Malvani Diseases

कोकणातले आजार आणि त्यांची लक्षणे..
तुमची मुलं मेडिकलला ऍडमिशन घेणार असतील किंवा ऍडमिशन घेतल असेल किंवा काही जणांची मुलं डॉक्टर, MBBS डॉक्टर झाली असली तरीही खालील 60 आजार आणि त्यांची लक्षणे यांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे तसेच मालवणी भाषा येण पण महत्त्वाचे आहे.

माका ना नजा असा
पायाबुडला झाला
काशेफोड इलो हा .
सारकी लकनी येता
हातापायान वडी येतत
मोडो भरलो हा आंगात
आवंढो घोटुक जमणा नाय
डोळ्याक डोळो लागना नाय.
पोटात नळ भरलो
कलकलणी भरली
कमरेचा बिरडा झाला
डोळ्यासंबुर आंधारी येता
येका जाग्यार थारो व्हयत नाया
हुबो रवलंय काय भिरभिरल्यावरी जाता
निसती फुटाफुट लागता
पोटात वळीवाके येतत
उचलून टाकल्यासारा जाता
पायाचो आंगठो साकाटलो,
कमरेत याग येतत
पोटात चावरी करता
नागीण झाली आसा
धावरा झाला
कमरेत लस भरली,
कपाळ ठणाकता
वात ईलो
दाढ चाळावली आसा…
कुशीत भरला
पित्त खवाळला
पोटात चावता
कपालात काय जाता
झाड्याक वरवरीत व्हता!
कपाळ फूटता
घोपान नाय रवला
अंगात किटकिटता
डोक्या वडासता नुसता,
पाय ईरईरतत
टकलेत चलता
ईरीरता
जीभ परातता
डोक्या चावता
गरगरी येता
धडकी भरता
घाबरागुबरा होवक जाता
पाठीत भरता
पोटात ढवाळता
कान किनकिनतत
पेटके येतत
दाढ ठणाकता
पाठीत भरता
कसकसता
गच गच वाटता
हात पाय फुटफुटतंत,
अंग वडासता,
छातीत पेटके मारतंत.
हुरहुरा झाला.
किवयान झाला.
झाड्याक जायना
खाल्ला वरते येता,
तीनसाना हुडहुडी भरता

माका कसा तरी होता!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *