Articles

Bhondala Songs for Navaratri

bhondla songs lyrics

bhondla songs in marathi

bhondla songs mp3

bhondla songs in marathi lyrics
bhondla songs free download

bhondla songs for Navaratri

bhondla songs in marathi free download

bhondala

 

भोंडल्याची काही  गाणी येथे  नमूद करते  आहे

ऐलोमा  पैलोमा  गणेश  देवा :

ऐलोमा पैलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे  करीन  तुझी सेवा,
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी, पारवं  घुमातंय बुरुजावरी ,
गुंजावाणी डोळ्याच्या सारविल्या टीका, आमच्या गावच्या भुलोजी बायका,
एविनी गाव  तेविनी गाव कांदा तीळ बाई तांदूळ घ्या,
आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे
दुधोन्ड्याची लागली  टाळी, आयुष्य देरे  भा  माळी,
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला  येता  जाता ,
पड पड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती  अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे,
अतुल्या  मातुल्या चरणी चातुल्या, चरणी चेसगोंडे  हातपाय  खणखणीत गोंडे ,
एक एक गोंडा विसा विसाचा, साड्या डोंगर नेसायचा
नेसागं नेसा  बहुल्यानो, अडीच वर्षे पावल्यानो.

कोथिंबिरी बाई गं, आता कधी येशील गं 

आता येईन चैत्र मासा, चैत्रा चैत्रा लवकर ये,
हस्त बसवीन हस्ताला, देव बसवीन देवा-ह्याला ,
देवा-ह्याच्या चौकटी, उठता बसता लाथ बुक्की.
हरीच्या   नैवेद्याला :
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली  ||धृ||
त्यातलं उरलं थोडं पीठ त्याचं केलं थालीपीठ,
नेवून वाढलं पानात,  जिलबी बिघडली ||१ ||
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात,
नेवूनी वाढला पानात  जिलबी बिघडली ||२||
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली,
त्यातलं उरलं थोडं तूप,
त्यात दिसलं हरीचं रूप,
कुणाला सांगू कुणाला नको जिलबी बिघडली  ||३||
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
अक्कण माती चिक्कण  माती:
अक्कण माती चिक्कण माती, अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिठी दळावी
अश्शी सपिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई पालखी ठेवावं
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई लाडाचं प्रेमाचं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं
एके  दिवशी  कावू  आला :
एके दिवशी कावू आला बाई कावू आला
त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले
ते सईच्या दारात टाकले बाई दारात टाकले
सईने ते घरात नेले बाई घरात नेले
कांडून कुंडून -हाडा  केला बाई -हाडा केला
-हाडा घेवून बाजारात गेली बाई बाजारात गेली
-हाडा विकून पैसे आणले बाई पैसे आणले
त्या पैश्यांची घागर घेतली बाई घागर घेतली
घागर घेवून पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आणा माझ्या सासरचा वैद्य: अंगात अंगरखा फाटका तुटका,
डोक्याची पगडी विरलेली, पायात जोडे झिजलेले, कपाळाला टिळा शेणाचा
तोंडात विडा पादरा  किडा, हातात लाठी जळकी काठी,
कसाबाई दिसतो भिकाऱ्यावाणी बाई भिकाऱ्यावाणी
आणा माझ्या माहेरचा वैद्य: अंगात अंगरखा भरजरी,
डोक्याला पगडी पुणेरी , पायात जोडे कोल्हापुरी, कपाळाला टिळा चंदनाचा,
तोंडात विडा केशराचा, हातात लाठी सागवानी
कसा बाई दिसतो राजावाणी  बाई राजावाणी.
माझ्या सुंदरीचं लगीन
माझ्या सुंदरीचं लगीन  आई म्हणे मी आई
करीन मांडवात घाई
माझ्या सुंदरीचं लगीन भाऊ म्हणे मी भाऊ
आणीन नवरा पाहून
माझ्या सुंदरीचं लगीन बहिण म्हणे मी बहिण
जाईन पाठ राखीण
माझ्या सुंदरीचं लगीन मामा म्हणे मी मामा
येईन कामा धामा
माझ्या सुंदरीचं लगीन मामी म्हणे मी मानी
करीन चहापाणी
माझ्या सुंदरीचं लगीन आजा म्हणे मी आजा
खाईन तूप सांजा
माझ्या सुंदरीचं लगीन आजी म्हणे मी आजी
खाईन तूप सोजी
माझ्या सुंदरीचं लगीन काकू म्हणे मी काकू
देईन हळदी कुंकू
माझ्या सुंदरीचं लगीन भट म्हणे मी भट
धरीन अंतरपाठ
माझ्या सुंदरीचं लगीन  भटीण म्हणे मी भटीण
सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंदरीचं लगीन
कारल्याचा वेल:
कारल्याचा वेल लाव गं सुने, लाव गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लवला हो सासूबाई, लावला हो सासूबाई,  आता तरी जावू का माहेरा माहेरा ||धृ ||
कारल्याला पाणी घाल गं सुने, घाल गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला पाणी घातलं हो सासूबाई, घातलं हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा
कारल्याला पानं येऊदे गं सुने, येऊदे गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला पानं आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा
कारल्याला फुले येऊदे गं सुने, येऊदे गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला फुले आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊदे गं सुने, येऊदे गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारली आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने, कर गं सुने,  मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई, केली हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा
आपलं उष्टं काढ गं सुने, काढ गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्टं काढलं हो सासूबाई, काढलं हो सासूबाई, आता तरी जावू का माहेरा माहेरा
आणा फणी, घाला वेणी, जावूद्यात राणी माहेरा माहेरा
आणलं फणकट, घातलं वेणकट, गेलं संकट, माहेरा माहेरा.
श्री कांता  कमल  कांता:
श्री  कांता  कमल  कांता  अस्सं कसं झालं, अस्सं  कसं  वेडं माझ्या  नशिबी  आलं ||धृ ||
वेड्याच्या  बायकोने  केले  होते  लाडू , तिकडून  आला वेडा त्याने  डोकावून  पहिले
चेंडू चेंडू  म्हणून  त्याले  खेळायला  घेतले  II १  II
श्री  कांता  कमल  कांता  अस्सं कसं झालं, अस्सं  कसं  वेडं माझ्या  नशिबी  आलं ||धृ ||
वेड्याच्या  बायकोने  केले  होत्या  शेवया , तिकडून  आला  वेडा  त्याने  डोकावून  पहिले
आळ्या आळ्या म्हणून  त्याने  फेकुनी  दिल्या  II २  II
श्री  कांता  कमल  कांता  अस्सं कसं झालं, अस्सं  कसं  वेडं माझ्या  नशिबी  आलं ||धृ ||
वेड्याच्या  बायकोने  केल्या  होत्या  करंज्या , तिकडून  आला  वेडा  त्याने  डोकावून  पहिले
होड्या  होड्या  म्हणून  त्याने  पाण्यात  सोडल्या  II ३  II
श्री  कांता  कमल  कांता  अस्सं कसं झालं, अस्सं  कसं  वेडं माझ्या  नशिबी  आलं ||धृ ||
वेड्याच्या  बायकोने केले  होते  श्रीखंड , तिकडून  आला  वेडा  त्याने  डोकावून  पहिले
गंध  गंध  म्हणून  त्याने  अंगाला  फासले  II ४  II
श्री  कांता  कमल  कांता  अस्सं कसं झालं, अस्सं  कसं  वेडं माझ्या  नशिबी  आलं ||धृ ||
वेड्याची  बायको  झोपली  होती  एकदा , तिकडून  आला  वेडा  त्याने  डोकावून  पहिले
मेली  मेली  म्हणून  त्याने  जाळूनी  टाकली  II ५  II
श्री  कांता  कमल  कांता  अस्सं कसं झालं, अस्सं  कसं  वेडं माझ्या  नशिबी  आलं ||धृ ||

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाच लिंबांचा पानोळा, माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी झोळी, येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लागली राणी, अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी आहे यमुना जमुना, यमुना जामुनेची बारीक वाळू
तेथे खेळे चील्लार बाळ, चील्लार बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपल्याने दुध पाजले, निजरे निजरे चील्लार बाळा
मी तर जातो सोनार दादा, गौरीचे मोती झाले की नाही
गौरीचे मोती उद्या सकाळी पान सुपारी उद्या दुपारी
शिवाजी आमुचा राजा
शिवाजी आमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला
किल्ल्यामध्ये सात विहिरी, विहिरीमध्ये एक कमळ,
एक कमळ तोडले, भवानी मातेला अर्पण केले,

भवानी माता प्रसन्न  झाली, तिने त्याला तलवार दिली,

तलवार घेउनी आला, हिंदूंचा राजा तो झाला
हिंदूंनी त्याचे स्मरण करावे, हत्त्यापुढे गाणे गावे

कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला साप दे आणून त्याची दोरी दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालितो लोळण, आली यशोदा धावून कायरे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला विंचू  दे आणून त्याची अंगठी   दे करून, असलं रे कसलं बाळा तुझं जगाच्या वेगळं

कृष्णाचे  अंगण :
कृष्णाचं अंगण  बाई  कृष्णाचं   टोपडं,
धोब्याकडे  बाई  धुवायला  टाकीलं,
चंद्रभागेत  खळबळलं,
जाई जुई  वर  वाळवलं
चंदनाच्या  पाटावर  घडी  केली
घडीचा  घडीरंग बाई  कृष्णाचा  पलंग ,
त्यात  रात्री  जनमले श्रीरंग .
 दमडीचं   तेल :
काळी  चंद्रकला  नेसू  कशी , गळ्यात  हार  घालू  कशी ,
पायात  पैंजण  घालू  कशी , दमडीचं  तेल  आणू कशी ,
दमडीचं तेल आणलं
सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची शेंडी झाली,
भावोजींची दाढी झाली, वन्संबाईंची वेणी झाली,
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला,
वेशीबाहेर ओघळ घेला, त्यात हत्ती वाहून गेला,
सासूबाई सासूबाई  अन्याय झाला
दुध भात जेवायला घाला
माझं उष्टं तुम्हीच काढा.
हस्त हा दुनियेचा राजा:
हस्त हा दुनियेचा राजा पावतो तीन्हीयाचा काजा
तयासी नमस्कार माझा नमस्कारासरशी  वारा
आधी पडल्या मेघ धारा मागून आल्या मोठ्या धारा
दहा मधले सात गेले हस्ताची मग पाळी आली
म्हणून त्याने गंमत केली
त्याच्या योगे झाला चिखल
त्याबाई चिखलात लावल्या केळी
एक एक केळ मोठालं, हादग्या देवा वहिलं.
नमुया श्रीगणेशा:
आधी नमुया श्रीगणराया, मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा, झुलती हत्तींच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा, पाऊस पाडी हस्ताचा
पड पड पावसा थेंबो थेंबी
थेंबो थेंबी आडव्या लोंबी
पिवळ्या लोंबी आणूया
तांदूळ त्याचे  कांडूया
मोदक लाडू बनवूया
गणरायाला अर्पूया.

नणंद भावजया दोघी जणीखेळत होत्या छप्पा पाणी
खेळता खेळता झगडा झाला, भावजयी वारी डाव आला
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
सासूबाई गेल्या समजवायला, चला चला सुनबाई आपल्या घराला, अर्धा संसार देते तुम्हाला,
अर्धा संसार नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
सासरे गेले समजवायला, सोन्याचा हार देतो तुम्हाला
सोन्याचा हार नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
नणंद आली समजवायला, माझी खेळणी देते तुम्हाला,
तुमची खेळणी नक्को मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
भावोजी आले समजवायला, जत्रेला घेवून जातो तुम्हाला,
जत्रेला नाही जायचे मला, मी नाही यायची तुमच्या घराला …………..
यादव राया राणी रुसून बसली कैसी, सासुरवाशीण घरासी येईना कैसी
पतीदेव आले समजवायला, उठा उठा राणी चला घराला
लाल चाबूक देतो तुम्हाला …………………
उठल्या राणी गडबडून, पदर घेतला आवरून
ओचा घेतला सावरून, हसत हसत आली घरासी
यादव राया राणी घरात आली ऐसी, सासुरवाशीण घरासी आली ऐसी……….

अरडी गं परडी, परडी एवढे काय गं
परडी एवढा फुल गं दारी आलं कोण गं बाई
आज आला सासरा गं बाई, सासऱ्याने काय आणलं गं बाई
सासऱ्याने आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा गं बाई, झिपरं कुत्रं सोडा ग बाई
आज कोण आलं गं बाई
आज आली सासू गं बाई, सासूने काय आणले गं बाई
सासूने आणली नथ गं बाई, नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा गं बाई, झिपरं कुत्रं सोडा गं बाई
आज कोण आलं गं बाई
आज आली नणंद गं बाई, नणंदेने काय आणलं गं बाई
नणंदेने आणले डूल गं बाई, डूल मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा ग बाई झिपरं कुत्रं सोडा ग बाई
आज कोण आलं गं बाई
आज आला दीर गं बाई, दिराने काय आणले गं बाई
दिराने आणले पैंजण गं बाई, पैंजण
मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारही दरवाजे लावा गं बाई झिपरं कुत्रं सोडा गं बाई
आज कोण आलं गं बाई
आज आला नवरा गं बाई, नवऱ्याने काय आणले गं बाई
नवऱ्याने आणले मंगळसूत्र गं बाई
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारही दरवाजे उघडा गं बाई, झिपरं कुत्रं बांधा गं बाई

भोपाळीचं फुल:
भोपाळीचं फुल बाई  फुलरंजना, माळ्याचा माळ बाई माळरंजना
माळ्याने सांडली भिगबाळी, हुडकून दे पण सापडेना,
सापडली पण गवसेना,
पाटावरचं पाणी झळकत जाय
पाटावरचं पाणी झळकलं
सर्पा पायी धडकलं
सर्प म्हणे मी एकला
दारी आंबा पिकला
दारी आंब्याची कोय गं
खिरापतीला काय गं.
आड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी
आडात पडली सुपारी, आमचा भोंडला दुपारी.
आड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी
आडात पडली कात्री, आमचा भोंडला रात्री.
आड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी
आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला.

bhondla songs lyricsbhondla songs in marathi

bhondla songs mp3

bhondla songs in marathi lyrics
bhondla songs free download

bhondla songs pdf

bhondla songs in marathi free download

bhondala

1 Comment

  • Shweta
    Shweta
    September 29, 2017 at 8:09 am

    Very Good Collection of songs. Very Useful. Thanks for the efforts taken to Upload.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *