Garana In Malvani – गाऱ्हाणं गाऱ्हाणा Garhana Gaarhaanaa Ganapati Marathi

बा देवा गणपती महाराजा…. 🙏🙏🙏🙏🙏
हे गणराया,हे शंकर-पार्वती पुता हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोरया आज तुका तुझ्या चरणी लिन होवुन गार्‍हाणा घालतय महाराजा.🙏🙏🙏 आज ह्यो पर मुलुखात पोटा पाण्यासाठी चाकरी करणारो चाकरमनी तुझी सेवा चाकरी करुक गावाक येता तर त्याचो प्रवास सुखाचो होवुदें रे बा महाराजा…
वाटेत काय आडअडचण इडा पिडा, वाकडा नाकडा असात तर ता दूर करुन लेकरा बाळांका सुखरुप गावाक पोचांदे रे महाराजा..
हे देवा महाराजा सगळ्या गाववाल्यांका सुखी ठेवुन त्यांच्या मनात काय इच्छा हेतु असलो तर तो परीपुर्ण कर तसाच त्यांच्या हातुन खय काय बरा वाईट झाला असात तर ता पदरात घेवुन सगळे पिलगेक तुझ्या छत्र छायेत घे रे बॉ महाराजा.
सगळ्यांची सदैव भरभराट होवुन अशीच त्यांका तुझी सेवा चाकरी करुची वर्षांन वर्षे संधी लाभुदें रे महाराजा
ह्याच तुका तुझ्या चरणी लिन होवून आमचा सांगणा महाराजा. “होय महाराजा”…..

===================================

Hoy Maharaja!! Malvani Garana
marathi garhane
malvani ganpati garana lyrics
malvani garana lyrics

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *