Changes in Mukhyamantri Ladki Bahin Yojana

*✅बहिणींनो काळजी करू नका…**

✅मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत खालील बदल करण्यात आले आहेत.*👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

Changes in Mukhyamantri Ladki Bahin Yojana

१) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या मुदतीत सुधारणा करण्यात येत असून आता सदर *मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४* पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. *०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/-* आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

२) आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल) उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशनकार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

३) रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

४) सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

५) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्षवयोगट करण्यात येत आहे.

६) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

७) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यातयेणार आहे.

*✅पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलेला योजनेचा अर्ज करता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही दलाल / खाजगी एजंट यांच्या भूलथापांना बळी पडून आपली आर्थिक लूट होऊ देऊ नका

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *