यदा यदा ही धर्मस्य श्लोक मराठी अर्थ

यदा यदा ही धर्मस्य श्लोक मराठी अर्थ

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्‌11७1।

हे भावरत अर्जुना, जेव्हा जेव्हा परमधर्म परमात्म्यासाठी हृदय ग्लानीने भरून जाते, जेव्हा अधर्माच्या वृद्धीमुळे भाविक जन पैलतीर पोहचू शकत नाहीत; तेव्हा मी स्वरूपाची रचना करू लागतो. अशाच प्रकारची ग्लानी मनूला आली होती.

हृदय बहुत दुख लाग, जनम गयउ हरि भगति बिनु। (रामचरितमानस )

जेव्हा प्रेमस्वरूप अशा भक्ताचे हृदय प्रेमाने भरून येते, त्या शाश्चत धर्मासाठी *गदगद गिरा नयन बह नीरा‘ अशी त्याची स्थिती होते व जेव्हा प्रयत्न करूनही भक्त अधर्मावर मात करू शकत नाही- अशी जेव्हा स्थिती होते म्हणजे धर्माला जेव्हा ग्लानी येते- तेव्हा मी माझ्या स्वरूपाची रचना करीत असतो. अर्थात भगवंताचे हे प्रकटीकरण फक्त त्याच्या प्रेमळ भक्तांसाठीच असते.

सो केवल भगतन हित लागी। (रामचरितमानस १/१२/७)
आणि मग हा अवतार एखाद्या भाग्यवान साधकाच्या अंतरंगात होतो.

पण परमात्मा प्रकट होऊन काय करतो?

‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌।
धर्मसंस्थापनार्थांय संभवामि युगे युगे।।८।।

हे अर्जुना, *साधूनां परित्राणाय’ साधकांचे परमसाध्य फक्त परमात्म्याची प्राप्ती हेच असते व ते साध्य झाल्यावर त्यांना कोणतीही साधना करण्याचे शेष राहत नाही. ते साध्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणारे विवेक, वैराग्य शम-दम इत्यादी दैवी संपदेचे गुण साधकांमध्ये निर्विष्नपणे प्रवाहित करण्यासाठी तसेच ‘दुष्कृताम्‌’ ज्यामुळे कार्य दूषित
होते अशा काम-क्रोध, राग- द्वेषादि विजातीय प्रवृत्तींचा समूळ नाश करण्यासाठी तसेच धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो.
येथे युग म्हणजे सत्य युग, त्रेता, द्वापर युग असा अर्थ नाही. युगधर्मांचा चढउतार मनुष्य स्वभावावर अवलंबून आहे. युग-धर्माचे अस्तित्व सदैव असते.

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्धुंवा नीतिर्मतिर्मम।1७८।।


हे राजन, ज्या पक्षात योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन, (ध्यान म्हणजे धनुष्य होय, इंद्रियांची दृढता हे गाण्डीव आहे, अर्थात स्थिरतेबरोबर ध्यान धारण करणारा महात्मा अर्जुन) आहे त्याच पक्षाला राज्यलक्ष्मी, विजय- ज्याला हार नाही ईश्वरीय विभूती आणि चल संसारात अचल राहणारी नीती लाभेल, असे माझे मत आहे.

आज तर धनुर्धर अर्जुन नाही. मग ही नीती, विजय विभूती हे सर्व अर्जुनापुरतेच सीमित झाले काय? परंतु अशी गोष्ट नाही. योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितलेकी, मी सर्वांच्या हृदयात वसत असतो. आपल्या हृदयातही ते आहेत. अनुराग म्हणजे अर्जुन होय. अनुराग म्हणजे आपल्या अंत:करणाची इष्टदेवतेकडे पाहण्याची दृष्टी आहे, वृत्ती आहे. जर ईश्वराबद्दल असा अनुराग
तुमच्या हृदयात असेल, तर सदैव विजय तुमच्याजवळ आहे आणि अचल स्थिती देणारी नीतीही सदैव तुमच्याजवळ राहील- न की पूर्वी केव्हा होती. जोपर्यंत या जगात प्राणिमात्र असतील, परमात्म्याचा निवास त्यांच्या हृदयदेशात राहील. विकल आत्मा त्याला मिळविण्यासाठी इच्छुक राहील व त्यापैकी ज्यांच्या हृदयात त्याला प्राप्त करण्याची आवड, प्रेम उमळून येईल, तो. अर्जुनाच्या श्रेणीत बसेल, कारण अनुराग म्हणजेच अर्जुन होय. म्हणून मानवमात्र याच्याप्रमाणे कर्म करणारा, प्रेम करणारा बनू शकतो.

निष्कर्ष-

हा गीतेचा अंतिम अध्याय आहे सुरुवातीलाच अर्जुनाने प्रश्न केला होता की, हे प्रभू, त्याग आणि संन्यास या दोहोंतील फरक व त्यांचे स्वरूप मी जाणू इच्छितो. योगेश्वर श्रीकृष्णांनी यावर प्रचलित चार मतांची चर्चा केली. त्यातील एक खरेही होते. याला मिळता-जुळता निर्णय देताना योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की, कोणत्याही काळात यज्ञ, दान व तप॒ यांचा त्याग करू नये. इच्छा राखणाऱ्यांनाही या गोष्टी शुद्ध करतात. या तीन गोष्टींचे पालन करणे व याच्या विरोधी विकारांचा त्याग करणे म्हणजेच वास्तविक त्याग होय. याला सात्त्विक त्याग म्हणतात. फलांची इच्छा ठेवीत केलेला त्याग राजसी आहे आणि मोहवश होऊन कर्माचाच त्याग करणे म्हणजे तामसी त्याग आहे आणि संन्यासाचा त्याग करणे ही परमोत्कृष्ट अवस्था होय. नियत कर्म आणि ध्यानजनित सुख हे सात्त्विक सुख होय. इंद्रिये आणि विषयांचा भोग राजसी आहे आणि तृप्तीदायक असे अन्न आणि उत्पत्तीरहित दुःखद सुख तामसी असते.

मनुष्यमात्राकडून शाखाला अनुकूल किंबा प्रतिकूल कर्म होण्याची पाच कारणे आहेत- कर्ता (मन), पृथक्‌ पृथक्‌ करण-साधने (ज्यांच्या द्वारा क्रिया केली जाते. जर शुभ काम पार पाडावयाचे असेल तर विवेक, वैराग्य, शम, दम हे त्या कर्मांचे कारण असेल. तेच जर अशुभ-नीच प्रकारचे काम असेल तर काम, क्रोध, राग, द्वेष इत्यादी त्या कर्माचे कारण असेल), नाना प्रकारच्या अनंत इच्छा! इच्छा अनंत प्रकारच्या असतात. सर्वच पूर्ण होऊ शकत नाही. जी इच्छा पूर्ण करण्यासाठी आधार मिळतो तीच इच्छा पूर्ण होत असते. चौथे कारण आहे आधार (साधन) आणि पाचवे कारण आहे हेतू-दैव (प्रारब्ध किंवा संस्कार) प्रत्येक कार्य होण्यासाठी ही पाच कारणे असतात. परंतु जे कैवल्यस्वरूप परमात्म्याला कर्ता समजतात तो मूढबुद्धी मनुष्य यथार्थ जाणू शकत नाही. अर्थात भगवंत काही करीत नाहीत. मग अर्जुनाला तर तेच म्हणाले होते की, अर्जुना तू निमित्त मात्र होऊन उभा रहा. कर्ता धर्ता तर मीच आहे. मग त्या महापुरुषांचे म्हणणे काय आहे?

