चांगले असेल. जुलै ते सप्टेंबर हा काळ काही बदल घेऊन येईल. या काळात जागा बदलण्याचा योग असू शकतो. इंजिनीयरिंग करणाऱ्यांसाठी हे वर्ष फलदायी असेल. सोबत काही मोक्याच्या क्षणी सन्मान होण्याचा योग आहे. व्यापारी वर्गासाठी वर्षाचा मध्य एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंतचा काळ नफा मिळवून देणारा असेल. कपडे आणि चण्याचा वापर करणाऱ्यांनी बाजारातील उतार-चढवामुळे घाबरून जाऊ नका, नफा नक्की मिळेल. विद्यार्थ्यांसाठी खास करून कला विषयाच्या लोकांसाठी त्यांना नोकरी मिळण्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनातील शेवटचे चार महिने आपापसातील समस्येने अशांत असू शकतात. प्रेम जीवनातील लोकांसाठी हे वर्ष चांगले असेल. जोडीदाराबरोबर असलेली तक्रार प्रेमाने पूर्ण होईल. आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांशी संबंधित रोग वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्रासदायक ठरू शकतात. सावधान राहा.

उपाय : प्रत्येक दिवशी खाताना पहिला घास बाजूला काढून काळ्या कुत्र्याला देत जा.
नशिबाची साथ : ६५%
शुभ दिवस : मंगळवारशुभ रंग : लाल, काळा
शुभ दिशा : दक्षिण

अंक ८ : स्पर्धा परीक्षामध्ये याश्प्रप्तीचे संकेत.
जर तुमचा जन्म ८, १७ व २६ तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक ८ मनाला जातो. जो शनीचे प्रतिनिधित्व करतो. वर्ष २०२१ चा वार्षिक अंक ५ आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानुसार या वर्षी शनी आणि बुध ग्रहाच्या संयोगाने फलप्राप्ती होईल.
अंकांचा हा ताळमेळ पूर्ण वर्ष तुमच्यात सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम करेल. त्याचे फळ म्हणून मोठ्यातील मोठे काम सुद्धा तुम्ही या वर्षी पूर्ण करू शकाल. हे वर्ष तुमच्यात नवीन विचार तसेच उर्जेचा स्त्रोत बनून राहिल. सोबतच विचार आणि उर्जेच्या या प्रवाहामुळे तुम्ही तुमचे काम मन लावून पूर्ण कराल. आणि त्या कामात यश प्राप्त कराल. विद्यार्थ्यांना हे वर्ष खूप काही देऊन जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे वर्ष आनंदाची बातमी देऊन जाईल. या वर्षी शेअर आणि सट्टेबाजीच्या कामापासून लांब रहा अन्यथा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. प्रेम जीवनात प्रत्येक २ दिवसांनी वाद आणि एकमेकांबद्दलची शंका नाते खराब करेल. वैवाहिक जीवनात लहान-मोठ्या गोष्टीत होणाऱ्या तक्रारींवर मनाला दुःख होऊ शकते. प्रेमाशी संबंधित नाट्यात गोडवा असेल आणि वैवाहिक जीवनातील चालत आलेली कटुता या वर्षाच्या शेवटी संपून जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले असेल. जुन्या आजाराने जखडलेल्या लोकांना या वर्षात आराम मिळेल.

उपाय : प्रत्येक शनिवारी कासली मंदिरात नारळ किंवा तुपाचा दिवा लावा.
नशिबाची साथ : ८०%
शुभ दिवस : शनिवार
शुभ रंग : निळा
शुभ दिशा : पश्चिम

अंक ९ : नव्या कार्याची सुरुवात होईल.
तुमचा जन्म ९, १८, २७ या दिवशी झाला असेल तर तुमचा मुलांक ९ मनाला जातो. जो मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. वर्ष २०२१ चा वार्षिक अंक ५ आहे जो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानुसार हे वर्ष मंगळ आणि बुध ग्रहाच्या संयोगाने तुमच्यासाठी फलदायी असेल.
हे वर्ष मुलांक ९ असलेल्यांसाठी सामान्य स्वरूपाचे असेल. तुमची सगळी कामे सामान्य गतीने होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल. जुन्या मित्रांच्या संपर्कात आल्याने एक सकारात्मक उर्जा प्राप्त होईल. परंतु तुमचे बोलणे आणि रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्याने तुमचे मित्र तुमच्यावर नाराज होऊ शकतात. व्यापारी वर्गासाठी शेवटचे सहा महिने नफा मिळवून देणारे असतील. नवीन व्यवसायाची सुरुवात या काळात होऊ शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हे वर्ष फलदायी असेल. तथापि जे लोक भारतीय प्रशासन सेवा किंवा भारतीय इंजिनीअरिंग ची तयारी करत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. सरकारी किंवा वैयक्तिक संस्थांशी निगडीत लोकांची बदली होवू शकते. त्यांना मे-जून महिन्यात यश मिळेल. प्रेम जीवन आपापसातील गैरसमजांचे शिकार बनू शकतात. एकमेकांमधला विश्वास योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईल. या गोष्टीची काळजी प्रेमी जोड्यांनी घेतली पहिले. मे-जून तसेच नोव्हेंबर-डिसेंबर महिना जे मुलांचे लग्न करू इच्छितात त्यांच्यासाठी अनुकुल काळ आहे.

उपाय : प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे वाचन करा.
शुभ दिवस : मंगळवार
शुभ रंग : लाल
शुभ दिशा : दक्षिण

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *