जिव्हा प्रार्थना – Tongue Pray
जिव्हा प्रार्थना
मत्प्रिय सखी मत्जिव्हे मयप्नुकंपां कुरुष्व नौमि त्वाम|
अन्यापवादरहिता भज सततमों नमः शिवायेति||१||
वाणी गुणानुनिलये त्वां वंदे मा कुरुष्व परनिंदाम|
त्यज सकललोकवार्ता भज सततमों नमः शिवायेति||२||
कट्वम्ललवाणतिक्तस्वादुकषायादिसर्वरसवांछाम|
जिव्हे विहाय भक्त्या भज सततमों नमः शिवायेति||३||
रसने रचितोयमंजलिस्ते परनिंदापरुषैलरं वचोभि: ||
दुरितापहं नमः शिवायेत्यमुमादिप्रवणं भजस्व मंत्रम||४||
इति श्रीमत आद्यशंकराचार्य विरचितं जिव्हा प्रार्थना संपूर्ण
अर्थ – (१) हे जिव्हे तू माझी खरोखरच अत्यंत आवडती मैत्रिण आहेस. मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर दया कर. माझी एक प्रार्थना ऐक दुसर्या कोणाचीही निंदा चहाडी करु नकोस. ॐ नमः शिवाय हा मंत्र सतत जप. (२) ओज, प्रसाद, माधुर्य, सत्यत्व इत्यादि जे वाणीचे गुण आहेत, ते सर्व तुझ्याजवळ आहेत. मी तुला नमस्कार करतो. दुसर्यांची निंदा करु नकोस. दुसर्यांच्या सर्व व्यवहारांची सुद्धा चर्चा करु नकोस. लोकनिंदेत किंवा लोकांच्या अवगुणांची चर्चा करण्यात व्यर्थ काळ घालवू नकोस. ॐ नमः शिवाय हा मंत्र सतत जप. (३) तिखट आम्बट , खारट, कडू, गोड आणि तुरत इत्यादि सर्व रसांची इच्छा, षड्रस पक्वांनांची अभिलाषा सोडून देऊन, हे जिव्हे प्रेमाने , भक्तीने सर्व काळ ॐ नमः शिवाय हा मंत्र जप. ९४) हे जिव्हे मी तुला हात जोडून नमस्कार करतो, माझी कळकळीची विनंती ऐक, परनिंदेचे कठोर शब्द बोलण्याचे सोडून दे. सर्व पातकांचा निरास करणारा प्रणवपूर्वक नमः शिवाय हा मंत्र सर्व पापांचा नाश करणारा आहे म्हणून, ॐ नमः शिवाय हा मंत्र सतत जप.