Sanskar Mala

।। नम्रता ।।

🌹पायातुन काटा निघाला की,चालायला मजा येते.तसा, मनातुन अहंकार निघाला की,आयुष्य जगायला मजा येते.

🌹मोठ्या लोकांच्या शेजारी राहिलं, म्हणजे मोठं होता येते कि नाही ते माहित नाही.पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत

🌹”शिक्षण”, “डिग्री”, “पैसा” यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो.तर “कष्ट”, “अनुभव” व “माणुसकी” हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते…

🌹पूर्ण जग जिंकता येते संस्कारने.!आणि,जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने..!!

🌹एकाच वेळी हजार ध्येये ठेवण्यापेक्षा, हजारवेळा एकच ध्येय ठेवा.तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही घडवाल.

🌹आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात.काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो,तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो,हीच आयुष्याची गंमत आहे.

🌹नातं हे रबरासारखं असतं एकाने सोडून दिल्यावर ज्याने घट्ट धरून ठेवलय त्यालाच जास्त लागतं

🌹लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही _तसेच.हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनंही जुळत नाहीत …!!

🌹प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,कारण लाेकं सुखांना नजर लावतात आणि दु:खावर मीठ चाेळतात.

🌹 झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालविणे हा होत नाही.प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते वडीलधाराऱ्यांचे आशिर्वाद त्याचपैकी एक आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *