Uncategorized

Shri Yogeshwari Devi Arti – श्री योगेश्वरी देवीची आरती

श्रीयोगेश्र्वरीची आरती


धन्य अंबापुर महिमा विचित्र ।
पार्वती अवतार योगिनी क्षेत्र ।
दंतासुर मर्दोनि केलें चरित्र ।
सिद्धांचे स्थळ ते महा पवित्र ।
जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी ।
महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवी जयदेवी ॥ १ ॥
पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारीं ।
माया मोचन सकळ माया निवारी ।
साधका सिद्धि वानेच्या तीरीं ।
तेथील महिमा वर्णूं न शके वैखरी ।
जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी ।
महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवी जयदेवी ॥ २ ॥
सिद्ध लिंग स्थळ परम पावन ।
नरसिंह क्षेत्र तेथें नृसिंह वदन ।
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण ।
संताचें माहेर गोदेवी स्थान ।
जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी ।
महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवी जयदेवी ॥ ३ ॥
महा रुद्र जेथें भैरव अवतार ।
काळभैरव त्याचा महिमा अपार ।
नागझरी तीर्थ तीर्थांचें सार ।
मार्जन करितां दोष होती संहार ।
जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी ।
महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवी जयदेवी ॥ ४ ॥
अनंतरुप शक्ति तुज योग्य माते ।
योगेश्र्वरी नाम त्रिभुवन विख्याते ।
व्यापक सकळां देहीं अनंत गुण भरिते ।
नीलकंठ ओवाळूं कैवल्य माते ।
जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी ।
महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवी जयदेवी ॥ ५ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *