Essay on Navratri in Marathi language
वैदिक धर्मानुसार परब्रह्म उपासना सुरू झाली. या परब्रह्माची शक्ती म्हणजे माणसांतील मातृभाव. म्हणूनच अगदी उपनिषद काळापासून या मातृभावाला शक्तिरूप मानून तिची उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते. यासाठी तिची अनेक रूपे निर्माण होऊन सगुणोपासनेसाठी समाजाने तिचे सुलभीकरण केले. आदिमाया, महाशक्ती, महामाया अशा रूपांत ती अवतरली. कधी तारक तर; कधी संहारक/मारक ठरली. समूहाने जगताना समाजाने या तारक/मारक शक्तीला ग्रामदेवतेचे स्थान दिले. मुंबई हे एकेकाळी गावच होते. पुढे ते नगर झाले; त्यानंतर महानगर. समाजधारणेसाठी मुंबईतही देवतांची प्रतिष्ठापना झाली. त्यांपैकीच मुंबईतील काही प्रमुख देवीस्थाने…
प्रभादेवी
यादवांच्या शासनकाळात प्रभावतीदेवीचे मंदिर १२९५ साली बांधले गेले. पुढे पोर्तुगीज आक्रमणाच्या काळात १५१९ मध्ये देवीची मूर्ती जवळच्या विहिरीत दडवली म्हणून ती वाचली. देऊळ मात्र उदध्वस्त झाले. मग १७२६ मध्ये मूर्ती बाहेर काढून सध्याच्या मंदिरात तिची प्राणप्रतिष्ठा झाली. १८७३मध्ये देवळाची पुन्हा दुरुस्ती झाली. ही पाठारे प्रभू भाविकाने केली. तेव्हा प्रभावतीचे प्रभादेवी असे नामकरण झाले. मंदिरात तीन गाभारे असून प्रभादेवी, सर्वेश्वर शिव आणि लक्ष्मीनारायण अशा मूर्ती त्यात विराजमान आहेत. १५० वर्षांपूर्वीच्या दोन दगडी दीपमाळा या मंदिराची शोभा वाढवितात.
काळबादेवी
मुंबादेवी परिसराजवळच्या काळबादेवी भागात या देवीचे खूप जुने देऊळ आहे. आकाराने लहान असललेल्या या देऊळाला सभामंडप नाही, पण घुमट आहे. देवळाला आणि चारही बाजूस ऋषींचे पुतळे आहेत. प्रवेशद्वारी दगडी आणि लाकडी अशा चार दीपमाळा आहेत. चार-चार हात असलेल्या गाभाऱ्यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा पाषाणी मूर्ती आहेत. पायाजवळ दगडी सिंह आहे. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने इथे भाविकांची सदैव वर्दळ असते.
वैकुंठमाता
मुंबादेवीप्रमाणेच माझगावजवळच्या डोंगरावरची वैकुंठमाता मुंबईची ग्रामदेवता मानली जाते. समोर अथांग समुद्र आणि तुलनेने शांत परिसर. असे म्हणतात की, १७३७ मध्ये वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यावर पेशवे सेनापती चिमाजी अप्पा या देवीच्या दर्शनाला आला होता. त्याने देवळाचा जीर्णोद्धार केला.
महालक्ष्मी
ब्रीच कॅण्डीजवळ त्याकाळच्या मुंबई बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर खडकांच्या उंचवट्यावर सागरकिनारी हे महालक्ष्मीचे देवालय आहे. मुंबईचे आद्य नागरिक असणाऱ्या पाठारे प्रभू समाजाने हे देऊळ उभे केले. १८९३ पूर्वी हे उभे राहिले. या देऊळबांधणीची कहाणी आहे. रामजी शिवजी हा पाठारे प्रभू महालक्ष्मी ते वरळीपर्यंतच्या रस्त्याचा कंत्राटदार होता. समुद्राच्या लाटांमुळे रस्ताबांधणीत अडथळे आले तेव्हा महालक्ष्मी त्याच्या स्वप्नात आली. त्या स्वप्नदृष्टांताप्रमाणे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या तिघी बहिणींना समुद्रातून काढून वसविल्यावर रस्त्याचे काम सुरळीत झाले. १७६१ ते १७७१ पर्यंत हे बांधकाम चालले. नंतर १८९३ आणि १९८८ साली या मंदिराची पुनर्बांधणी झाली. गाभारा, सभामंडप, मागेपुढे आवार अशी देवळाची प्रशस्त रचना आहे. तिन्ही देवीमूर्ती काळ्या पाषाणाच्या असून, त्यांना चांदीचे मुखवटे चढवले आहेत. महालक्ष्मी वाघाच्या पाठीवर बसलेली चतुर्भुज अशी साडेसात फुटांची देखणी आणि आश्वासक रूपी आहे. महासरस्वती दोन फुटी; तर महाकाली अडीच फुटी असून, समोर दगडी सिंह आहे. पाठारे प्रभू, शिंपी, सोनार भाविकांनी दीपमाळा बांधलेल्या आहेत. नवरात्रात इथे भाविकांचा महापूर लोटतो, जत्रेचेच तिथे उत्सवी रूप असते.
मुंबादेवी
‘मुंबा’ हा शब्द ‘महा अंबा’वरून आला. मुंबई हे नाव मुंबाआईवरून मुंबाई आणि नंतर मुंबई असे झाले. मुंबादेवीचे मूळ मंदिर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या (म्हणजे पूर्वीचे व्ही.टी. स्थानक) जागी होते. ५०० वर्षांपूर्वी ते बांधले गेले. मग स्थानकाच्या विस्तारीकरणामुळे १७३७ मध्ये ते पाडले. कोळी समाजाचे हे दैवत. पुढे १८०३ मध्ये पांडुरंगशेठ सोनार यांनी सध्याच्या जागी; म्हणजे दक्षिण मुंबईतील झवेरी बाजाराजवळ मंदिर बांधले. दुमजली अशा या मंदिरात भिंतींमध्ये सुंदर कलाकुसर आहे. (‘पॅलेडियन’ शैलीतील) अर्धवर्तुळाकार सज्जे आहेत. आज या मंदिराजवळच गणेश, मारूती, शंकर, लक्ष्मीनारायण आदींची अनेक मंदिरे उभी आहेत. दगडी दीपमाळांनी हा परिसर सुशोभित आहे.
मुंबईतील ‘श्रद्धास्थाने’
वैदिक धर्मानुसार परब्रह्म उपासना सुरू झाली. या परब्रह्माची शक्ती म्हणजे माणसांतील मातृभाव. म्हणूनच अगदी उपनिषद काळापासून या मातृभावाला शक्तीरूप मानून तिची उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते. यासाठी तिची अनेक रूपे निर्माण होऊन सगुणोपासनेसाठी समाजाने तिचे सुलभीकरण केले. आदिमाया, महाशक्ती, महामाया अशा रुपात ती अवतरली. कधी तारक तर; कधी संहारक/मारक ठरली. समुहाने जगताना समाजाने या तारक/मारक शक्तीला ग्रामदेवतेचे स्थान दिले. मुंबई हे एकेकाळी गावच होते. पुढे ते नगर झाले; त्यानंतर महानगर. समाजधारणेसाठी मुंबईतही देवतांची प्रतिष्ठापना झाली. त्यापैकीच मुंबईतील काही प्रमुख देवीस्थाने.
जोगेश्वरी देवी –
पाचव्या शतकाच्या सुमारास जोगेश्वरी येथील गुंफालेण्यात हिची स्थापना झाली. असं म्हणतात की, वसईतील पोर्तुगीज आक्रमणानंतर या देवीला वाचविण्यासाठी गुहेत ही दडविली गेली. हनुमान जयंती, महाशिवरात्र आणि आश्विनी नवरात्र असे वार्षिक उत्सव इथे होतात. प्रवेशद्वारी दोन दगडी दीपमाळा आहेत. पूर्व-पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. विशेष म्हणजे सभामंडपाच्या मध्यभागी देवीचा गाभारा आहे. अतिक्रमणामुळे गुंफेवरील टेकडीवर वसाहती झाल्यामुळे हे देवालय काहीसे घुसमटलेल्या अवस्थेत आहे. मात्र पूजाअर्चा नित्य होत असते. मळिवली येथील एकवीरा देवीचेच हे मूळ रूप मानले जाते. अनेक पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू यांची ही कुलदेवता आहे.
शीतलादेवी
महिकावती (माहीम) ही यादवांची राजधानी होती. खरे तर इंग्रजांनाही हीच राजधानी अपेक्षित होती; पण पोर्तुगीजांच्या भयाने त्यांनी विचार बदलला. यादवांच्या काळापासून या देवीचे पूजन होत आले आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून दगडी दीपमाळा आहेत. १८८६ मध्ये बांधलेल्या या देवळावर अर्धगोलाकार घुमट आणि कौलारू छप्पर आहे. देवी हा साथीचा रोग असाध्य होता. त्या रोगातून मुक्त होऊन आरोग्य लाभावे, अंगातील अनारोग्यकारक दाह शांत व्हावा म्हणून शीतलादेवीला साकडे घातले जाई. आज देवी हा रोग नाहीसा झाला तरी आरोग्यासाठी या देवीच्या दर्शनासाठी मुलाबाळांसह भाविक येतात.
जरीमरी मंदिर, मरीआईचे देऊळ, पूचम्मा देवीचे देऊळ ही शीतलादेवीचीच समाजमान्य रूपे आहेत, जी माणसाच्या आरोग्यासाठी पुजिली जातात. डोंगरीची मरीदेवी, धोबीतलावजवळील हमाल गल्लीतील मरीदेवी, क्रॉफर्ड मार्केटमागचे जरीमरीचे देऊळ, धारावीचे मरीआईचे देऊळ, कामाठीपुऱ्यातील पचम्मा / पूचम्मा देवी, कामाठीपुऱ्यातील शीतळादेवी, चंदनवाडी (सोनापूर)मधील आणि आंग्रेवाडीतील जरीमरीचे देऊळ, राणीबागेजवळचे शीतळादेवी, जरीमरी आणि मुक्तादेवीचे मंदिर, परळ रस्त्यावरचे जरीमरी देऊळ, वांद्र्याला तलावातील प्रतिमा काढून बांधलेलं जरी-मरीचे देऊळ… ही या शीतलादेवीचीच रूपे आहेत.
माहेश्वरी देवी
काळबादेवीजवळच दक्षिण मुंबईत असलेल्या नवी वाडीत या देवीचे देऊळ आहे. ही पाषाणाची स्वयंभू देवी केरोबा नायक यांच्या स्वप्नात आली, तिची स्थापना झाली. देऊळ अगदीच छोटेखानी असून कार्तिकी अमावस्येपासून देवीचा उत्सव मात्र मोठा असतो. पाषाणाला असलेले मुखवटे अतिशय देखणे आणि तेजस्वी असून पाठारे प्रभूंच्या अनेकांची ती कुलदेवता आहे. तिचे व्यवस्थापन पाठारे प्रभू चॅरिटीज या संस्थेकडे आहे. देवीच्या जत्रेला अलोट गर्दी असते.
मुंबईतील प्राचीन देवीस्थाने पाहिली ती प्रमुख स्थाने किंवा ठळक स्थाने मानता येतील. याशिवाय विरारजवळील डोंगरावरची जीवदानी देवी, वसईची वज्रेश्वरी देवी, ठाण्याची एकवीरा, मुंब्रा येथील मुंब्रादेवी, वांद्रे येथील ख्रिश्चन धर्माची असूनही हिंदुंना प्रेरणादायक ठरलेली ‘मोत मावली’ उर्फ माऊंट मेरी (अवर लेडी ऑफ फातिमा) अशी अनेक प्रेरणास्थाने आहेत. माऊंट मेरी ४०० वर्षांपूर्वी स्थापन झाली. चंडिका, कालिका, दुर्गा, नागदेवी अशी आणखी बरीच देवीरूपे आहेत.
महाकाली देवी
त्वष्टा कांसार ज्ञाती संस्थानाची महाकाली देवी पायधुणी भागात आज अडीचशे वर्षे विराजमान आहे. १७६२ साली हिची स्थापना झाली. वैशाख पौर्णिमेला उत्सव असतो. मुंबईतील देवीस्थाने ही पर्वत, गुहा, समुद्रकाठ या जागी आहेत. मुंब्रा, माऊंट मेरी, जीवदानी, वैकुंठमाता आदी देवीरूपे टेकड्यांवर आहेत. जोगेश्वरी देवी गुहेत आहे. महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी आदी देवीरूपे समुद्र, तलाव, विहीरकाठी वसली आहेत. बहुतेक देवळे दीपमाळांनी सजली आहेत. बहुतांश देवालयांनी सामाजिक सेवेचा वसा घेतला आहे.
भारतात असलेल्या एकावन्न शक्तीपीठात मुंबईतील एकाही शक्तीपीठाचा समावेश नाही. साडेतीनशे, चारशे वर्षांची प्राचीन देवालये मुंबईतील आध्यात्मिक परंपरा सांगतात; पण या जागृत देवीस्थानांचा शक्तीपीठात समावेश का नसावा? आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक दृष्टीने याचा शोध घ्यायला हवा.
ग्रामदेवता, कुलदेवता, उपास्य दैवत असणारी ही देवीरूपे मुंबई महानगरीचा सांस्कृतिक इतिहास आहे. आधुनिक साधनांची जोड देऊन महानगरपालिका/शासन यांनी तो दस्तावेज स्वरूपात जपायला हवा. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी (सव्वाशे वर्षांपूर्वी) १८९६ ते १९०० या काळात मध्य आणि दक्षिण मुंबईतील देवळांची टिपणे केली. काही वर्षांपूर्वी फिरोझ रानडे यांनी त्याचा वेध घेतला. मात्र सातवाहनांच्या काळापासून चालत आलेली मंदिरांची परंपरा आपण सर्वांनी डोळस श्रद्धेने, विज्ञान/इतिहासदृष्टीने जपली पाहिजे.
navratri colors 2016 in marathi
essay on navratri in marathi language
marathi nibandh on navratri
navratri marathi aarti
navratri aarti in marathi free download
navratri aarti in marathi pdf
marathi navratri songs free download
navratri festival information in marathi