चांदोबा
आपण सगळ्यांनीच आपल्या बालवयात चांदोबा/Chandamama नक्कीच वाचला आहे. अनेक देखण्या अप्सरा, सामान्य माणसं, शेतकरी, व्यापारी, राजघराण्यातील पुरुष, लहान बालकं… किती-किती म्हणून असायची ती चित्रं!! वाचन म्हणजे नक्की काय समजण्या आधी फक्त चित्र बघण्यात पण मजाच होती वेगळी, इतकी सुरेख जिवंत चित्र.
तर त्या मासिकातील विक्रम आणि वेताळ कथामालेतील रुबाबदार विक्रम, त्याची टोकदार तलवार, तो मोठा वृक्ष, त्याच्या आजूबाजूला असलेल्या कवट्या, विक्रमाच्या मानगुटिवर/पाठीवर बसलेला पांढरे शुभ्र केस मोकळे सोडलेला खतरनाक वेताळ!! या विक्रम आणि वेताळ यांची अक्षरशः जिवंत चित्रं काढणारे चित्रकार म्हणजे के. सी. शिवशंकरन.
#चांदोबा परिवारातील एकमेव हयात व्यक्ती असलेल्या चित्रकार शंकर यांचे आज निधन झाले आहे. आज त्यांचं वय 96 होतं.
Erode जवळील छोट्या गावात त्यांचा जन्म झालेला. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांचे वडील बायको-मुलांना घेऊन चेन्नईत आले. शाळेत असताना त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांच्या एका शिक्षकाने,”तुझी चित्रकला उत्तम असून तू B.A./M.A. न होता चित्रकलेचं शिक्षण घे” असा सल्ला दिला.
त्यानुसार बारावी पास झाल्यावर त्यांनी Government College of Fine Arts, Chennai येथे प्रवेश घेतला. 1946 मध्ये ते तमिळ नियतकालिक Kalaimagal येथे नोकरीला सुरवात केली. त्यांचा पगार तेव्हा ₹150/- होता. तेवढेच पैसे ते freelance writer म्हणून कमवत होते.
1952 मध्ये बी. नागारेड्डी यांच्या #चंदामामा मासिकासाठी चित्र काढण्याची नोकरी मिळाली. तेव्हा त्यांना ₹ 350/- पगार होता.
आपलं बालपण सुंदर-सहज करणाऱ्या चित्रकार शंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🙏🙏
Swapna Kulkarni