Marathi Poem – Ek Mask
एक मास्क मनाचा पण असावा
एक मास्क मनाचा पण असावा
राग हेवा हव्यास सगळा फिल्टर व्हावा
समाधानानी फक्त आत शिरावं
कणव आणि हास्य विनोदांना
बरोबर घेऊन यावं
योग्य वेळी रागालासुध्दा मुभा मिळावी
स्वत:वरच्या रागाला तर
आडकाठीच नसावी
समोरच्याचे चांगले गुण
सहजावारी आत यावेत
त्याच्या दोषांवर मात्र
या मास्कची नियंत्रणं हवीत
बालीशपणा मोठ्यांच्या मास्क मधून
हळूच कधीतरी आत यावा
त्याचा हात धरून
समंजसपणाही आत शिरावा
देवा करोना तर दिलाच आहेस
आता या मास्कचं प्रयोजन कर ना