वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना ……. [ वाचनात आलेली ]
चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !
मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !
चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !
मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !
जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!
त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !
प्रार्थनेचा अर्थ : हे मुनिश्रेष्ठा , तू ज्याप्रमाणे दीर्घायुषी रुपधनबुध्दीने युक्त आहेस तसा मी सुध्दा होवो. हे आदरणीय मुनिश्वरा, दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी माझ्यावर प्रसन्न हो. सात कल्पांपर्यंत जीवन असणार्या महाभाग्यवान मार्कंण्डेय ऋषीश्वरा, आयुष्य, आरोग्य आणि यशासाठी आम्हाला वर देणारा हो. विश्वाची माता असणार्या, विश्वाला आनंदित करणा-या , माझे कल्याण करणा-या हे षष्ठीदेवी तुला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्रैलोक्यात ब्रह्माविष्णूमहेशासह स्थावर सचेतन आणि जे जे सजीव प्राणी आहेत ते माझे रक्षण करोत.