बायका एरवि नित्य पठण करीत असलेल्या स्तोत्रान्चे नवरात्रीनिमित्ते पुस्तक बनवुन दिले आहे. ती स्तोत्रे/आरत्या वगैरे पुढे देत आहे. यातिल काही आधिच वर दिलेल्या असतील तर सान्गा, तसेच अधिक शुद्धतेकरता, पुस्तक वा जाणकाराचे मार्गदर्शन घ्या, चूका असतील तर मला इथे सान्गा
॥ श्रीदेवी उपासना – उपचार पद्धती ॥
(आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी)
तिथी आसनार्थ पुष्प/पत्र आसनाची आकृती समर्पण पदार्थ/पुष्प/पत्री नैवेद्य
१ प्रतिपदा अनंत पत्र बिंदू पिवळी फुले (शेवंती, सोनचाफा) दूध+साखर, बासुंदी
२ द्वितीया अशोक पत्र बिंदुले पांढरी पुष्पे (अनंत, चमेली, तगर, मोगरा वगैरे) दही+साखर
३ तृतिया आपट्याचे पान त्रिकोण निळी पुष्पे (गोकर्ण, कृष्णकमळ वगैरे) ओले खोबरे+साखर
४ चतुर्थी आघाडा चौरस केशरी अगर भगवी फुले (अबोली, तीळ, अशोक, तेरडा) गव्हाची खीर
५ पंचमी अश्वत्थ पत्र पंचकोन बेल-कुंकू खारीक, खजूर, चणे+खडीसाखर
६ षष्ठी वड-पत्र लंब चौकोन चित्रविचित्र पुष्पे (कर्दल पुष्पे) केळे, सफरचंद
७ सप्तमी केवडा स्वस्तिक नारिंगी रंगाची फुले (झेंडूची फुले) बदाम, बेदाणा, भिजलेली हरभयाची डाळ
८ अष्टमी कमलपुष्प कमलाकृती तांबडी फुले (कमळ, कण्हेर, जास्वंद, गुलाब, गुलबक्षी) गुळाचा शिरा
९ नवमी आवळपत्र ॐकार ॐ कुंकुमार्चन भाताच्या लाह्या
॥ श्री गणेशस्तोत्रम ॥
श्री गणेशाय नम: । नारद उवाच ।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ।
भक्तावासं स्मरेनित्यं आयु:कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णपिन्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पन्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम ॥३॥
नवमं भालचन्द्रंच दशमं तु विनायकम ।
एकादशं गणपतिं द्वादशम् तु गजाननम ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
॥ इति श्रीनारदपुराणे संकटनाशनगणेशस्त्रोत्रं संपुर्णम ॥
॥ अथ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥
श्रीगणेशाय नम: ॥ इंद्र उवाच ॥
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥१॥
नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी । सर्वपापहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वसुष्टभयंकरी । सर्वदु:खहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥
सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनि । मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥
आद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरि । योगजे योगसंभूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥
शूल सूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे । महापापहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥
पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरुपिणि । परमेशि जगन्मातार्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥
श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते । जगत्स्थिते जगन्मातार्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥८॥
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर: । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्य प्राप्तेति सर्वदा ॥९॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् । द्विकालं य: पठेन्नित्यं धनधान्यसमन्वित: ॥१०॥
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुंविनाशनम् । महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
॥ इतिंद्रकृत: श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तव: संपूर्ण: ॥
ॐ ऐं ऱ्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
महालक्ष्मिच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि । तन्नो लक्ष्मि: प्रचोदयात् ॥
ॐ लक्ष्मिदेव्यैनम: ॥ ॐ अष्टलक्ष्मै देव्यै नम: ॥
ॐ श्री महालक्ष्मि दव्यै: नम: ॥ ॐ कमलालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ माता लक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सती महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ पद्मसुंदरी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ पद्महस्ता महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ नित्या महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सर्वगता शुभा महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ रमा महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ भू महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ लिला महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ रुक्मिणी महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ सरस्वती महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ शांती महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ रति महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ विद्यालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ विष्णु प्रिया लक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ पद्मालया महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ भुतेश्वरी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सत्या महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ विष्णू पत्नी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ महादेवी महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ अनंत लोकनाभी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ सर्वसुखप्रदा महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ सर्ववेदवती महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ गौरी महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ स्वाहा महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ नारायणा वरा रोहा महालक्ष्मि देव्यै नम: ॥
ॐ विष्णु नित्यानुपायनी महालक्ष्मि देव्यै नम: ॥ ॐ लक्ष्मिनारायण महालक्ष्मि देव्यै नम: ॥
॥ अथ तंत्रोक्त देवीसूक्तम् ॥
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: । नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम् ॥१॥
रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नम: । ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नम: ॥२॥
कल्याण्यै प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्य कूम्यै नमो नम: । नैऋत्य भृभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नम: ॥३॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै । खात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नम: ॥४॥
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नम: । नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नम: ॥५॥
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥६॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥७॥
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥८॥
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥९॥
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१०॥
या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥११॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१२॥
या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१३॥
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१४॥
या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१५॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१६॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१७॥
या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१८॥
या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥१९॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२०॥
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२१॥
या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२२॥
या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२३॥
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२४॥
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२५॥
या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२६॥
इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या । भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नम: ॥२७॥
चितिरूपेण या कृत्स्नमेतद्व्याप्य स्थिता जगत । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥२८॥
स्तुता सुरै: पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ।
करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद: ॥२९॥
या साम्प्रतं चोद्धतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
यच स्मृता तत्क्षणमेव हन्ति न: सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभि: ॥३०॥
॥ श्री सरस्वति स्तोत्र ॥
रविरुद्र पितामह विष्णूनुतम् हरिचंदन कुंकुमपंकयुतम् ।
मनिवृंद गणेंद्रसमानयुतम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥धृ॥
शशीशुद्धसुद्धा हिमधामयुतम् शरदंबरबिंब सामानकरम् ।
बहुरत्न मनोहर कांतियुतम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
कनकाब्जविभुषित भूतिभवम् भवभाव विभाषित भिन्नपदम् ।
प्रभूचित्तसमाहित सिंधूपदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
भवसागर मंजन भितीनुतम् प्रतिपादित संतति कारमिढम्
विमलादिक शुद्ध विशुद्ध पदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
मतिहीन तनाशय पादपिदम् सकलागमभाषित भिन्नपदम् ।
प्रभुचित्त समाहित सिंधूपदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
परिपूर्ण मनोरथधामनिधिम् परमार्थविचार्य विवेकविधिम् ।
सूरयोशित सर्व विभिन्नपदम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
सुरमौलिमणिद्युति शुभ्रकरम् विषयोशमहाभय वर्णहरम् ।
निजकांती विलेपित चंद्रशिवम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
गुणनैकपदस्थिती भितीपदम् गुणगौरव गर्वित सत्यपदम् ।
कमलोदर कोमल चारुतलम् तव नवमी सरस्वती पादयुगम् ॥
इदंस्त्ववम् महापुण्यम् ब्रह्मणाच प्रकिर्तितम् ।
य: पठेत् प्रात:रुथ्याय तस्य कंठे सरस्वती ॥
॥ अथ श्री सूक्तम् ॥
श्रीगणेशाय नम: ॥ अथ श्रीमहालक्ष्म्यै नम: ॥
हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनंदकर्दमचिल्की तेंदिरासुता ऋषय: ॥
श्रीरग्निश्वेत्युभे देवते ॥ आद्यास्तिस्रोऽनुष्टुभ: ॥ चतुर्थी बृहती ॥ पंचमीषष्ठ्यौ त्रिष्टुभौ ॥ ततोऽष्टावनुष्टुभ: ॥ अंत्या प्रस्तारपंक्ति: ॥ जपे विनोयोग: ॥
॥ श्रीसूक्तप्रारंभ: ॥
हरि: ॐ ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ॥
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीम् ॥
यस्यां हिरण्यं विंदेयं गां अश्वं पुरुषान् अहम् ॥
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ॥
श्रियं देवीं उपव्हये श्री: मा देवी जुषताम् ॥
कां सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रा ज्वलंतीं तृप्तां तर्पयंतीम् ॥
पद्मे स्थितां पद्मवर्णां तां इहोपह्वये श्रियम् ॥
चंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टां उदाराम् ॥
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽ लक्ष्मी: मे नश्यतां त्वां वृणे ॥१॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पति: तववृक्षोथ बिल्व: ॥
तस्य फलानि तपसा नुदंतु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी: ॥
उपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिना सह ॥
प्रादुर्भूत: सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् ॥
अभूतिं असमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥
गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ॥
ईश्वरीं सर्वभूतानां तां इहोपह्वये श्रियम् ॥
मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि ॥
पशूनां रुपमन्नस्य मयि श्री: श्रयतां यश: ॥२॥
कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम ॥
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥
आप: सृजन्तु स्निग्धानि चिल्कीत वस मे गृहे ॥
निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥
आर्द्रां य: करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनिम् ॥
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीम् ॥
चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं ॥
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्योऽश्वान् विंदेयं पुरुषान् अहम् ॥३॥
य: शुचि: प्रयतो भूत्वा जुहुयाद् आज्यं अन्वहम् ॥
सूक्तं पंचदशर्चं च श्रीकाम: सततं जपेत् ॥
पद्मानने पद्मउरू पद्माक्षी पद्मसंभवे ॥
तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने ॥
धनं मे लभतां देवि सर्वकामांश्चदेहि मे ॥
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि ॥
विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ॥
पुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ॥
प्रजानां भवसि माता आयुष्मंतं करोतु मे ॥
धनं अग्नि: धनं वायु: धनं सूर्यो धनं वसु: ॥
धनं इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना ॥
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ॥
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन: ॥
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: ॥
भवंति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगंधमाल्यशोभे ॥
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥
विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ॥
लक्ष्मीं प्रियसखीदेवीं नम्यच्युतवल्लभाम् ॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ॥ तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ॥
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ॥
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घं आयु: ॥
॥ इति श्रीसूक्तम् ॥
॥ श्री गणपतीच्या आरत्या ॥
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराचि । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रें मनकामना पुरति ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुगुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ॥२॥ जय देव..
लंबोदर पितांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावें सुरवरवम्दना ॥३॥ जय देव..
****
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पदको ॥१॥
जय जय जी गणराज विद्यासुखदाता । धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥
अष्टौसिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ।
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी । गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी ॥२॥ जय जय..
भावभगतसे कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥३॥ जय जय..
****
नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती ।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव
शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । किर्ति तयांची राहे जोवर शशितरणी ।
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥३॥ जय देव..
****
गजानना श्री गणराया । आधीं वंदू तुज मोरया ।
मंगलमूर्ति श्री गणराया । आधीं वंदू तुज मोरया ॥१॥
सिंदुरचर्चित धवळे अंग । चंदन उटी खुलवी रंग ।
बघता मानस होते दंग । जीव जडला चरणीं तुझिया ॥२॥
गौरीतनया भालचंद्रा । देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरद विनायक करुणागारा । अवघीं विघ्नें नेसी विलया ॥३॥
॥ श्रीदेवीच्या आरत्या ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ।
वारीं वारीं जन्ममरणातें वारीं । हारीं पडलों आता संकट निवारीं ॥१॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥
त्रिभुवनीभुवनीं पहातां तुज ऐसी नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलवें कांहीं ।
साही विवाद करतां पडले प्रवाहीं । ते तूं भक्तांलागीं पावसि लवलाही ॥२॥ जय देवी..
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशापासूनी सोडवी तोडीं भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकज लेशा ॥३॥ जय देवी..
*****
अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णू रुद्र आईचे करीती पूजन् हो ॥१॥
उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासका पहासी प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो । आर्धपाद्य पुजनें तुजला भवानीस्तविती हो
रात्रीचे समई करिती जागरण हरि कथा हो । आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥५॥
षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो । घेवुनी दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली मुक्ताफळा हो ॥६॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
शेवंती जाईजुई पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥७॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । संह्याद्री पर्वती उभी पाहिली जगत्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो । स्तनपान देऊनी सुखी केले अंत:करणी हो ॥८॥
नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो । सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नैवेद्याशी अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा तृप्त त्वा केले कृपे करुनी हो ॥९॥
दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंव्हारुढ संबळ शस्त्रे अंबे त्वा लेवुनी हो
शुंभनिशूंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्ररामदासा आश्रय दिधला चरणी हो ॥१०॥
****
माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास ॥धृ.॥
पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टेदार, अंगी काचोळी हिरवीगार
पितांबराची ग पितांबराची खोवून कास, भक्त येतील दर्शनास ॥१॥
बिंदीबिजवरा ग बिंदीबिजवरा भाळी शोभे, कर्णि बाळ्यान वेलझुबे
इच्या नथेला ग इच्या नथेला हिरवा घोस, भक्त येतील दर्शनास ॥२॥
सरी ठुसीन ग सरी ठुसीन मोहनमाळ, जोडवे मासोळ्य़ा पैंजन चाळ
पट्टा सोन्याचा ग पट्टा सोन्याचा कमरेला, हाती हिरवा चुडा शोभला ॥३॥
जाईजुईची ग जाईजुईची आणली फुले, भक्त गुंफीती हारतुरे
हार घालिते ग हार घालिते अंबे तुला, भक्त येतील दर्शनास ॥४॥
इला बसायला ग इला बसायला चंदनपाट, इला जेवाया चांदीचे ताट
पुरणपोळी ग पुरणपोळी भोजनाला, मुखी तांबुल देते तुला
खणनारळाची खणनारळाची ओटी तुला, भक्त येतील दर्शनास ॥५॥
माझ्या मनीची मानसपुजा, प्रेमे अर्पिली अष्टभुजा
मनोभावाने ग मनोभावाने पुजीते तुला, भक्त येतील दर्शनास ॥६॥
॥ श्री महालक्ष्मी आरती – वससी व्यापकरुपे ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मी ॥धृ.॥
करविरपुरवासिनी सुरवर मुनिमाता । पुरहर वरदायिनी मुरहरप्रियकांता ।
कमलाकारे जठरी जन्मविला धाता । सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणी । झलके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी । शशिधर-वदना राजस मदनाचि जननी ॥२॥
तारा शक्ति अगम्या शिवभजका गौरी । सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारी ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रकटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥
अमृतभरित सरिते अघदुरिते वारी । मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी ।
वारी मायापटल प्रणमत परिवारी । हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी ॥४॥
चतुरानने कुश्चितकर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥
****
॥ आरती श्री लक्ष्मी – अंबिके तुझे गे ॥
अंबिके तुझे गे चरण दाखवी
लक्ष्मी तुझे गे चरण दाखवी ॥धृ.॥
भाळी कुंकुवाची चिरी
सरळ वेणी माथ्यावरी
मोतियाने भांग भरीऽऽऽऽऽ मुद्रा खडी गे ॥१॥
मंगळवारी शुक्रवारी
भक्त तुझी सेवा करी
पक्वान्नाने ताट भरीऽऽऽऽऽ मुखी तांबुल गे ॥२॥
उजवीकडे गजानन
डावीकडे षडानन
करी दैत्यांचा चुडाऽऽऽऽऽ विजय मिळवुनी गे ॥३॥
****
॥ श्रीयोगेश्वरी (अंबेजोगाई) देवीची आरती ॥
जय देवी जय देवी जय योगेश्वरी अंबे ।
आरती करितो भावे तुजला जगदंबे ॥धृ॥
कोकण प्रांती अंबे घेऊनी अवतार
भक्ती मार्गा जगती वाढविले फार
जयंति नगरी मारून दंतासुर घोर
भक्ता मनोप्सित देण्या वससी ते नगर ॥१॥
योगाईऽ तव ख्याती ब्रह्मांडी ज्ञात
शेषही गाता शिणला तव गुण अगणित
ब्रह्मा विष्णू सदाशिव निशिदिन तुज ध्यात
इन्द्रादिक ते सुरवर तवपद सेवीत ॥२॥
अंबानगर निवासिनी सर्वेश्वर जननी
दानव दुष्ट विमर्दिनी स्वभक्त सुखकारिणी
दासा रक्षण करणी पातक संहरणी
दास हरी तव चरणी नत हो दिन रजनी ॥३॥
॥ श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबाई) आरती ॥
श्रीकोल्हापुरवासिनि जननि जगदंबे ।
आदिमाये आदिशक्ति जय सकलारंभे ।
जय देवि जय देवि ॥ धृ॥
तुळजापूर गडचांदे बासर बोधन, अंबे जोगाईचे माहूर राशीन ।
सप्तशृंगगडासि अभिनव तव ठाण, केलें अघोररूपें दैत्यांचे मथन ॥१॥
पावागड कलकत्ता शांतादुर्गा ती, द्र्वाविडदेशीं मदुरेमाजीं तव वस्ती ।
जिकडेपहावे तिकडे अंबे तव व्याप्ती, निर्गुण ब्रह्माची तूं अभेद्यशी शक्ति ॥२॥
पदनत रक्षायातें धरिला अवतार, मर्दुनि कोल्हासुर तो सुखी केले अमर ।
त्रंबुलीचा महिमा वानिती निर्जर, जवाआगळी काशी म्हणती करवीर ॥३॥
आतां हीच विनंती अंबे तव चरणां, कृपाकटाक्षे वारी भक्तांची दैना ।
आयुबलधन देऊनि नांदवि सुखसदना, प्रेमें दासगणूच्या मान्य करी कवना ॥४॥
॥ श्री शाकंभरी देवीची आरती ॥
शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली
दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली
येतां भक्ता संकट धावुनी ही आली
दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥
जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते
अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥
मधुकैटभ, महिषासुर मातले फार
दुर्गारूपाने केलास दानव संहार
शक्ती तुझी महिमा आहे अपार
म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥
अवर्षणाने जग हे झाले हैराण
अन्नपाण्याविना झाले दारूण
शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न
खाऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥
चंडमुंडादिक भैरव उद्धरिले
भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले
नृपपद्माचे त्वा वंश वाढविले
अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥
पाहुनी माते तुजला मन होते शांत
मी पण् उरे न काही मानव हृदयात
प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात
ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥
वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी
आलो शरण तुला मी आशिष दे मजसी
अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी
अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥
॥ गोंधळाची संबळगीत ॥
लो लो लागला अंबेचा भेदाभेद कैचा
आला कंटाळा विषयाचा धंदा मुळ मायेचा ॥धृ.॥
