Marathi people in Pakistan Karachi
Marathi people in Pakistan Karachi भोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे… या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीतून बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी…