रामाची कर्पूरआरती

रामाची कर्पूरआरती

 

धूप दीप झाला आता कर्पूर आरती । रामा कर्पूर आरती ॥
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ धृ ॥

कर्पूरवडीसम मानस माझे निर्मळ राहू दे । रामा निर्मळ राहू दे ॥
कर्पूरवडीचा भावभक्तिचा सुगंध वाहू दे । रामा सुगंध वाहू दे ॥
कर्पूरवडीची लावून ज्योत, पाहीन तव मूर्ति । रामा पाहीन तव मूर्ति ॥
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ १ ॥

ध्यान कळेना,ज्ञान कळेना ना कळे काही । रामा ना कळे काही ॥
शब्दरूपी गुंफ़ुनि माला वाहतो पायी । रामा वाहतो पायी ॥
मुखी नाम, नेत्री ध्यान, हृदयी तव मूर्ति । रामा हृदयी तव मूर्ति ॥
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ २ ॥

कर्पूरगौरं करुणावतारं ।
संसारसारं भुजगेन्द्रहारम ।
सदावसन्तं हृदयारविन्दे ।
भवं भवानीसहितं नमामि ॥

कर्पूरारार्तिक्यदीपं समर्पयामि ॥

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *