Ganesh Kavach in Marathi
!! श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र !!
[ १: नमन ]
श्रीगणेशाय नम: ! श्री गणेशदेवा लालितां !! मुनितें म्हणे गौरी माता !अहो ! अचपल बाल आतां !! कळा याची कळों नेदी !! १ !! जृंभा, सिंदूर थोर स्थूल !! साधु-देव-द्रोही खल !! यातें हा आतांचि प्रबळ !! चिंता याची व्यापी मातें !!२!!यातें कीं तें व्यापितील !! दैत्य दुष्ट बहु कुटिल !! दैत्य नाशन हा अवखळ !! रक्षिण्यासि या. द्या कवच-थोर !!
[ २ : ध्यान ]
मुनि म्हणे करावें ध्यान !! विनायक हा मृगवदन !! सत्ययुगीं दिग्बाहु गहन !! मयुर-वाहन त्रेतायुगीं !!४!! सिध्दिदाता श्रीगणनाथ !! तदा त्यासि सहा हात !! व्दापरीं मात्र चार हात !! रक्तरंग, अंगकान्ती !! ५ !! कलियुगीं भुजा दोन !! धवलांग हिमाहून !! पुरवी सर्व वर देऊन !! रक्षितसे हा सर्वकालीं !! ६ !!
!! श्री !!
!! गणेश गौरीचा नंदन ! सिध्दिबुद्धीचा दाता पूर्ण !
आधीं वंदावा गजवदन ! मंगलमूर्तीं मोरया !!
[ ३ : न्यास ]
शिखा रक्षूं हा विनायक !! पराहूनि पर, परमात्मक !! तनु सुरेख, तैंसें मस्तक !! उत्कट, थोर, विशाल !! ७ !! कश्यप रक्षूं ललाटस्थलीं !! महोदर राखूं भ्रुकुटिवल्ली, भालचंद्र नयन, युगुलीं, ओष्ट-पल्लव गजास्य !! ८ !! जिव्हा रक्षूं गजक्रीडन !! हनुवटीहि गिरिजानंदन !! विनायक रक्षूं वाणी, वचन !! विघ्नहंता दन्त माझे !! ९ !! कान रक्षूं पाशधर्ता !! नाक रक्षूं इच्छितें-दाता !! मुख रक्षूं गणांचा कर्ता !! कंठ माझा गणंजय !! १० !!
स्कंध रक्षूं गजस्कंधन !!गणनाथ ह्र्दयांगण !! स्तन-भाग विघ्ननाशन !! जठर रक्षूं हेरंब !! ११!! पृथ्वीधर रक्षूं पार्श्वभाग !! विघ्नहर शुभ, पृष्ठभाग !! वक्रतुंड गुप्त, गुह्यांग !! सर्वांग रक्षूं महाबल !! १२ !! गणक्रीड रक्षूं गुडघे जंघा !! मंगलमुर्ति उरु-जंघा !! घोटे पाय, दैत्यभंगा !! एकदंत, रक्षूं, महाबुध्द !! १३ !! बाहू रक्षीं !! त्वरित-वरदायका ! हात संरक्षीं आशापूरका !! नखें, बोटें अरिनाशका !! कमलहस्तका ! रक्षीं सर्व !! १४ !! सर्व अंगें मयूरेश !! विश्वव्यापी विश्र्वेश !! रक्षीं सदा परमेश !! नच वदलो स्थान तेंही !! १५ !! धूम्रकेतु राखो तें स्व-बलें !! भलें मागणें केंले अबले ! !! नच केंले न जें सुचलें !! तेंहि पुरवीं रक्षका ! !! १६ !!
[ ४ : दिग्बंध ]
समोरोनि देवें आमोदें !! मागें राहोनियां प्रमोदें !!पूर्वेकडोनि देवें बुध्दिदें !! सिध्दिदें रक्षावी आग्नेयी !! १७ !! दक्षिणेसि राहो उमासुत !!नैरृतीस गणेशाच्युत !! पश्र्चिमेस विघ्नहर्तृ !! वायव्येसि शूर्पकर्ण !! १८ !! उत्तर पाळीं निधिरक्षक !! ईशान्येस शिवसुत शिवात्मक !! दिनभागीं एकदन्तक !! विघ्नहर सायं, रात्रौ !!१९ !! रक्षीं पाशांकुशधर !! सत्वरजतम-स्मर !! राक्षस वेताल असुर !! भूतग्रह, वेताल, पिशाचां, हातोनि !! २० !! ज्ञानधर्म, लज्जालक्ष्मी !! कुल,कीर्ति तेंविं गृह्लक्ष्मी !! धन, धान्य, तैसा देहचि मी !! सोयरे, सखे, पुत्रादिक !! २१ !! आतां सर्वांयुधधरें देवें !! पौत्रादिसारें रक्षावें !! मयूर-कपिल-पिंगाक्ष देवें !! गुरें-मेंढरें संरक्षावीं !! २२ !! हत्ती, घोडे, सदा-साक्षी !! विकट-मूर्ते ! तूंचि संरक्षी !! अंतर्यामीं राहोनि दक्षी !! रक्षी हेरंब-देवा ! तूं !! २३ !!
[ ५ : कवचबंधन ]
भूर्जपानीं हें लिहावें !! कवच कंठीं मग बांधावे !! भय-मुक्त सुबुध्दें व्हावें !! यक्ष, राक्षस, पिशाचांहून !! २४ !!
[ ६ : फले ]
तिन्हीं संध्या समयांसी !! जपतां या कवचासी !!वज्र-तनु-लाभ मानवासी !!निर्भय जावें रणांगणीं !! २५ !! यात्राकालीं करावें पाठ !! विघ्नें जातीं, फलें साठ !! युध्दकालीं आठपट !! विजय त्वरें पठन देईं !! २६ !! सातवेळ जप उपायीं !! एकवीस दिनांचे ठायीं !! मारणोच्चाटनें फलतीं !! तींही आकर्ष-स्तंभन, मोहनादिकरण !! एकवीस वेळां जपतां देखा !! एकवीस दिनीं कोणी सखा !! तुरुंगमुक्त होतसे सुखा !! मोचन पावे यमपाशहि !! २८ !! राज्ञीराजदर्शन-वेळीं !! पढावें तीन वेळां सकाळीं !! राजसभा, लोकसभा, बळी !! जिंकेल पाठक निश्र्चयें !! २९ !!
[ ७ : प्राप्ति ]
कश्यपें दिलें हें गणेश कवच !! मुद्द्लें मांडव्यास वच !! मांडव्य देईं मजसी साच !! जय, यश, सिध्दि-दायक !! ३० !!
[ ८ : बंधनें ]
भक्तिहीनासि हें न द्यावें !! श्रध्दावानचि शुभ पावे !! कवचें न होतीं राक्षसासुर-गोवें !! वेताल दानव, दैत्यादीचें !! ३१ !! ऐसें संपूर्ण केलें हें !! श्रीगणेशपुराणीं पाहे !! गणेश कवच जें गूढ आहे !! संस्कृतीं तें प्राकृतीं !! ३२ !!
!! श्रीशुभं भवतु !!
ganesh kavach lyrics marathi
ganesh kavach in marathi
ganesha kavacham with meaning
ganesh kavach mp3 free download
ganesh kavach in hindi
ganesh kavach in english
benefits of ganesh kavach
ganesh kavach in gujarati
ganesha kavacham telugu pdf