64 Shikhar Yoginidhari Jagrut Devi Shaktipeeth Nimbadevi Sansthan, Nimbola
64 Shikhar Yoginidhari Jagrut Devi Shaktipeeth Nimbadevi Sansthan, Nimbola
६४ शिखर योगिणीधारी जागृत देवी शक्तिपीठ निंबादेवी संस्थान, निंबोळा
निबोळा देवी संस्थान मंदिरातील श्री महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली देवींच्या मूर्ती.
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नांदुरा-मलकापूर या दोन शहरांदरम्यान असलेल्या वडनेर भोलजीपासून दक्षिणेस ३ किमी अंतरावर तीन पवित्र नद्यांच्या संगमावर असलेले आध्यात्मिक देवी शक्तिपीठ श्री तीर्थक्षेत्र निबादेवी संस्थान भाविकांसाठी अनेकाविध उपक्रम राबवून नावलौकिकास पात्र ठरत आहे. यादव कालीन इ. स. ११ किवा १२ मध्ये हे पूर्वीचे हेमाडपंथी मंदिराचे बांधकामावरून बांधलेले असावे, असे इतिहास जाणकारांच्या मते सांगितले जाते. दंडकारण्याचा भाग असलेले हे तीर्थक्षेत्र प्रभू रामचंद्र वनवासात असताना पदस्पर्शाने पावन झालेले आहे. तीन नद्यांचा पूर्वाभिमुख त्रिवेणी संगम, वर्षभर खळखळणारया नद्या, डोंगरदरया, घनदाट वनराई, सोबतीला स्वयंभू बाणरुपात प्रकट झालेल्या श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाकालीच्या रूपाने आई निबाईचा आध्यात्मिक शक्तिवास अशा प्रसन्नमय वातावरणात ऋषी, महर्षी, ध्यानी, तपी, शक्तिउपासक आपली साधना या परिसरात करीत असत.
निबोणी वन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वनात निबऋषींचा क्रोध शमविण्यासाठी निबादेवी निबाच्या झाडात प्रगट झाल्याची कथा सांगितल्या जाते. तर संगमापलीकडे आजमितीला उजाड असलेले घागरपाडा प्रचलित सध्याचे नाव घोगलवाडी हे शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊंचे आजोळ असल्याने शिवाजी महाराज अंबा-निबा मातेची वारंवार भक्ती करीत असत. ही त्यांची भवानीची भक्ती होती.
पाषाणावर निसर्गनिर्मित कुंड निर्माण झालेले तीर्थक्षेत्रावर काळ्या गोमुख : असून, त्याचा जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे. त्रिरुपीणी आई निबाईच्या चरणापासून प्रकट होऊन गोमुखाद्वारे कुंडातून संगमावर मिळते. या कुंडातील जलतीर्थानेच त्रिवेणी स्नान-संध्या केली जात असल्याने येथील जलात उर्जेचा संचार आहे. देवीचरण तीर्थ असल्याने अनेक असाध्य आधी-व्याधी, करणी, कवटाळ, जादुटोणा तसेच शेतातील पिके आणि घरातील समस्या निराकरणासाठी भाविक भक्त जलतीर्थाचा उपयोग करतात. तर व्यावसायिक आपल्या व्यापारउदीमात वापर करतात.
महर्षी विश्वामित्रांच्या संगम :- नाभीतून प्रकट झालेली विश्वगंगा, कमळनाथपासून उगम पावलेली कमळजा आणि देवी चरणांपासून कुंडातून मार्गस्थ झालेली सरस्वती नदीच अनोखा पौराणिकदृष्ट्या महत्त्व असलेला पूर्वाभिमुख वाहणारा त्रिवेणी संगम या शक्तिपीठावर पाहावयास मिळतो. अलौकिक संगम प्रवाहावर काळ्या पाषाणात महादेवाच्या पिडी, नंदीमुख, गो-खुर नैसर्गिकदृष्ट्या निर्माण झाले असल्याने संगमाचे आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. निर्माण झालेल्या पिडी त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, घृष्णेश्वराच्या प्रतिकृती असल्याने तीन ज्योतीर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य संगमावरच मिळते. त्रिवेणी संगमावर स्नान करूनच आई निबाईचे दर्शन पवित्र मानले जाते. संगमावरील प्रवाहित जलशक्तीमुळे शरीरातील व्याधी, दुर्धर आजार, मानसिक, कौटुंबिकदृष्ट्या त्रस्त नागरिकांना दिलासा मिळतो. अपत्यहिनांनी ५ मंगळवार किवा शुक्रवारला त्रिवेणी स्नान करून यथाशक्ती भक्तिभावाने जलपूजा करून दीप प्रवाहित करावे आणि ओल्या कपड्यांसह उभयंतांनी देवीची भक्तिभावाने ओटी भरून पूजा-अर्चा केल्याने हजारो याचकांची इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव आहेत.
भुयार : तीर्थक्षेत्रावर एक जुनाट आखीव-रेखीव बांधकाम असलेले भुयार अस्तित्वात आहे. जंगली श्वापदे, राक्षसांपासून तपसाधनेचा भंग होऊ नये म्हणून या भुयारात बसून ध्यान-धारणा होत असावी. पैलतीरावर थोर तपस्वी नागाबाबांची समाधी आणि त्याखाली असलेले भुयार यावरून हे सिध्द होते. कालांतराने याच भुयारी मार्गाद्वारे रोज छत्रपती मल्लिकापूर परगण्यातील महसूल घेऊन सिदखेड राजा येथे जात असल्याची माहिती मिळते. संस्थानद्वारा भुयारी जिर्णोद्धार कार्य सुरू आहे.
जीर्णोद्धार : आकाराचे मंदिर, गोमुख परिसर तसेच नागाबाबा समाधीस्थळ जिर्णोद्धार वडनेर भोलजी येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत साकेतवासी पंडित दामोदरदासजी खाकी महाराज यांनी सन १९६० मध्ये केला होता. त्यानंतर मंदिराची विशेष देखभाल त्यांच्याच मार्गदर्शनात होत असतानाच त्यांनी ट्रस्ट स्थापन करून तिची धर्मदाय कार्यालयात रितसर नोंदणी करण्यात आली. तेव्हापासून मंदिराचे कार्य नानाभाऊ देशमुख अध्यक्ष म्हणून सांभाळत आहेत.
प्रमुख उत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरे केले जातात. त्यात नवरात्रोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. यादरम्यान शेतकरी वर्गही आनंदी असतो. उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच अष्टमी पर्वावर फार मोठ्या प्रमाणात शतचंडी, नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात येते. गत ४ वर्षांपासून श्री दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट इंदोर यांच्या मार्गदर्शनात प. पू. भैयुजी महाराज यांच्या हस्ते यज्ञ आहुतीचा व प्रवचन, दर्शनाचा कार्यक्रम पार पडतो. या निमित्ताने राज्यभरातील हजारो भाविक उपस्थिती भुगर्भातून खोदकाम करून लावून देवीदर्शनाचा लाभ घेतात. नववर्षारंभ पर्व म्हणजे गुढीपाडवा उत्सव संस्थानद्वारा यात्रा स्वरूपात साजरा केला जातो. ही यात्रा सध्या तीन दिवसांची भरते. मातीच्या मडक्यांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेसाठी संस्थानद्वारा विस्तीर्ण मैदान, वीज आणि संरक्षणाची व्यवस्था ठेवली जाते. या पर्वावर कबुल केलेले नवस फेडण्याची प्रथा आहे. याच दिवशी आसरा मातेसमोर अबोल बालकांची जावळे काढून देवीचरणी नवस फेडतात. याप्रसंगी विदर्भ, खान्देश तथा मराठवाड्यासह मध्यप्रदेशातून असंख्य भाविक दर्शनार्थ येत असतात. पंचक्रोशीतील यादव कालीन बैठ्या लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आपल्या पती, मुलाबाळांसह नवरात्र आणि गुढीपाडवा पर्वावर माहेरी येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात.
संस्थानवर प्रामुख्याने दोन उत्सव : संस्थानद्वारा देवी मंदिराचा उपक्रम : सभामंडपासह जिर्णोद्धार पूर्ण केला जात आहे. दुर्लक्षित म्हणून सातत्याने उपेक्षित राहिलेल्या या तीर्थक्षेत्राकडे शासन आणि लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आले आहेत. भाविकांच्यावतीने दिल्या जाणारया देणग्यांवरच विकास कार्य सुरू आहे. भविष्यात भाविकांसाठी सर्व सोयींनी युक्त भक्तनिवास, आत्महत्याग्रस्त शेतकरी, कष्टकरयांच्या पाल्यांसाठी निवासी विद्यालय, सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक प्रशिक्षण, गोरक्षण, सुसज्ज गं्रथालय, पर्यटन स्थळ म्हणून त्रिवेणी संगमावर घाट, बोटींग व्यवस्था, गार्डन निर्मिती, नागाबाबा समाधी परिसर सुशोभिकरण व नदीवर पूल निर्माण करणे, आयुर्वेदिक औषधालय, रुग्ण तपासणी कॅम्प आयोजन, सामूहिक विवाहांना प्रोत्साहन कार्यक्रम राबविणे, हुंडाबळी, दारुबंदी, व्यसन मुक्ती, अत्याचार ग्रस्तांना मार्गदर्शन करणे आदींसह अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
गत काही वर्षांपासून आवाहन : संस्थान परिसराचा झपाट्याने विकास सुरू असून, त्यात प्रशस्त पाकशाळा, भक्तांसाठी निवासी खोल्या, शॉपिग कॉम्प्लेक्स, नूतन पोचरस्ता, दर्शनमार्ग, आसरा माता, मातृका मंदिर, भैरवनाथ प्रवेशद्वारा निर्माण कार्य प्रगती पथावर आहे. जागृत देवी शक्तिपीठासीन त्रिवेणी निबाईच्या विकास कार्यात स्वयंस्फूर्तीने सर्व प्रकारची मदत स्वीकारली जाते. तसेच भाविकांना संस्थानच्यावतीने ‘देवी महात्म्य व भक्तानुभव’ ग्रंथ निर्मितीसाठी ज्या भाविकांना शाश्वत अनुभव आलेले असतील त्यांनी लेखी स्वरुपात अध्यक्ष श्री निबादेवी संस्थान निबोळा ता. नांदुरा जि. बुलढाणा या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे.