श्रीदत्तचम्पूः

श्रीदत्तचम्पूः

प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामीमहाराजांनी श्रीदत्तचम्पू ह्या काव्याची रचना कयाधू नदीच्या कांठीं नरसी (महाराष्ट्र) येथे शके १८२७ (इ.स. १९०५) च्या त्यांच्या १५व्या चातुर्मासांत केली. चम्पू म्हणजेच गद्यपद्यात्मक काव्य. विविध शब्दालंकार व अर्थालंकारांनी म्हणजेच चमत्कृतींनीं नटलेलें (चं) व ग्राहकाला दत्तभक्तीने पुनीत करणारें (पू) काव्य म्हणूनही याला दत्तचम्पू असे अन्वर्थक अभिधान दिले असावे. या काव्यावर प.प. श्रीस्वामीमहाराजांची स्वतःची टीका पण आहे. त्यांत त्यांनी ह्या ग्रंथाच्या रचनेमागील आपली भूमिका कांहीशी अशी सांगितली आहे. ऋग्वेदाच्या सहाव्या व आठव्या अष्टकांत विश्वांतील सर्व काव्यें ईश्वरस्वरूपाच्या आंसाभोंवती फिरणाऱ्या चक्राप्रमाणें आहेत पण त्या स्वरूपाला मात्र ते स्पर्शूं (जाणूं) शकत नाहींत. तथापि त्या परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचें स्वशक्तीनें गुणगान करून माझी वाणी पवित्र करावी असा माझा प्रयत्न आहे.

तीन स्तबकांचें आणि सुमारे साडेतीनशें श्लोकांचें हें काव्य आहे. त्यांत अनुक्रमें कार्तवीर्यार्जुन, अलर्क व आयु या दत्तभक्त राजांची चरित्रें आली आहेत. म्हणजे श्रीदत्तपुराणांतीलच विषय आहेत. त्याच अनुषंगानें आचारधर्म (पातिव्रत्य, राजधर्म इ.), योग, भक्ति इ. विषयांचेंही प्रासंगिक मार्मिक विवेचन आलें आहे. संस्कृत काव्याच्या अभ्यासकाला व आध्यात्मिक साधकालाही तितकाच उपकारक असा हा ग्रंथ आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *