रेणुका मातेची आरती
जय देवी श्री देवी, रेणुका माते ।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती ।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती ॥१॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते ।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥
भाग्यवती तूं जननी, परशुरामाची ।
तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची ॥२॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते ।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥
सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी ।
तुझीच नाना नावें नाना अवतारी ॥३॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते ।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥
जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला ।
मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला ॥४॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते ।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