प्रपंच खोटा हा मृगपाणी घोरे फिरती प्राणी
कन्यासुत दारा धन माझे मिथ्या वदतो वाणी
अंती नेतील हे यमदूत नये संगे कोणी
निर्गुण रेणुकां भवानी जपतो मी निर्वाणी ॥१॥
पंचभुतांचा अधिकार केलासे सत्वर
नयनी देखिला आकार अवघा जो ईश्वर
नाही सुख – दु:ख देहाला कैचा अहंकार
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शुन्याकार ॥२॥
ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी
निद्रा लागली अभिध्यानी जे का निरंजनी
लिला वर्णिता स्वरुपाची शिणली शेष वाणी
तेथिल भवानी ती जननी त्रैलोक्याची पावनी ॥३॥
गोंधळ घालीन मी ब्रह्मीचा घोष अनुहाताचा
दिवटी उजळूनिया सदोदीत पोत चैतन्याचा
अहं सोहं हे उदो उदो बोले चारी वाचा ॥४॥
पहाता मुळ पीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ
तेथे जगदंबा अवधुत दोघे भोपी भट
तेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ ॥५॥
****
॥ श्री देवीचे जोगवा संबळगीत ॥
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापाची करावया झाडणी ।
भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥१॥
द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी धरीन् ।
भेद रहित रहित वारीस जाईन । आईचा जोगवा जोगवा मागेन ॥२॥
नवविध भक्तिच्या करुनी नवरात्रा ।
करोनी निराकरण कारण मागेन ज्ञानपुत्रा ।
दंभ सासरा सासरा संडीन कुपात्रा ।
करीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥३॥
पूर्ण बोधाची बोधाची भरीन मी परडी ।
आशा मनशांच्या मनशांच्या पाडीन दरडी ।
मनविकार विकार करीन कुरवंडी ।
अमृत रसाची भरीन मी दुरडी ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥४॥
आता साजणी साजणी झाले मी नि:संग ।
विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीयला मी संग ।
काम क्रोध हे झोडियले मांग ।
केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग ।
सत्चित आनंद आनंद झाले मी अभंग ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥५॥
ऐसा जोगवा जोगवा मागून ठेविला ।
जावुनी महाद्वारी महाद्वारी नवस मी फेडीला ।
एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला ।
जन्म-मरणाचा मरणाचा फेरा हा चुकविला ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ॥६॥
****
॥ श्री देवीचे जोगवा ॥
वाढ ग माय जोगवा । वाढ ग माय जोगवा ।
जोगवा मागते मी मागते जोगवा ॥धृ॥
हिरवी अंबेची कांकण । घ्या नारळ हिरवा खण ।
परडीत घालाया तुम्ही । हळद कुंकू मागवा ॥१॥
तेल घाला की दिवटीला । वंशी दिवा तो लाभावा ।
नवसाचं लेण् आपुलं । असच तुम्ही भागवा ॥२॥
ही तुळजापुरची अंबा । घ्या नाव सदा जगदंबा ।
जोगवा देऊनशान । भक्तिला जागवा ॥३॥
दारी आलिया माऊली । अहो सुखाची साऊली ।
आयांनो बायांनो । या देवीला बोळवा ॥४॥
*******
दे बाई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ॥धृ॥
मंगळवारचे दिवशी नाही सारवले घर
गुन्हा माफ कर एवढा गुन्हा माफ कर ॥१॥
आई अंबाबाई तुला घालीन मी स्नान
पाटावर बसवूनी करीन पूजन ॥२॥
आई अंबाबाई तूझ्या कानामध्ये झुबा
तुझ्या दर्शनाला राजा, कोल्हापूरचा उभा ॥३॥
आई अंबाबाई तुला नेसवीन पातळ
श्रावणाचा महिना झाला बाळ गोपाळ सांभाळ ॥४॥
आई अंबाबाई तुझ्या नाकामधे नथ
नथीमध्ये मोती एक हजाराचा एक ॥५॥
आई अंबाबाई तुझे तळघर खोल
ऐकू येत नाही तुझ्या पुज्याऱ्याचे बोल ॥६॥
आई अंबाबाई तुझ्या हातामध्ये गेंद
तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद ॥७॥
॥ गोंधळ – उदो उदो गर्जुनी ॥
उदो उदो गर्जुनी करीतो मुजरा मानाचा ।
गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आईचा ॥धृ.॥
तुणतुण हातात झांजेच्या नादात
ढोलाचा ढमढमाट वाजतो ठेक्यात
प्रकाश मशालीचा दिवा गं अंधाराचा
गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आईचा ॥१॥
आसूड हातात पाथीवरी मारीतो
सुपलीत अंबाबाई घेवूनी नाचतो
मळवट भरिला कुम्कुम हळदीचा
गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आईचा ॥२॥
कवड्यांच्या माळांनी परडी भरली पिठांनी
अनंत भोप्या कमला जोगिणी होऊनी
अखंड वंदा रे प्रणाम प्रेमाचा
गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आईचा ॥३॥
॥ श्रीदेवीची भजने ॥
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई
सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई ॥धृ॥
तू विश्वाची रचिली माया, तू शितल छायेची छाया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरीत तयाला नेई
दुरीत तयाला नेई, सेवा मानून घे आई ॥१॥
तू अबला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची स्फूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वाते नेई
पूर्णत्वाते नेई, सेवा मानून घे आई ॥२॥
तूच दिलेली मंजूळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तूझ्यां पूजनी माझ्याजवळी, याविण दुसरे नाही
याविण दुसरे नाही, सेवा मानून घे आई ॥३॥
****
येई अंबे भजनाला धावूनी ये ग
सुंदर साडी सावरत ये ग
चंदेरी काठ त्याचा आवरीत ये ग ॥धृ॥
गाईन तुजला गीत तुझे गं
पैंजण रुणझुण वाजवीत ये गं
ठेक्यावरती टाळ माझी ठुमकत ये गं ॥१॥
लाविन तुजला कुंकुम भाळी
नेसवीन तुजला साडी चोळी
सिंहावरती बसण्याला लवकर ये गं ॥२॥
चमेली गुलाब चाफा गुंफुनी सारे
सौंदर्याचा मोरपिसारा फुलवित ये गं ॥३॥
तूच तुकाई तुळजापुरची
मायभवानी माहुरगडची
काजळनयनी तांबुल ओठी हासत ये गं ॥४॥
****
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥धृ॥
देवीच्या देवळात कोण गं उभी
ओटी भरण्या मी हाय उभी
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥१॥
——- हिरवा चुडा भरते करी
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥२॥
पाच फळ मी आणीली आरास त्याची मी मांडीली
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥३॥
सिंहासणी शस्त्र धारीणी भक्तालागी ये धावूनी
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥४॥
जगताची तू मायमाऊली भगवा झेंडा फडकूनी गगनीं
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥५॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने आसूर मारीले भक्त तारिले
जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥६॥
****
मेरे अंगनामे आ गई रे एक छोटीसी कन्या
भक्तो ने पुछा मैंया नाम तेरा क्या है
वैष्णवी नाम बता गई रे एक छोटीसी कन्या ।
भक्तो ने पुछा मैंया डेरा तेरा कहॉं है
उंचे उंचे पर्वत बता गई रे एक छोटीसी कन्या ।
भक्तो ने पुछा मैंया वस्त्र तेरा क्या है
लाल लाल चुनर बता गई रे एक छोटीसी कन्या ।
भक्तो ने पुछा मैंया खाना तेरा क्या है
हलवा पुरी चना बता गई रे एक छोटीसी कन्या ।
भक्तो ने पुछा मैंया पिना तेरा क्या है
निर्मल जल बता गई रे एक छोटीसी कन्या ।
भक्तो ने पुछा मैंया सवारी तेरी क्या है
पिला पिला शेर बता गई एक छोटीसी कन्या ।
भक्तो ने पुछा मैंया सबसे प्यारा कौन है
भक्तो कां भाव बता गई एक छोटीसी कन्या ।
॥ श्रीदेवीची खेळगाणी ॥
सावर सावर अंबामाता पैठणीचा घोळ गं
पैठणीचा घोळ गं अंबामाता खेळ गं ॥धृ॥
पायी पैंजण चाळ गं अंबामाता खेळ गं ॥१॥
हळदकुंकू लेगं अंबामाता खेळ गं ॥२॥
घागर उचलूनी घे गं फुंकर मारुनी खेळ गं
फूऽ फूऽ फूऽ फूऽ ॥३॥
****
नऊवारी साडी नेसूनि बाई लुगडी कोल्हापूरात अंबा खेळते फुगडी ॥धृ॥
माहूरगडच्या रेणुकेला फुगडी खेळायला निरोप दिला
खणखण वाजते हातातली बांगडी, कोल्हापूरात अंबा खेळते फुगडी ॥१॥
वणी गावची सप्तशृंगी बाई ही आली घाईघाई ।
खेळ खेळता घालिते बाई, लंगडी, कोल्हापुरात अंबा खेळते फुगडी ॥२॥
मांढर गावची काळूबाई फुगडित बाई ही दंग झाली
चमचम करते साताऱ्याची बुगडी ग, कोल्हापुरात अंबा खेळते फुगडी ॥३॥
पाथर्डीची मोठी आई भक्तिभावाचा मेळ घाली
देवीला बसायला टाका की हो घोंगडी, कोल्हापुरात अंबा खेळते फुगडी ॥४॥
कुंकू
कुंकू लावू या ग कुंकू लावू या
कुंकू लावू या ग कुंकू लावू या
कुंकू लावू या ग कुंकू लावू या
आपण साऱ्या सुवासिनी कुंकू लावू या ॥धृ॥
कटी हिऱ्यांचा मेखला, कंठी शोभे मुक्तिहारा
अशा महालक्ष्मीला कुंकू लावू या ग ॥१॥
करी धरी तलवारीला भाळी कुंकूमाचा टीळा
अशा भवानीला आपण कुंकू लावु या ग ॥२॥
मयूराचे ते वाहन नित्य विणेचे वादन
अशा सरस्वतीला आपण कुंकू लावू या ग ॥३॥
मुखी तांबुल शोभला स्थान तिचे माहुर गडाला
अशा रेणुकेला आपण कुंकू लावु या ग ॥४॥
॥ दंडवत ॥
दंडवत सांग माझा दंडवत सांग
दंडवत सांग माझा दंडवत सांग ॥धृ॥
कोल्हापुरच्या अंबाबाईला तुळजापूरच्या भवानीला
माहूरच्या रेणूकेला दंडवत सांग ॥१॥
सप्तशृंगी जगदंबेला म्हैसुरच्या चामूंडेला
काशीच्या अन्नपूर्णेला दंडवत सांग ॥२॥
शिवनेरीच्या शिवाईला प्रतापगडच्या भवानीला
पुण्याच्या पर्वतीला दंडवत सांग ॥३॥
कांचीपूरच्या कामाक्षीला मदुराईच्या मिनाक्षीला
देवी कन्याकुमारीला दंडवत सांग ॥४॥
अष्टभूजा पद्मावतीला चतु:शृंगीच्या जोगेश्वरीला
देवी अंबेजोगाईला दंडवत सांग ॥५॥
कलकत्तेच्या कालिकेला कार्ल्याच्या एकविरेला
गोव्याच्या शांतादुर्गेला दंडवत सांग ॥६॥
वज्रेश्वरी शारदादेवीला सरस्वती शाकंबरीला
सर्वशक्ति गायत्रीला दंडवत सांग ॥७॥
सप्तशृंगी व्याघ्रांबरीला संतोषी शितळादेवीला
पतिव्रता सीतादेवीला दंडवत सांग ॥८॥
आशागडच्या संतोषीला डहाणूच्या महालक्ष्मीला
विरारच्या जिवदानीला दंडवत सांग ॥९॥
निरोप आरती
जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥
तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥
मागणे तेची देवा आता एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥
सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥
वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची साऊली देवा दीनावरि करी ॥६॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥
॥ आरती श्री लक्ष्मी – सौम्य शब्दे उदोकारे ॥
सौम्य शब्दे उदोकारे वाचे उच्चारा
भावे भक्त विनवी अंबे चाल मंदिरा ॥धृ.॥
नवखणांचा पलंग अंबे शोभतो बरा
सुमनांचे परिवारी अंबे शयन करा ॥१॥
अष्टही भोग भोगूनी अंबा पहुडली शेजे
भक्त जनांची आज्ञा जाहली चालावे सहजे ॥२॥
मानससुखी दशमस्थाने निद्रा हो केली
रामदास म्हणे अंबा ध्यानी राहीली ॥३॥
*********
टायपो वा अन्य चूका असतील त्या जरुर कळवा
धन्यवाद