Uncategorized

‘लाडका भाऊ योजने’साठी कसा कराल अर्ज?

*✅’लाडका भाऊ योजने’साठी कसा कराल अर्ज? पाहा संपूर्ण प्रक्रिया**_💁‍♀️लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली, पानंतर आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असणार, कोणाला पाचा फायदा मिळणार याची माहिती समोर आली आहे.

*👏बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार*राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.*🗣️कसा कराल अर्ज?

*▪️महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

▪️नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

▪️यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.

▪️त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.

▪️तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

▪️यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

▪️यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

▪️सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

*📌18 ते 35 वय असलेल्यांना मिळणार फायदा*दरम्यान लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बैंक खाते आधार कार्डशी जोडलेले असणेही महत्त्वाचे आहे. तर महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.

*🙏कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *