हा मराठी ग्रंथ गंगातीरीं ब्रह्मावर्त येथे शके १८२६ (इ. स. १९०४) मध्यें झाला. मूळ श्रीगुरुचरित्राच्या सारभूत या ग्रंथाचे अध्याय ५१च आहेत व त्यांत ७०० श्लोक आहे. प्रत्येक श्लोकाचे तिसरे अक्षर क्रमाने वाचले असता श्रीमद्भगवद्गीतेचा १५वा अध्याय होतो. म्हणजेच हा ग्रंथ मंत्रगर्भ आहे. श्रीगुरुचरित्राच्या वाचनाचा अधिकार सर्वांना नसल्याने स्त्रीशूद्रादिकांना थोडक्यांत श्रीगुरुचरित्राची ओळख, उजळणी व अनुष्ठान या तीनही गोष्टी साध्य व्हाव्यात तसेच गीतेच्या पंधराव्या अध्यायाच्या पाठाचे फळही सहजच मिळावे असा श्रीमहाराजांचा उद्देश दिसतो.