माझिया अपराधांच्या राशी | भेदोनी गेल्या गगनासी |
दयावंता हृषीकेशी | आपुल्या ब्रीदासी सत्य करी || १२ ||
पुत्राचे सहस्र अपराध | माता काय मानी तयाचा खेद |
तेवी तू कृपाळू गोविंद | मायबाप मजलागी || १३ ||
उडदांमाजी काळेगोरे | काय निवडावे निवडणारे |
कुचलिया वृक्षांची फळे | मधुर कोठोनी असतील || १४ ||
अराटीलागी मृदुता | कोठोनी असेल कृपावंता |
पाषाणासी गुल्मलता | कैशियापरी फुटतील || १५ ||
आपादमस्तकावरी अन्यायी | परी तुझे पदरी पडिलो पाही |
आता रक्षण नाना उपायी | करणे तुज उचित || १६ ||
समर्थांचे घरीचे श्र्वान | त्यासी सर्वही देती मान |
तैसा तुझा म्हणवितो दीन | हा अपमान कवणाचा || १७ ||
लक्ष्मी तुझे पायांतळी | आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी |
येणे तुझी ब्रीदावळी | कैसी राहील गोविंदा || १८ ||
कुबेर तुझा भांडारी | आम्हां फिरविसी दारोदारी |
यात पुरुषार्थ मुरारी | काय तुजला पै आला || १९ ||
द्रौपदीसी वस्त्रे अनंता | देत होतासी भाग्यवंता |
आम्हांलागी कृपणता | कोठोनी आणिली गोविंदा || २० ||
मावेची करुनी द्रौपदी सती | अन्ने पुरविली मध्यराती |
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती | तृप्त केल्या क्षणमात्रे || २१ ||
अन्नासाठी दाही दिशा | आम्हां फिरविसी जगदीशा |
कृपाळुवा परमपुरुषा | करुणा कैशी तुज न ये || २२ ||
अंगीकारी या शिरोमणि | तुज प्रार्थितो मधुर वचनी |
अंगीकार केलिया झणी | मज हातींचे न सोडावे || २३ ||
समुद्रे अंगीकारीला वडवानळ | तेणे अंतरी होतसे विहवळ |
ऐसे असोनी सर्वकाळ | अंतरी साठविला तयाने || २४ ||
कूर्मे पृथ्वीचा घेतला भार | तेणे सोडीला नाही बडिवार |
एवढा ब्रम्हांडगोळ थोर | त्याचा अंगीकार पै केला || २५ ||
शंकरे धरिले हाळाहळा | तेणे नीळवर्ण झाला गळा |
परी त्यागिले नाही गोपाळा | भक्तवत्सला गोविंदा || २६ ||
–
श्री व्यंकटेश स्तोत्र
Venkatesh Stotra in marathi
venkatesh stotra in marathi mp3 free download
venkatesh stotra benefits
venkatesh stotra by ms subbulakshmi download
venkatesh stotra in marathi audio
venkatesh stotra benefits in marathi
vyankatesh stotra by subbalaxmi
vyankatesh stotra full download
venkatesh stotra in hindi