“आद्य शंकराचार्य विरचित तुळजाष्टक” टाईप करण्याचा योग शेवटी आज जुळुन आला! २६ ऑक्टोबर २००१ च्या ‘सकाळ’च्या दसरा विशेष पुरवणीत श्री. वा.ल. मंजूळ यांचा “एक दुर्मिळ हस्तलिखित” असा लेख छापुन आला होता! त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना श्री तुळजाभवानी स्तोत्र या ग्रंथाचे लहानसे हस्तलिखित मुंगी-पैठण येथे, श्री कृष्णदयार्णवांच्या सांप्रदायिक सनातन मठामधे मिळाले. त्या लेखातील काही भागः
आद्य शंकराचार्यांनी तुळजाभवानीची सेव तुळजापुरी गेल्यावर संस्कृत आठ श्लोक रचुन केली आहे. आचार्यांच्या कोणत्याही ग्रंथात या स्तोत्राचा समावेश नाही.
तीन पानांच्या या स्तोत्राचे हस्तलिखित १०x १५ सें.मीं आकाराचे आहे. कागद पातळ, पिवळे, जीर्ण आहेत. ‘पिपिलीका (मुंगी) नगरे, सनातन गुरु सन्निधौ, गोदावरी तटे’ लिहिल्याचा त्यावर उल्लेख आहे. हा मजकूर शके १७९० मधे ( म्हणजे १४१ वर्षांपूर्वी ) नकलून घेतलेला आहे.
||श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टकम||
दुग्धेन्दु कुन्दोज्जवलसुंदराङ्गीं
मुक्ताफलाहार विभूषिताङ्गीम|
शुभ्राम्बरां स्तनभरालसाङ्गीं
वन्देहमाद्यां तुलजाभवानीम ||१||
बालार्कभासामतिचा रुहासां
माणिक्य मुक्ताफल हार कण्ठीम|
रक्तांबरा रक्तविशालनेत्रीं
वन्देsहमाद्यां तुलजाभवानीम ||२||
श्यामाङ्गवर्णां मृगशावनेत्रां
कौशेवस्त्रां कुसुमेषु पूज्याम|
कस्तुरिकाचन्दनचर्चितांगी,
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||३||
पीताम्बरां चम्पक कान्ती गौरीम
अलङकृतामुत्तममण्डनैश्च|
नाशाय भूतां भूवि दानवांनां,
वन्देSमाद्यां तुलजाभवानीम ||४||
चन्द्रार्कताटङ्कधरां त्रिनेत्रां
शूल दधानामतिकालरुपम|
विपक्षनाशाय धृतायुधां तां,
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||५||
ब्रम्हेन्द्र नारायणरुद्रपूज्यां
देवांगनाभि: परिगीयामानाम |
स्तुतांवचोभिर्मुनिनारदा द्यै:
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||६||
अष्टांग योगे: सनकादिभिश्च,
ध्यातां मुनीन्द्रैश्च समाधीगम्याम |
भक्तस्य नित्यम भूवी कामधेनुं,
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||७||
सिंहासनस्थां परिवीज्यमानां
देवै: समस्तैश्च सुचामरैश्च |
छत्रं दधाना अतिशुभ्रवर्णं
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||८||
पूर्णः कटाक्षोSखिललोकमातु:
गिरीन्द्रकन्यां भजतामसुधन्याम |
दारिद्र्यकं नैव कदा जनानां
चिन्ता कुत:स्यात भवसागरस्य ||९||
तुलजाष्टकमिदं स्तोत्रं
त्रिकालं यः पठेत नरः |
आयु: कीर्ति यशो लक्ष्मी
धनपुत्रानवाप्नुयात ||१०||
इति श्रीमच्छङ्कराचार्या विरचितम तुलजादेवीस्तोत्रं संपूर्णम ||
शुभं भवतु, शके १७९०, विभावनाब्दे माघ शुक्ल तृतियाथां भृगुवासरे श्रीमत पिपिलीकाक्षेत्रे, गोदायाम, तटस्थित श्री सनातन सद्गुरुसमाधी सन्निधौ लिखितम ||
श्री. व. ल. मंजूळ यांनी प्रत्येक श्लोकाचे अतिशय सुंदर सहज भाषांतर ही या लेखात आहे.