तीर्थ घेण्याचे नियम
तीर्थप्रसाद एकत्रच घ्यावयाचा असल्याने आपण फक्त तीर्थ घेण्यासंबंधी शास्त्रसंकेत पाहू यात. तीर्थ स्वतः न घेता नेहमी ज्येष्ठांकडून अथवा पुरोहितांकडून घ्यावे. तीर्थ घेताना हात स्वच्छ असावेत. उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा करून तीर्थ घ्यावे. उजव्या हाताची तर्जनी अंगठ्याच्या मुळापर्यंत वाकवून गाईच्या कर्णाप्रमाणे मुद्रा करावी आणि त्या खोलगट भागात तीर्थ घ्यावे. तीर्थ प्राशन करतांना आवाज करू नये. शक्यतोवर तीर्थ एक थेंबच घ्यावे, कारण तीर्थ लाळेत मिसळावे, त्याचे पोटात जाऊन मैलात रूपांतर होऊ नये असा संकेत आहे. सामान्यतः घरी पूजा झाल्यावर दोन वेळा तीर्थ घ्यावे, जर त्या दिवशी उपवास असेल तर तीन वेळा तीर्थ घ्यावे. एकादशीचा उपवास दुसरे दिवशी सुर्योदयासमयी तीर्थ प्राशन करून सोडावा. सत्यनारायण असेल तर पूजा झाल्यावर, मात्र महापूजा अथवा श्राद्ध असेल तर जेवणापूर्वी तीर्थ घ्यावे. त्यामुळे देव व पितरांचा गौरव होतो. पंचामृत प्राशन केल्यावर डोक्यावर हात फिरवू नये त्याने केसांना इजा पोचण्याचा संभव असतो.तीर्थ प्राशन करतेवेळी
’अकाल मृत्यु हरणं सर्वव्याधि विनाशम्। अमुक तीर्थ जठरे धारयाम्यहम्।।`
हा मंत्र म्हणून तीर्थ घ्यावे. अमुक या शब्दाजागी विष्णुपादोदकं, शिवपादोदकं, गणेशपादोदकं, सूर्यपादोदकं किंवा देवीपादोदकं चे उच्चारण करावे.कोणत्याही महत्वाच्या कामास जाताना किंवा परगावी जाताना तीर्थ प्राशन करावे, अशावेळेस देवघरातील तांब्याच्या पंचपात्रातीलच तीर्थ समजून घ्यावे.
अकाल् मृत्यूहरणं सर्व व्याधिविनाशनम
विष्णो पादोदकम तीर्थम जठरे धाराम्यहम
शरीरे जर्जरीभूते व्याधीग्रस्ते कलेवरे
औषधम जान्हवीतोयम वैद्यो नारायाणो हरी
how to take teerth
tirtha name meaning
tirtha hinduism
tirtha meaning in english
hindu tirth sthal name
tirtha meaning in marathi
tirth meaning in hindi
yatra hinduism
tirtha actress wiki