श्रीदत्तचम्पूः

श्रीदत्तचम्पूः प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामीमहाराजांनी श्रीदत्तचम्पू ह्या काव्याची रचना कयाधू नदीच्या कांठीं नरसी (महाराष्ट्र) येथे शके १८२७ (इ.स. १९०५) च्या त्यांच्या १५व्या चातुर्मासांत केली. चम्पू म्हणजेच गद्यपद्यात्मक काव्य. विविध शब्दालंकार व अर्थालंकारांनी म्हणजेच चमत्कृतींनीं नटलेलें (चं) व ग्राहकाला दत्तभक्तीने पुनीत करणारें (पू) काव्य म्हणूनही याला दत्तचम्पू असे अन्वर्थक अभिधान दिले असावे. या काव्यावर प.प. श्रीस्वामीमहाराजांची…