वास्तविक प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये एक आकर्षण रेखा आहे.
जोपर्यंत मनुष्य प्रकृतीच्या मर्यादेत वागत असतो, तोपर्यंत त्याला माया
प्रेरणा देत असते; आणि जेव्हा त्यापेक्षा वर जाऊन स्वतःला भगवंताला
समर्पित करतो आणि जेव्हा भगवंत हृदयरूपी देशाचे संचालक बनतात,
तेव्हा अशा आपल्या प्रेमळ भक्तासाठी भगवंत करीत असतात. अशा भक्तांच्या
श्रेणीत अर्जुन होता, संजयही होता. आणि सर्वांनी या स्तरापर्यंत पोहचण्याचा
प्रयत्न करावा. म्हणजे याठिकाणी भगवान स्वतः प्रेरणा देतात. पूर्ण ज्ञाता
महापुरुष, जाणून घेण्याचा विधी आणि ज्ञेय परमात्मा या तिन्ही गोष्टींच्या
संयोगाने कर्माची प्रेरणा मिळत असते. तेव्हा एखाद्या अनुभवी महापुरुषाच्या
(सदगुरुच्या) सान्निध्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वर्ण व्यवस्थेचा प्रश्न येथे चौथ्यांदा श्रीकृष्णांनी चर्चेला घेतला आहे.
त्यांच्या मते इंद्रियांचे दमन, मनाचे शमन, एकाग्रता, शरीर, वाणी आणि
मनाचा इष्टदेवाला अनुरूप असा निग्रह करणे, ईश्वराला जाणणे, ईश्वरीय
निर्देशाप्रमाणे चालण्याची क्षमता इत्यादी ब्रह्मामध्ये प्रवेश देववणारी योग्यता
ब्राह्मण श्रेणीचे कर्म आहे. शौर्य, मागे न हटण्याचा स्वभाव, सर्व प्रकारच्या
भावांवर स्वामीत्व, कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची दक्षता क्षत्रिय श्रेणीचे कर्म
आहे. शूद्र याचा अर्थ जातिविशेष नाही. शूद्र याचा अर्थ अल्पज्ञ, अल्प
ज्ञानी असा साधक नियत कर्माच्या चिंतनात दहा तास बसून दहा मिनिटेही
त्याचे चिंतन करू शकत नाही. शरीर अवश्य बसलेले आहे, पण तेथे
मनाचे जे स्थिर होणे ते मात्र जमत नाही. ते तर हवेत फिरत असते, अशा

साधकाचे कल्याण कसे होणार? त्याला आपल्यापेक्षा वरच्या अवस्थेतील
साधकाची सेवा केली पाहिजे अथवा सद्गुरुची सेवा करायला हवी. हळुहळू
त्यांच्यातही संस्कारांचे सृजन होईल, गती निर्माण होईल. म्हणजे या अल्प
ज्ञानी साधकाचे कर्म सेवेनेच सुरू होईल. कर्म एकच आहे- नियत कर्म,
चिंतन! त्याच्या कर्त्याच्या चार श्रेणी अति उत्तम, उत्तम, मध्यम आणि निकृष्ट म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र!

परमतत्त्व स्पष्ट करीत असताना त्यांनी सांगितले की, अर्जुना, आता
परम सिद्धी प्राप्त करण्यासाठी असणारा विधी सांगतो की, जी ज्ञानाची
उत्कृष्ट निष्ठा आहे, विवेक वैराग्य, शम, दम, निरंतर चिंतन आणि ध्यानाची
प्रवृत्ती, ब्रह्मामध्ये प्रवेश देववणारी सर्व प्रकारची योग्यता या सर्व गोष्टी
परिपक्व होतात, काम, क्रोध, मोह, राग-द्वेषादि या प्रकृतीमध्ये ओढणाऱ्या
प्रवृत्ती जेव्हा शांत होतात तेव्हा व्यक्ती ब्रह्मामध्ये जाण्यास योग्य होतात,
त्याच योग्यतेचे नाव पराभक्ती आहे. पराभक्तीद्वाराच तो तत्त्वाला जाणू शकतो.
पण तत्त्व म्हणजे काय? त्यांनी सांगितले की, ज्या विभूतींनी मी युक्त आहे.
त्याला तो जाणतो. अव्यक्त, शाश्वत, अपरिवर्तनशील अशा अलौकिक
गुणधर्मयुक्त मला परमात्म्याला तो जाणतो आणि असे जाणून तो तत्क्षणी
माझ्यामध्ये स्थिर होतो. हे तत्त्व-परमतत्त्व आहे. पाच की पंचवीस तत्त्वे
म्हणजे हे तत्त्व नाही. या परमतत्त्वाच्या प्राप्तीबरोबर आत्मा त्याच स्वरूपात
स्थिर होतो. त्याच गुणधर्मांनी तो युक्त होतो.

ईश्वराचा निवास सांगताना योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितले, अर्जुना, तो ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयदेशामध्ये निवास करीत असतो; परंतु मायारूपी यंत्रावर आरूढ होऊन लोक दुसरीकडे भरकटतात म्हणून ते इश्वराला जाणत नाहीत. म्हणून हे अर्जुना, तू हृदयदेशात स्थित असणाऱ्या त्या ईश्वराला शरण जा. यापेक्षाही गुह्यमम असे एक रहस्य आहे व ते म्हणजे संपूर्ण धर्मांची चिंता सोडून तू माझ्या आश्रयाला ये, म्हणजे तू मला प्राप्त होशील. हे रहस्य अनाधिकारी पुरुषाला सांगता कामा नये, जो भक्त नाही त्यालाही सांगता कामा नये; परंतु जो भक्त आहे त्याला अवश्य सांगितले पाहिजे, त्याच्याशी अंतर ठेवून बागलो- दुरावा ठेवला तर त्याचे कसे कल्याण होणार? शेवटी योगेश्वर श्रीकृष्णांनी विचारले- अर्जुना, मी तुला जे काही सांगितले ते तू नीट ऐकलेस ना? तुला ते नीट समजले ना? तुझा मोह नष्ट झाला की नाही? यावर अर्जुन म्हणाला, भगवन, माझा मोह नष्ट झाला आहे. मला कर्तव्याचे स्मरण झाले आहे. आपण जे सांगत आहात तेच सत्य आहे आणि आता मी तसेच करेन.

या दोघांचा संवाद ज्याने चांगल्या प्रकारे ऐकला तो संजय आपला
निर्णय देताना म्हणतो की, श्रीकृष्ण महायोगेश्वर आहेत व अर्जुन एक महात्मा
आहे. त्यांच्या संवादाचे वारंवार स्मरण करून तो आनंदित होत आहे, म्हणून
त्याचे (संवादाचे) वारंवार स्मरण करावे. त्या हरीच्या स्वरूपाला आठवूनही
तो वारंवार हर्षित होत आहे, तेव्हा वारंवार वासुदेवाचे स्मरण केले पाहिजे.
त्याचे ध्यान करीत राहिले पाहिजे. ज्या पक्षात योगेश्वर श्रीकृष्ण आणि महात्मा
अर्जुन आहेत तेथेच *श्री’ आहे. विजय-विभूती आणि श्रुवनीती पण तेथेच
आहे. सृष्टीची नीती आज आहे तर उद्या ती बदलेल. ध्रुव तर एकच परमात्मा
आहे. त्यात प्रवेश देवविणारी नीती, ध्रुवनीतीपण तीच आहे. जर कृष्ण
आणि अर्जुनाला द्वापारकालीन व्यक्तीविशेष मानले, तर आज अर्जुनही नाही
व श्रीकृष्णही नाही. आपल्याला तर विजयही मिळवायचा नाही, ना विभूती.
मग तर गीता आपल्यासाठी व्यर्थ आहे. परंतु नाही, श्रीकृष्ण एक योगी होते.
प्रेमळ हृदयाचा महात्मा अर्जुन आहे. ते दोघेही सदैव राहतात व सदैव
राहतील. श्रीकृष्णांनी आपला परिचय देताना सांगितले की, मी अव्यक्त
असलो तरी ज्या भावाला मी मिळलो आहे, तो ईश्वर सर्वांच्या हृदयदेशात
निवास करतो. त्याचा सदैव तेथेच वास असतो व सदैव राहील. सर्वांनी त्या
ईश्वराला शरण गेले पाहिजे. शरण जाणाराही महात्मा आहे, अनुरागी आहे व
अनुराग म्हणजेच अर्जुन होय. यासाठी एखाद्या स्थितप्रज्ञ महापुरुषाला शरण
जाणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तेच स्फूर्ती देणारे- प्रेरणा देणारे प्रेरक
आहेत.

या अध्यायात श्रीकृष्णांनी संन्यासाचे स्वरूप स्पष्ट केले आहे की, सर्वस्वाचा त्याग म्हणजेच संन्यास होय. केवळ वेष धारण करणे म्हणजे संन्यास नव्हे; परंतु याच्या बरोबर एकांताचे सेवन करीत, नियत कर्मात आपली शक्ती समजून अथवा समर्पणाबरोबरच सतत प्रयत्नशील राहणे अपरिहार्य आहे. प्राप्तीबरोबरच संपूर्ण कर्माचा त्याग म्हणजेच संन्यास होय, जो मोक्षाचा पर्याय आहे. हीच संन्यासाची पराकाष्ठा आहे.

Leave a Comment

Dear Visitor,

We appreciate your support for our website. To continue providing you with free content, we rely on advertising revenue. However, it seems that you have an ad blocker enabled.

Please consider disabling your ad blocker for our site. Your support through ads helps us keep our content accessible to everyone. If you have any concerns about the ads you see, please let us know, and we’ll do our best to ensure a positive browsing experience.

Thank you for understanding and supporting our site.

Please disable your adblocker or whitelist this site!