एके दिवशी आश्रमातील सर्व शिष्य आपल्या गुरूकडे गेले आणि म्हणाले,
गुरूजी,आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला जाणार आहोत..
गुरु :-
तुम्ही तीर्थयात्रेला का जाऊ इच्छिता?
शिष्य :-
आमच्या भक्तीमध्ये प्रगती व्हावी यासाठी.
गुरु :-
ठीक आहे मग जातांना माझ्यासाठी एक काम करा,
हे कारले तुमच्या बरोबर न्या. जेथे जेथे ज्या ज्या मंदिरात जाल तेथील देवाच्या पाया पाशी ठेवा, देवाचा आशिर्वाद घ्या आणि ते कारले परत आणा..
अशा रीतीने शिष्य आणि ते कारलेही तीर्थयात्रेला प्रत्येक मंदिरात गेले.
शेवटी सगळे शिष्य परत आल्यावर गुरु म्हणाले,
ते कारले शिजवा आणि मला वाढा…
शिष्यांनी ते कारले शिजवले आणि आपल्या गुरूला वाढले.
पहिला घास घेताच गुरु म्हणाले,
आश्चर्य आहे…
शिष्य म्हणाले,
त्यात काय एवढे आश्चर्यकारक आहे?
गुरु :-
एवढ्या तीर्थयात्रेनंतर कारले अजुनही कडूच आहे.
शिष्य :-
पण कडूपणा हा तर कारल्याचा नैसर्गिक गुण आहे.
गुरु :-
मी तेच म्हणतोय…
तुमचा मूळ स्वभाव बदलल्या शिवाय तीर्थयात्रा करुन काहीच फरक पडणार नाही..
म्हणून तुम्ही आणि मी आपण च बदललो नाही, तर कोणीच आपल्या आयुष्यात बदल करु शकणार नाही.
जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर ध्वनीचे संगीत होईल,
हालचालीचे रूपांतर नृत्यात होईल,
स्मितहास्याचे रुपांतर खळखळणाऱ्या हास्यात होईल,
मन ध्यानस्थ होईल
आणि
जीवन उत्सव बनेल…!