Uncategorized

ज्योतिर्लिंगांचं महत्व जाणून घेऊया.

आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावण सोमवार असून भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. या दिवसात देशातील १२ ज्योतिर्लिंगांवरही भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त ३ ज्योतिर्लिंगांचं महत्व जाणून घेऊया.

शास्त्रातील मान्यतेनुसार या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. याच कारणामुळे भारतातील प्रमुख १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी या दिवशी भाविकांची गर्दी होते. त्यातील पहिली तीन ज्योतिर्लिंगे खालीलप्रमाणे आहेत.

१) सोमनाथ

सोमनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातीलच नाहीतर पॄथ्वीवरील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे मंदिर गुजरातमधील सौराष्ट्र क्षेत्रात आहे. शिवपुरानानुसार, जेव्हा चंद्राला दक्ष प्रजापतीने क्षय रोग होईल असा श्राप दिला होता, तेव्हा या ठिकाणी तप करून या श्रापापासून मुक्ती मिळवली होती. असेही मानले जाते की, या शिवलींगाची स्थापना स्वत: चंद्रदेवाने केली होती. विदेशी लोकांच्या आक्रमनांमुळे हे मंदिर ७ वेळा नष्ट झाले आहे, पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने उभे केले गेले आहे. सातव्या वेळेले हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.

२) मल्लिकार्जुन

हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या तटावर श्रीशैल नावाच्या पर्वतावर आहे. या मंदिराला भगवान शिवच्या कैलाश पर्वतासारखेच मानले जाते. श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले.

३) महाकालेश्वर

हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी असलेल्या उजैन येथे आहे. या ज्योतिर्लिंगाची खासियत म्हणजे हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. इथे दररोज केली जाणारी भस्मारती जगभर प्रसिद्ध आहे. उजैनचे नागरिक मानतात की, महाकालेश्वर त्यांचे राजा आहेत आणि तेच त्यांची रक्षा करीत आहेत. येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा आहेत. दक्षिण दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे.

4) ओंकारेश्वर

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध शहर इंदोरजवळ आहे. ज्या स्थानावर हे ज्योतिर्लिंग आहे, तेथून नर्मदा नदी वाहते आणि पर्वताच्या चारही बाजूस नदी वाहत असल्याने इथे ऊं असा आकार तयार झाला आहे. याने ज्योतिर्लिंगाने ओंकार म्हणजेच ऊं चा आकार घेतला आहे. त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर या नावानेही ओळखले जाते. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ॐकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.

5) केदारनाथ

केदारनाथ येथील ज्योतिर्लिंग भगवान महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचे आहे. हे उत्तराखंड राज्यात आहे. बाबा केदारनाथचे मंदीर बद्रीनाथ मार्गावर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ समुद्र तळापासून ३५८४ मीटर उंचावर आहे. हे ज्योतिर्लिंग भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात. केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.

6) भीमाशंकर

भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

7) काशी विश्वनाथ

विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे उत्तरप्रदेशातील काशी येथे आहे. काशी शहराला सर्व धर्मस्थळांमध्ये अधिक महत्व आहे. या शहराबद्दल मानले जाते की, कितीही मोठा प्रलय आला तरी हे स्थान तसेच राहिल.

पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच सन्त एकनाथानी ” श्रीएकनाथी भागवत” हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रन्थ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवनूक निघाली.

कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने ‘मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला’ अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले.

8) त्र्यंबकेश्वर

हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीजवळ महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ ब्रम्हगिरी नावाचा पर्वत आहे. या पर्वतावरूनच गोदावरी नदीचा उगम आहे. तर भगवान शिवाचे त्र्यंबकेश्वर हे नावही आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.

9) वैद्यनाथ

परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

10. रामेश्वर

रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे या मंदिलाराला रामेश्वर असे नाव पडले. स्कंद पुराण व शिव पुराणांमध्ये या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६व्या शतकात झाली. इ.स. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनासाठी येऊन गेले आहेत.

रामोश्वर हे बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जाते. येथील मंडपाची निर्मिती इ.स. १७४० ते १७७० या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे.

विशेष म्हणजे या शिविलगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीस मुख्य उत्सव होतो. हत्तीवरून रामेश्वराच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तामिळ भाविक मोठया प्रमाणावर यात्रेसाठी येत असतात.

11. औंढा नागनाथ

औंढा नागनाथ पांडवांतील धर्मराजाने हे मंदिर बांधले असून महाराष्ट्रातील संत नामदेव आणि त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट याच मंदिरात झाली. यांनतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोधार केला.

या मंदिरात २५ फुट उंचीची तटबंदी असून चारही दिशांना चार दरवाजे आहेत. मंदिराचा खलाचा भाग काळ्या पाषाणात व वरील अर्धा भाग पांढऱ्या विंटापासून तयार करण्यात आलेला असल्याने मंदिर खुलून दिसते. महाद्वारावर शिवलीलेचे प्रसंग आहेत. यात नटराज मूर्ती, शंकर पार्वतीस काही तरी समजावून सांगत असल्याचे विलाभोनीय दृश बघावयास मिळते.

महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो तसेच येथे होणारा रथौत्सव पाहण्यासाठी लांबून भाविक या ठिकामाला भेट देतात. रथाच्या ५ फेऱ्या मंदिराभावती मारल्या जातात. असं म्हटलं जातं कि, काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करून टाकते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी निघते.

12. घृष्णेश्वर

स्कन्दपुराण व शिवपूराण, रामायण व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रथांमध्ये श्री घष्‍णेश्‍वराचा उल्‍लेख करण्यात आलेला आहे. सुमारे 1500 वर्षापासून राष्‍ट्रकुट घराण्‍यातील राजा कृष्‍णराजने हे मंदिर बांधले आहे. इ.स 1730 मध्‍ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जिर्णोध्‍दार केला.

मंदिराचे मुळ नाव कुंकूमेश्‍वर होते. हे मंदिर शिल्‍पकलेचा उत्‍तम नमुना होय. मुळ दगडी चौथरा सहा हजार आठशे चार चौरस फुट असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे. मंदिरात सुंदर नंदीची मूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत, दशावतार आदींचे चत्र रेखाटलेली आहेत. इ.स 1791 मध्‍ये अहिल्‍याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले.

महाशिवरात्रीची मोठा यात्रोत्‍सव भरविला जातो.शंकराची पालखी शिवालय तिर्थावर स्‍नानासाठी आणली जाते. रात्रीच्‍यावेळी अंलकार पूजेचा सोहळा होतो. श्रावण सोमवारी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येथे येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *